गेल्या ३ वर्षांत कोणत्या माध्यमात किती मुलांनी प्रवेश घेतला याबाबत गेल्या आठवड्यात एक अहवाल प्रसिध्द झाला. हिंदी, मराठी नंतर इंग्लिशचा क्रमांक लागला. इथे एक उत्सुकता म्हणून हा कौल (किंवा सर्वेक्षण म्हणा) घेत आहे. मिपा सदस्यांमध्ये हे प्रमाण कसे आहे? हा, जरी उत्सुकता म्हणून हे सर्वेक्षण घेतले असले तरी त्यावरून काही निष्कर्ष काढण्याचे हक्क सर्वांनाच देत आहे :-)
-भाई (मराठी माध्यमवाला)
मी मराठीमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले.......
शास्त्र गणित सगळं मराठीत....
आपला
( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा )
भडकमकर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मी सुद्धा मराठी माध्यमात दहावीपर्यंत शिकलो . नववी-दहावीला मराठीच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांच्या अजूनही संपर्कात आहे :)
विशेष म्हणजे माझी आई त्याच शाळेच्या इंग्लिश माध्यमाला हिंदी आणि मराठीची शिक्षिका होती :)
ती आता निवृत्त झालीय.
-----
अवांतरः कुणाला उत्सुकता असल्यास -- महाराष्ट्रीय मंडळ, गुलटेकडी - पुणे.
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या नाहीत!
पण काय करणार आम्ही शिकलो आई बाबांनी शिकवून आणि क्लासमधे जाऊन....
१ ते ४ थी : रा ना सामाणी विद्यालय,कोल्हापूर.
५ ते १० वी : स म लोहिया हायस्कूल,कोल्हापूर.
११,१२ वी : न्यू कॉलेज ,कोल्हापूर.
संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी)....
>>संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी)....
मी पण तिथलाच ...
कुठली बॅच ? व्य. नी. वरुन संपर्क साधा ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रसाद मुळे
इयत्ता १ ली फ
सरस्वती भुवन प्रशाला
औरंगाबाद ४३१००१
(१ली ते १०वी जवळ्पास प्रत्येक मास्तराचे टोले अन प्रत्येक मास्तरणीच्या चापटा खाल्लेला)
(१ली ते १०वी जवळ्पास दिवसातुन एकदा तरी वर्गाबाहेर अंगठे धरलेला)
(शाळा संपल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडलेला)
-आंद्या फ
नवीन मराठी शाळा, अहमदनगर
(अत्यंत उत्तम शिक्षक/शिक्षिका लाभले हे भाग्य! अवांतर - ह्या शाळेत लाकडी पट्ट्यांची मारामारी आणि सतरंजीत गुंडाळून मुलांना चोपणे हे नियमाने केले.)
पाचवी ते दहावी - अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल.
(पुन्हा एकदा तळमळीने शिकवणारे शिक्षक भेटले ही आयुष्यभराची शिदोरी मानतो! :) अवांतर - सायकलीवरुन पाठलाग आणि पाडापाडी, चेंडूने रप्पाधप्पी पासून ते मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणे इत्यादी सर्व उद्योग केले. )
चतुरंग
१-४ भावे प्राथमिक, सदाशिव पेठ, पुणे ३०
५ वी भावे हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे ३०
६वी ७वी जोग हायस्कूल, कोथरुड पुणे २९
८वी ते १०वी सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना पुणे ४
असा होता माझा शिक्षण प्रवास. एकदा आमच्या शाळेतल्या म्हेत्रे सरांना मी म्हणले होते "सर , मी लई शाळा पाहील्या आहेत." :)
पुण्याचे पेशवे
मराठी १ ते ४ थी ...आलेगावकर प्रशाला..खडकी,पुणे ... (शाळेच्या पहिल्याच दिवशी बाईना येनार्या संकटांची जाणिव झाली असावी...अन् थोडयाच काळात 'डोक्यावर मिरे वाटतोस' असा म्हणनार्या व्यक्तिंच्या संख्येत भर पडली :)
४ थी ते १०वी स्वामी विवेकानंद,दापोडी,पुणे..१२ (हा पिनकोडयोग अगदी जुळुन आलाय ;)
आणि शाळेत कोंकणी बोलू नये असा दंडक होता. पण तो कडकपणे पाळला जात नसे. त्यामुळे शाळेत वर्गाबाहेर अर्धा वेळ मुले कोंकणीत बोलत.
