Skip to main content

तिसरे महायुद्ध कोणत्या कारणाने घडेल?

बुधवार, 20/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 973
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

मिपावर असे भडकावू कौल काढल्यामुळे. ;) विनोद बाजूला ठेवला तर- तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता थोडी कमीच दिसते आहे. बर्याच देशांनी अणु वस्तारे बनवल्याचा हा फायदा.

In reply to by रन्गराव

>>शक्यता थोडी कमीच दिसते आहे म्हणजे शक्यता नाकारत नाही आहात तर.. >>बर्याच देशांनी अणु वस्तारे बनवल्याचा हा फायदा. हा विचार आपण करतो, सर्व देशांचे राज्यकर्ते काय विचार करतात यावर सगळं अवलंबुन आहे.

In reply to by मराठमोळा

>>म्हणजे शक्यता नाकारत नाही आहात तर.. नाकारत नाही. >>हा विचार आपण करतो, सर्व देशांचे राज्यकर्ते काय विचार करतात यावर सगळं अवलंबुन आहे. मग ते युद्ध दोन देशांमध्ये होइल किंवा दोन देशांच्या संघटनांमध्ये. राज्यकर्ते हा म्हत्वाचा भाग आहे. पण आजकाल छुपे युद्ध खेळन्याला जास्ती पसंती दिली जाते.

In reply to by रन्गराव

युद्ध 'छुपे' काय कि 'उघड' काय ? शेवटी आम्हीच भरडले जातो ना. राज्यकर्ते भरडले गेले ह्याची काही उदाहरणे आहेत काय ? (रंगराव ह प्रतिसाद आपल्याला नसून हा केवळ एक जनरल प्रतिसाद आहे)

In reply to by गांधीवादी

क्रुड ऑईलसाठी होईल असे वाटते. (फक्त प्रतिसादाला उत्तर देता येत आहे. कौलाला उत्तर देता येत नाहीये) - सूर्य

In reply to by गांधीवादी

माझ्या मते ,तिसर महायुध्द होईलच की नाही माहीत नाही,पण समजा झालच तर !! तिसर्‍या महायुध्दाला सुरुवात एखाद्या फुटकळ कौलामुळे होईल !! आधी नाना किंवा मराठमोळा एखादा कौल टाकेल मग त्यावर संपादक-मंडळ चिडुन नान्यावर किंवा राक्यावर प्रहार करतील,मग संपादकांवर राग धरून असलेले गांधीवादी,शानबा५१२,वगैरै ईकडुन प्रहार करतील, मग ऋष्या आणी थत्तेकाका ,नान्याची बाजु जोरदार व्हावी म्हणुन चीनची मदत घेतील, तिकडे चीनची बाजु घेतल्या-घेतल्या काळेकाका संपादक-मंडळाच्या बाजुने येतील ..मग काय, एकदा चीन मध्ये पडलं, की आपले पुर्वेकडचे मिपाकर नान्याचा बाजुला आणी मग धिगांणाच धिगांणा !! आम्ही मात्र तटस्थ राहु

In reply to by रन्गराव

>> पण आजकाल छुपे युद्ध खेळन्याला जास्ती पसंती दिली जाते. छुपे युद्ध हे फक्त दुसर्‍या देशाची अर्थव्यवस्था कोलमडवण्यासाठी खेळले जाते. पण महायुद्ध हे छुपे खेळले जाऊ शकत नाही कारण त्यात अर्थ, वित्त, जीव हानी करायचा प्रयत्न केला जालो.

In reply to by रन्गराव

बर्याच देशांनी अणु वस्तारे
ह्या वाक्यापाशी पाच मिनीटे घोटाळलो... .. देशोदेशीचे न्हावी आता अणु-वस्तरे वापरणार की काय अशी शंका मनात येउन गेली.

झाले तरी मला काही फरक पडणार नाही. याला मत दिले आहे कारण, "माझे नाव य्याव त्याव" हा चित्रपट ज्या चित्रपटगृहात लागलेला आहे तिथली भरपूर तिकिटे आम्ही काढली आहेत. त्यामुळे सर्व जग जरी बुडाले/जळाले/राख झाले तरी सरकार तो चित्रपटगृह सुरक्षित ठेवणारच ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आम्ही निर्धास्त. अवांतर : तिकिटे कोणाला हवे असतील तर सांगणे, तिकिटांचा साठ मर्यादित.

In reply to by गांधीवादी

पण तुमच्या मताशी सहमत आहे.. माय नेम इज.. ची तिकिटे नाही भेटलीत तरी चालतील, आम्ही आपल्या सर्वांच्या लाडक्या युवराजांच्या स्टंटसाठी वापरण्यात येणार्‍या लोकलची तिकिटे काढू.. नाही भेटलीत तर फुकटात त्यात बसू.. फरक पडणार नाही..

तिसरे महायुद्ध घडले तर फक्त पाण्यासाठी घडेल.

