Skip to main content

झटपट बटरवडॆ.......

बुधवार, 20/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
From साहित्य:- एक लिटर गोड दही, चार पाच हि. मिरच्या, एक छोटा आले तुकडा, लसूण पाकळ्या आठ-दहा, कोथिंबीर, जिरा बटर दोन पॅकेट, चवीनुसार मिठ, साखर, फ़ोडणीचे साहित्य. कॄती :- प्रथम आले, लसुण, मिरची पेस्ट काढा, दही पाणी न घालता घुसळून घ्या,
From त्याला मोहरी,जिरे, हिग, किचिंत हळद घालुन फ़ोडणी बनवा, यात आले, लसुण, मिरची पेस्ट परतून घ्या,
From ती फ़ोडणी दह्यात घाला, चवीनुसार मिठ, साखर घाला. कोथींबीर घाला व दहीवड्याला तयार करतो तसे दही तयार करुन घ्या.
From आता थोडॆ पाणी कोमट करुन घ्या. त्यात बटर टाका व लगेच बाहेर काढा. व त्यातील पाणी कादून टाका. ते एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर तयार केलेले दही घालून सर्व्ह करा.
From वरील साहित्यात चार जणांना पुरेल एवढे वडे तयार होतात.

वाचने 3554
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

निवेदिता ताईने माझ्या सकाळच्या न्याहारीचा बंदोबस्त केला. - पिंगू