घरी फक्त मराठीत बोलणेच चाले. लहान मुलांची मासिके फक्त मराठीच विकत आणत. इंग्रजी बोलणे घरात (गृहपाठ, घोकंपट्टी सोडल्यात) वर्ज्य नव्हते. वाचणे, लिहिणे अर्थातच कुठल्याही भाषेत आमच्या घरात वर्ज्य नव्हते. शालेय वयात लिखाण ९०% इंग्रजीतच झाले.
मराठी लेखनाचा मला सराव नाही, म्हणून त्यात कमकुवतपणा जाणवतो. मिपा वगैरे संकेतस्थळांवर मराठीतून लिहून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे.
त्यामुळे :
"डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा"
मध्ये फक्त "डिंभक" शब्दाचा माझा अर्थ चुकला, बाकी शब्द समजले. स्वतःची पाठ थोपटून घेताना हात मुरगळला, तो आता दुखतो आहे.
१ ते १० तुकडी अ (अपवाद २ री ब)
म.ए.सो. प्राथमिक आणि पेरूगेट हायस्कूल.
८ वी पर्यंत मराठी त्यानंतर शास्त्र, गणित इंग्लीश मधे.. आम्हाला इंग्लिश शिकवणार्या बाई मराठी मधून ईंग्लिश शिकवायच्या :-)
५ ते १० तुकडी अ
म.ए.सो. माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय, बारामती.
१०वी पर्यंत सुध्द म्हराटी ;)
आमच्या शाळेत भावे सरांचा मराठीचा तास संस्कृतप्रचुर, इंग्रजीच्या पोतनीस सरांचा तास चित्रकलासंपन्न आणि संस्कृतचा तास पुन्हा भावे सरांचा तोही छान मराठीपुर्ण :)
बाकी यत्ता ९वीत वेलणकर मास्तरांचा इंग्रजीचा तास त्यांच्या थापा ऐकायसाठी म्हणून आम्ही आवडीने बसायचो ;)
१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून.
शिक्षक-शिक्षिका चांगल्या भेटल्या. त्यांना तसे वाटते का ते माहीत नाही, कारण अजून पण आमची आठवण काढतात असे ऐकून आहे :-)
१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून.शाळेत आमची बॅच शास्त्रगणित इंग्रजीतूनची पहिली बॅच!
शिक्षक-शिक्षिका चांगल्याच भेटल्या,
अजूनही आमची ,आमच्या सगळ्या बॅचची आठवण काढतात,:)
हे नुसते ऐकूनच नाही तर मागच्या भारतवारीत शाळेत गेले असताना काही जुन्या शिक्षकांच्या भेटीचा योग आला,त्यांच्याकडूनच ऐकले,:)(अर्थात आता आमच्या वेळचे एखाददोन वगळता जवळ जवळ सगळे शिक्षक निवृत्त झाले असल्याने ती पूर्वीची शाळा राहिली नाही असे वाटले खरे..)
स्वाती
मी ही दहावीपर्यंत मराठीत
१ली ते २ री - श्रीरंग, ठाणे
२ री ते ३ री - दांडेकरवाडी, भिवंडी
४थी- विद्याविहार, अंधेरी
५ ते १०वी वर्सोवा वेल्फेअर, सात बंगला, अंधेरी
मी १ली ते १०वी मराठी माध्यम.. ८वी ते १०वी सायन्स, गणित इंग्लिश मधून..
१ली ते ६वी - अभिनव मराठी...
७वी ते १०वी - म्.ए.सो. चे सौ विमलाबाई गरवारे हायस्कुल..!
चांगले शिक्षक? ह्म्म.. माहीत नाही.. त्यांना काही फार गुणी स्टुडंट मिळाली नाही इतकं नक्की.. :))
(वर्गात अखंड बडबड करणारी)भाग्यश्री...
मराठी नाना मी तुमच्याशी सहमत आहे. मी एक नवीन कौल लावलाय " तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या माध्यमातुन शिक्षण देत आहात कि॑वा द्याल" त्याचा निकाल हेच दाखवतो.
९८ टक्के लोक मराठीत शिकुन चांगले कर्तेसवरते कमावते चांगल्या कंपनीत कामाला आहेत पण स्वतःच्या पोरामचे नुकसान (म्हणजे नक्की काय) होवु नये म्हणुन आंग्ल भाषेच्या शाळेत घालुन त्यांचा पोपट (अककल शुन्य बडबड करणारा ) करतातमराठीत शिकुन तुम्ही जर कर्तृत्व गाजवु शकता तर तुमची मुले गाजवणार नाहित कशावरुन?