In reply to by ए.चंद्रशेखर

>>तिसरे महायुद्ध घडले तर फक्त पाण्यासाठी घडेल. पाणी हा पर्याय मी देणार होतो, पण काही विचाराअंती टाळलं. पाण्याची समस्या खरच तितकी गंभीर होईल असे वाटत नाही. अगदीच वाईट वेळ आली तर समुद्राचे पाणी वापरण्या योग्य करणारे mass production करणारे कारखाने सुरु करता येतील. कमी लोकसंख्येच्या देशाला हे काही महाग नाही. पाण्यावरुन महायुद्ध करुन नद्या/तलाव थोडीच लुटुन नेता येतील? चंद्रशेखर राव, पाणी हे तुमचे कारण स्पष्टीकरण करुन दिलेत तर बरं होईल.

In reply to by मराठमोळा

पाण्यावरुन महायुद्ध करुन नद्या/तलाव थोडीच लुटुन नेता येतील?
तांदूळ आयात केला याचा अर्थ निर्यात करणार्‍या देशातून भरपूर पाणी आणलं. गव्हाला तुलनेने कमी पाणी लागतं, तांदूळ आयात करून गहू निर्यात केला => पाणी आयात केलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>तांदूळ आयात करून गहू निर्यात केला => पाणी आयात केलं. गणित बरोबर असलं तरी याचा संबंध महायुद्धाशी येतो कुठे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भात आयात केला असता तर ते पाणी आयात केले असे झाले असते. गणीत बरोबर आहे याचा अर्थ तर्कशास्त्र बरोबर ठरेलच असे नाही.

In reply to by ए.चंद्रशेखर

दुव्यातला Future wars over water? हा भाग महत्वाचा आहे, बाकी प्रश्न, स्टॅटीस्टीक्स माहिती होतेच, आणि आहेत सर्वाना. ज्या देशांमधे पिण्याचे पाणी नाही ते काय युद्ध करणार? पाण्याची समस्या ही गरीब आणि प्रगतीशील देशांमधे आहे असे म्हंटलेय. असे देश महायुद्ध करुन स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेतील असे वाटत नाही (तालीबान अपवाद) दुव्यातले हे वाक्य टाकायला विसरलो होतो. Inter Press Service (IPS) notes a number of experts disagree with the view that future wars will be over water, and instead feel it is mismanagement of water resources which is the issue, not scarcity

In reply to by मराठमोळा

चीन ब्रह्मपुत्रेवर धरण बांधणार आहे असे ऐकिवात आले. तसे झाले तर ईशान्य आणि पूर्व भारत आणि बांग्लादेशाला पाण्याचे दुर्भिक्ष्य चांगलेच जाणवेल. या वर अजून जाकार्तावरून धागा कसा नाही आला?

In reply to by मराठमोळा

महायुद्धाचे बाजूला ठेवू. पण ईजिप्त हा देश व दक्षिणेकडे असलेले व ज्यांच्यामधून नाईल नदी वाहते आहे असे सुदान सारखे इतर देश यांच्यामधे युद्धाची शक्यता खूप आहे.

आम्ही झाडावर (पण एकटे नाही! .... सोबतीला .... हॅ हॅ हॅ .... )

In reply to by सुनील

सुनील हा आयडी इतके दिवस आम्हाला पुरुषाचा वाटत होता. पांढर्‍या अक्षरातले आम्ही कशाला वाचु? बाकी अशी सुंदर मुलगी झाडावर पाहुन तिच्याशेजारी जागा पकडण्यासाठीही तिसरे महायुद्ध होउ शकते ब्वॉ!

तिसरे महायुध्द होणार नाही,,,, कारण.... ते होण्यापुर्वी जग बूडी होण्याची शक्यता जास्त वाटते.......

तिसरे महायुध्द होणार नाही,,,, कारण.... ते होण्यापुर्वी जग बूडी होण्याची शक्यता जास्त वाटते.......

मला पुढच्या ३ पीढ्या युद्धाचं नाव नको आहे. माझ्या मुलीचं तिच्या मुलाबाळांचं आणि त्यांच्या मुलाबाळांचं सगळं नीट होवो. मग काय हवा तो धुडगूस घाला म्हणावं.

In reply to by शुचि

>>माझ्या मुलीचं तिच्या मुलाबाळांचं आणि त्यांच्या मुलाबाळांचं सगळं नीट होवो. माफ करा, पण शेवटच्या कडीतल्या 'त्यांच्या' मुलाबाळांचा काय, ती सुद्धा आपली नाती,पणतीच ना

आईनस्टाईनचे (अथवा त्याच्या नावावर खपवलेले) वाक्य आठवले: प्रश्न (अणूस्फोटानंतरचा असल्याने) थोडा वेगळा होता, "तिसरे महायुद्ध कसे (कुठल्या शस्त्रांनी होईल) होईल?" आईनस्टाईन म्हणाला: तिसरे महायुद्ध कुठल्या शस्त्रांनी होईल ते माहीत नाही पण चौथे महायुद्ध नक्कीच दगडांनी होईल...

In reply to by विकास

WOWOWOWOWOWOW! Excellent answer!! अश्मयुगाची पहाट तिसर्‍या महायुद्धाने होणार हे अगदी खरे!

In reply to by सुधीर काळे

आणि सगळ्या अश्मांवर "मेड इन चायना" लिहिलेले असेल.