आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल
फक्त मी नावास कर्ता शेष आता
बायको ही लांडगा मी मेष आता
केस पिकले, दात पडले, भिंग सजले
केव्हढा बदलून गेला वेष आता
म्हैस ही बसते, पुन्हा उठतेच कोठे!!
आणि लाजेचा न उरला लेश आता
रोज नवऱ्यांनो, अता ऱ्हावा उपाशी
बायकांनी काढला आदेश आता
एकही ना ठेवला खात्यात पैसा
आणि बचतीचा मला उपदेश आता
सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची
राहिला नाही मला आवेश आता
घास उतरावा कसा खाली घशाच्या?
काल चे सारे, न काही फ्रेश आता
सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी
सोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6431
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!
मस्तच.....
केशवसुमारशेठ,
भन्नाट..
In reply to केशवसुमारशेठ, by चतुरंग
भन्नाट..
जबरदस्त
मस्त !!!
अशक्य......
:)
छान...
मस्तच आहे!
लै भारी..
उत्तम विडंबन
धन्यवाद!!
जब्राट...........
प्रतिक्रिया न दिलेला एक
१ न॑बर!!!!!!
मस्त.
नाथा