झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी
नमस्कार. आजचा बेत झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी.
झिंगालाला देशामधे काय खावे हा मोठा प्रश्न पडतो. एकतर ईथे पालेभाजी दिसत नाही. कधितरी पालकासारखी कोणतीतरी दिसते पण घेण्याची हिम्मत झाली नाही.
भात किंवा ब्रेड खावून कन्टाळलो आणि वीकांताला पराठे करायचे असा बेत केला. झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी. आपला दोन नंबरचा आवडता मेनु . चला सुरुवात करु या.
साहित्यः
पराठ्यांसाठी:
२ लहान झुक्किनी , बारीक किसून
५ वाट्या गव्हाचे पीठ
१ वाटी बेसन पीठ
१ चमचा ओवा
कोथिंबीर बारीक चिरून
थोडेसे मीठ
चटणीकरीता:
२-३ हिरव्या मिरच्या
१२-१५ शेंगदाणे
१-२ लसूण पाकळ्या
१ चहाचा चमचा जीरे
१ चहाचा चमचा धणे
कोथिंबीर
चवीपुरते मीठ
तडक्यासाठी:
१ चमचा तेल
१/२ चहाचा चमचा मोहोरी
१ /२ चहाचा चमचा जीरे
चिमूट्भर हींग.
१ चहाचा चमचा हरभर्याची डाळ
३-४ कढिपत्याची पाने
पाकक्रुती:
चटणी:
हिरव्या मिरच्या तव्यावर भाजुन घ्या. भाजताना त्यावर २-३ थेम्ब तेल टाका, त्यामुळे खमंगपणा वाढतो. नन्तर तव्यावर शेन्गदाणे भाजून घ्या. शेवटी धणे आणि जीरे तव्यावर टाकुन १-२ मिनिटे भाजुन घ्या.
लसूण सोलुन घ्या. भाजलेले सामान, लसूण व कोथिंबीर मिक्सरमधे टाकुन बारीक चटणी बनवा. बारीक करताना त्यात गरजेनूसार पाणी टाका. हि चटणी वाड्ग्यात काढा आणि चटणी पातळ हवी असेल तर त्यात थोडेसे पाणी टाका. चविनूसार मीठ घाला.
एका छोट्या कढईमधे तेल गरम करा. त्यात मोहोरी टाका. मोहोरी तडतडली कि त्यात हरभर्याची डाळ
टाका. हि डाळ थोडिशी लाल झाली कि त्यात हींग टाका. जीरे टाका. शेवटी कढिपत्याची पाने टाका.
हि गरमागरम फोडणी (तडका) चटणीवर टाका. आअणि मिक्स करुन घ्या. झणझणीत शेंगदाणा चटणी तय्यार.
झुक्किनी पराठे
झुक्किनी धूवून बारीक किसा. परातीत गव्हाचे पीठ आणि बेसन घेवून त्यात किसलेली झुक्किनी टाका. ओवा, चिरलेली कोथिंबीर मीठ आणि गरजेनूसार पाणी टाकुन पीठ चांगले मळून घ्या.
थोडीशी कणिक घेवून जाड्सर लाटुन घ्या. बेसनमुळे हि कणिक जरा चिकट असते. त्यामुळे लाट्ताना पीठ ज्यास्त वापरावे लागते. हे पराठे तव्यावर दोन्हि बाजुनी चांगले भाजुन घ्या. पराठा चांगला भाजला गेल्यावर त्याल थोडे तेल लावा.
गरमागरम पराठे, झणझणीत चटणी आणि दहिकान्दा. बास! नाक, कान, डोळे आणि स्पर्श अशी चार इन्द्रिये बन्द करुन फक्त जिभेवर केन्द्रित करावे आणि हादडावे.
बोन अपीटी

वाचने
6439
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
च्यामारी कोण आहे रे तिकडे ?
In reply to च्यामारी कोण आहे रे तिकडे ? by अवलिया
झुक्किनी म्हणजे
In reply to झुक्किनी म्हणजे by निवेदिता-ताई
काकडीसारखा एक पदार्थ
In reply to काकडीसारखा एक पदार्थ by बेसनलाडू
ह्या झुकिनीला मी फार्मविल्लेत
झुकिनी म्हणजे शिराळी का?
In reply to झुकिनी म्हणजे शिराळी का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
झुकिनी म्हणजे काकडीसारखी
In reply to झुकिनी म्हणजे काकडीसारखी by रेवती
हे तर मलाही माहित्ये गं!
In reply to हे तर मलाही माहित्ये गं! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हां तेही खरच! मला कधी पुण्यात
In reply to हे तर मलाही माहित्ये गं! by ३_१४ विक्षिप्त अदिती
भारतात मिळत नाही बहुतेक. पण
In reply to भारतात मिळत नाही बहुतेक. पण by रतन
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by ३_१४ विक्षिप्त अदिती
हळदीच्या पानांची (का कसली?)
In reply to हळदीच्या पानांची (का कसली?) by रतन
कसली चटणी ते काकूंनाच
In reply to कसली चटणी ते काकूंनाच by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे अरे अरे! एका पदार्थामुळे
In reply to अरे अरे अरे! एका पदार्थामुळे by रेवती
अंमळ घोटाळाच केला.
In reply to अंमळ घोटाळाच केला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
भारतात परतलो कि करायला
In reply to झुकिनी म्हणजे काकडीसारखी by रेवती
झुकीनी म्हणजे झुकलेली काकडी
नुसताच फोटो पहात बसलोय.
मस्त ! झुकिनी ( कोर्गेट) चा
झुक्किनी
पाकृ छानच आहे.फोटू पाहून इनो
In reply to पाकृ छानच आहे.फोटू पाहून इनो by रेवती
थोडा उग्र वास पण असतो
जेवण झाल्यावर धागा पाहिला आणि
मस्त!
चटणी
अरे व्वा!! होइलच लवकर.
आग लागो ह्या पाकृ विभागाला !!
मस्त
प्रतिक्रिया देणार्या सर्व
ब्यांकॉकलाहि मिळ्ते झुक्किनी ...बनवून बघेन.....