वाचून वाईट वाटले की इतक्या उत्तम खेळणार्या खेळाडूला गुलाम असल्याकारणे मालक परत आल्यावर परत यावे लागले. कदाचित त्या पटाच्या बादशहाला त्याचे वैषम्य वाटले देखील नसेल. असो जर हा बादशहा जागतिक बुद्धिबळाच्या पटावर असता तर कदाचित अनेक मी मी म्हणणार्याना त्याने गुलाम केले असते.
त्या गुलाम 'वजीराला' माझा सलाम.
चतुरंगराव इतक्या सुंदर माहीती बद्दल धन्यवाद.
पुण्याचे पेशवे
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आणि
प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही.
हे तर अगदी भन्नाट वाक्य आहे.
अशा ह्या असामान्य मीर सुलतानचं उदयाला येणं जसं सहज आनंददायी होतं तसंच त्याचं अलगद विस्मृतीत विरुन जाणंही चटका लावून जाणारं ठरलं. सध्याच्या पाकिस्तानातल्या सरगोधा प्रांतात आपल्या कुटुंबासमवेत छोट्या जमिनीच्या तुकड्यावर समाधानाने गुजराण करणार्या ह्या 'गुलाम वजिराने' १९६६ साली काळाच्या पटावरुन प्रस्थान ठेवले!
हे तर अगदी मनाला चुटुका लावुन जाते.
मस्त गोष्ट ...
त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले...
बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही...
(असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
चतुरंगजी, माफ करा!
पण मीही तो डाव (कॅपाब्लॅकाविरुद्धचा) पाहिला ओरिजिनल साईटवर जाऊन! त्या कॅपाब्लॅकाच्या **वर तुम्ही एक लाथ का दिली नाहीत याचेच आश्चर्य वाटले!!!!!
एक हत्ती राजाला जखडवून टाकीत असतांना त्याने दुसरा हत्ती तिथे आणण्याचे प्रयोजन काय? अरे त्या खानाचा एकतरी हत्ती तुला खाता येत होता ना!! मग ते कर ना!!
आणि तो वजिराशी काय खेळ खेळ्तोय? अरे वजीर हा कत्तलीसाठी च असतो हे तो विसरला काय? नुसता पुढेमागे-पुढेमागे करतोय !! अरे काहीतरी कत्तल कर ना!! समोरच्या खानाला जरा बुचकळ्यात पाड ना!!
माफ करा चतुरंगजी! पण या खेळांत आम्हाला खानाची बुद्धी दिसण्यापेक्षा त्या कॅपाब्लॅकाची निर्बुद्ध बुद्धीच दिसली!!
आम्हाला निदान दोनचार जागा तरी अशा दिसल्या की जर आम्ही तिथे जर असतो तर त्या खानाला नक्कीच हार्ड टाईम दिला असता! तो कॅपाब्लँका पुरता खानाला घाबरून गेलेला दिसला!!
स्पष्ट बोलण्याबद्द्ल क्षमस्व!!
आपला (बुद्धिबळात रस असलेला),
पिवळा डाबिस
मी ही हा गेम पूर्वीच पाहिलाय.
पोझिशनल ऍडव्हांटेज - ह्या कल्पनेचा इतका अफलातून विस्तार करुन नंतर एका वजिरापेक्षा दोन हत्ती हे वरचढ ठरणार हे जाणून केवळ मोहर्यांच्या हालचालीची लवचिकता ह्या एकाच गोष्टीवर भर देत प्रतिस्पर्ध्याच्या वजिराला फक्त येरझार्या घालायला लावणे (ते ही कॅपा.सारख्याला) आणि शांतपणे पकड आवळत नेऊन शेवटी पासपॉन मधे रुपांतर करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे!
ह्यातल्या मीरच्या पाचव्या खेळीवर पुढे पेट्रोशान आणि त्यानंतर गॅरी कास्पारोव सारख्या लोकांनी अधिक काम करुन त्यातले डीप थेऑरेटिकल काम अधिक स्पष्ट केले. पण ते समजून घेण्याइतका माझा बुद्धिबळाचा अभ्यास नाही!
स्वतः कॅपाब्लांकाने ज्याचे वर्णन 'जीनियस' असे केले आहे त्या मीर बद्दल म्या पामराने काय बोलावे?
त्यामुळे आपली असहमती नेमकी कोणत्या कारणाकरिता आहे ह्याचा नक्की उलगडा मला तरी झाला नाही.
चतुरंग
चतुरंग राव छान लेख अन अत्यंत समर्पक शिर्षक. बुद्धीबळातल्या निरनिराळ्या खेळाडुंची ओळख करुन देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन अन धन्यवाद. पुढील लेखाची वाट पहात आहे. :)
भारताने शोध लावलेल्या (चतुरंग) या खेळातील, भारतीय दिग्गजांची माहिती करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार !
ऐखाद्या प्यादाचा व़जीर कसा होतो, याचा प्रत्यय मीरला आयुष्यात आला असावा
:H
रानावनात गुराढोरांच्या मागे पळणार्या एखाद्या काटकुळ्या पोराने थोड्या सरावाने असामान्य गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकावी तसंच काहीसं!
आवडले.
शीर्षकही समर्पक आहे.
त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले...
बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही...
(असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......)
मास्तरांशी सहमत,
स्वाती
सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद.
छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंगा,
बुद्धीबळ आणि बुधिबळाच्या खेळाडूविषयीचे तुझे लेख पाहून कौतुक वाटते. माझाही हा अत्यंत आवडता खेळ आहे, परंतु मी बर्याचदा हारतो! :(
आपल्याला बॉ जमतच नाही त्यातल्या काही चालींना उत्तर देणे, परंतु हा खेळ खेळायला खूप मौज वाटते. बुद्धिबळविषयक लेखन अजूनही येऊ दे...
बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :)
आपला,
(कास्पारावप्रेमी) तात्या.
बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे?
कारण त्याने हा डाव चाल-बाय-चाल पाहिला आणि त्याचा आटाच सटकला....
असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे.:)
वजिराची कुचंबणा बघितली.
पण खालच्या संवादातला एक प्रतिसाद वाचून गंमत वाटली:
"आखेलीन म्हणाले की सुलतान खान यांना जर सुरुवाती माहीत असत्या तर ते विश्वविजेते झाले असते. (आखेलीन आणि कापाब्लांका कडून स्तुती) ही दोन विश्वविजेत्यांकडून उच्च प्रशंसा होय. सुरुवाती माहीत नसणार्यासाठी त्यांचा खेळ फार चांगला होता. सुलतान खान आणि मी, दोघांमध्ये खूप साम्य आहे. दोघांपैकी कोणालाच सुरुवाती येत नाहीत. दुर्दैवाने साम्य तिथे संपते ;)"
दुर्दैवाने, माझेही तेच आहे. कोणीतरी प्रेमाने आणि दयाळूपणे मला सुरुवाती समजावून सांगितल्यात तर मोठे उपकार होतील.
१२व्या खेळीत मोठीच घटना झाली तितके मलाही समजले. "सी" कॉलम पूर्ण मोकळा झाला. पण याचा फायदा काळ्याला होणार की पांढर्याला ते कळण्याइतके माझे बुद्धीचे बळ नाही. (पांढर्याने सापळा लावून "सी" कॉलम उघडला, म्हणजे पांढर्याला फायदा होण्यासाठीच... पण तो कसा?)
असो. चतुरंग यांनी मस्त लेख लिहिला आहे. या विलक्षण खेळाडूची ओळख झाली.
चतुरंग यांनी थोडेसे बाळबोध रसग्रहणही शिकवावे. उदाहरणार्थ Queens Indian Defence हा थोडा समजावून सांगितला तर मजा येईल. उदाहरणार्थ सहाव्या खेळीत पांढर्याने ए३ (डाव्या हत्तीचे प्यादे) पुढे केले नसते तर काय झाले असते? हे काळ्या उंटाचा मार्ग रोखण्यासाठी आहे का? हेच का? दुसरे काही का नाही? सी कॉलम मोकळा करण्यासाठी सापळा कधी आणि कसा लागला? काळा वजीर उजवीकडे (एच, जी, कॉलममध्ये) हेलपाटे घालत होता, ते एफ-जी-एच कॉलममधील प्याद्यांना धाक द्यायला का? त्यामुळे पराभव थोडा तरी लांबला का?
अशा प्रश्नांनी बेजार होऊन मी बुद्धिबळाचा नाद पूर्णपणे सोडला आहे. (शिवाय नेहमी हरायचो, ही वेगळी गोष्ट.)
मलाही 'बुद्धिबळात' अर्थात प्रचंड गती आहे असे नव्हे पण मलाही अगदी असेच वाटले कि काळा वजिर पटाच्या उजवीकडे नुस्ताच 'मागे पुढे' करत होता. निदान ते प्यादे तरी खाल्ले असते तर थोडा मार्ग तरी मोकळा झाला असता.
रंगा,
इथे माझ्यासकट अन्य सभासदांनाही या खेळात बराच रस दिसतो आहे. तू लेका लिहीच एखादी लेखमालिका जी साध्या सोप्या रितीने बुद्धीबळाची ओपनींग्ज समजावून सांगेल. माझ्यासारखे अनेकजण ओपनिंग्ज मध्येच मार खातात त्यामुळे पुढची हार जवळजवळ निश्चित होते! :)
आपला,
(फ्रेंच डिफेन्स प्रेमी) तात्या.
आत्ताच मी आलेले प्रतिसाद बघत होतो आणि त्या अनुषंगानेच विचार सुरु होता.
बुद्धिबळ ओपनिंग्ज हा एक फार मोठा विषय आहे पण मी त्यातली काही प्राथमिक घेऊन काय लिहिता येईल ते बघतो.
अभ्यासाला थोडा वेळ लागेल पण जरुर काहीतरी चांगले देऊ शकेन असे वाटते.
प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी.
आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! :)
चतुरंग
रंगाशेठ,
मस्त लेख.. बुद्धीबळ!! आमचा एकदम आवडता खेळ.. रात्ररात्र (|: डाव लावून बसायचे.. :W ~X(
खूप वर्षांपुर्वी काही कारणाने आम्हाला ह्या आमच्या आवडत्या खेळाला रामराम ठोकावा लागला.. :& या लेखाने त्या सगळ्या जून्या आठवणी ताज्या केल्या.. :B
(एके काळचा वजीर्)केशवसुमार
स्वगतः कोण रे तो मोठ्याने हसला आम्ही बुद्धीबळ खेळायचे म्हणल्यावर.. X(
प्रतिक्रिया
अरेरेरे
वाचनीय माहिती वर्धक लेख.
मस्त गोष्ट
असहमत!
डांबिसकाका,
वा / समर्पक शिर्षक
चतुरंग
गुलाम वझीर!
अनवट माहिती
माहितीपूर्ण....
असेच म्हणतो !!!
ऋणी आहोत
रंगा,
_बाय द वे,
त्या शिव्या रंगासाठी नव्हत्या हो!:)
:)
मस्त
छान लेख, खेळही बघितला
पिडा शी सहमत
रंगा,
तात्या,
वा!!