पण लोकान्ना पटत नाही. खुप दु:ख वाटते. मराठी माणसा जागा हो रे.
बातमी वाचा
मराठी असे आमुची शिक्षणभाषा
http://esakal.com/esakal/esakal/05022008/rightframe.html
--समृद्ध गुलाम बिचारे
नाना चेंगट यांनी वापरलेल्या या शब्दांवर माझा आक्षेप आहे. असच म्हणायच असेल तर जे जे लोक नोकरी करतात त्या सर्वानाच गुलाम म्हणावे लागेल. फक्त अनिवासी महाराष्ट्रीयनच का?
शिवाय कित्येक निवासी महाराष्ट्रीयनही भारतातील कंपनी मधे नोकरी करीत असताना कंपनीच्या कामासाठी दिर्घकालीन परदेशी वास्तव्य करून आहेत.
ईश्वरी
बालवाडी ते बारावी!
बालवाडी ते ७वी - मराठी माध्यम
८वी ते १० वी - सेमी इंग्रजी
११वी ते १२वी - इंग्रजी
(ए तुकडीतला वात्रट कार्टा) टिंग्या ;)
अवांतर - आमचा वात्रटपणा तेव्हापासुनचा बरं का! :D
नमस्कार
शुभ सकाळ मित्रा॑नो
माझे सर्व शिक्षण सुभेदार वाडा (कल्याण)नामक मराठी माध्यमातील शाळेत झाले.
अगदी महाविद्यालया पर्य॑त (बिर्ला महाविद्यालय)
आपलाच
(सोमण मास्तरा॑चा प्रेमळ विद्यार्थी )
विवेक वि.
१ ते ४ थी : बापट बाल विद्यामंदिर, सांगली (तुकडी 'ड').
५ ते १० वी : सिटी हायस्कूल, सांगली (तुकडी 'अ').
११,१२ वी : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली.
विद्युत अभियांत्रिकी: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली.
सध्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई येथे विद्यावाचस्पती (ओळखा पाहू, म्हणजे काय ते? ;) ) पदवीसाठी कार्यरत आहे.
१-४ जिल्हा परिषद शाळा, मोखाडा (जि. ठाणे)
५-१० रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, मोखाडा
११-१५ केटिएचएम कॉलेज नाशिक
पत्रकारिता एचपीटी कॉलेज, नाशिक
दहावीपर्यंतच्या शाळेत आदिवासी विद्यार्थी बहुसंख्याक होते. त्यातही रयतच्या शाळेचे नियम फारच वेगळे. डोक्यावर पांढरी गांधी टोपी. हाफ चड्डी (दहावीपर्यंत) आणि मुलींनाही फ्रॉक. आदिवासी मुले मुळातच उशीरा शाळेत दाखल व्हायची. त्यामुळे दहावीतला मुलगाही अनेकदा सतरा, अठरा वर्षासारखा असायचा. काहींची तर लग्न झालेली, ठरलेली असायची. (मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असता ना माझ्या एका आदिवासी मित्राला तीन मुले झाली होती.). शाळेतली शिक्षकही भारी. यल, यम, यन अशी इंग्रजी बाराखडी शिकवणारे. पाचवीत आलो तेव्हा गोटखिंडीकर सर नावाचे मुख्याध्यापक होते. यांना इंग्रजी बोलण्याचा भारी सोस. शाळेतल्या जेमतेम चौथी शिकलेल्या शिपायाशी ते इंग्रजीत बोलत. पण मुले जवळपास सगळीच दारिद्र्य रेषेच्या खालची. काही तर अतिशय हुषार. पण पैसा नसल्याने शिकायच्या वाटा बंद झालेली. कधी कधी काहींच्या आठवणीने विषण्ण व्हायला होतं.
मला इग्रंजी येत नाहि.कारण जेव्हा ५वी त इग्रंजी सुरु झाले तेव्हा पुर्ण वर्ष वर्गाबाहेर उभे राहुन शिकले.
सरस्वती सेंकडरी स्कूल.(टिळक सरांची शाळा) मराठी माध्यम ५ ते १० वी ब वर्ग.
आमचं मराठी (किंवा आमचं इंग्रजी ) यावर आम्ही इथं खूप काही लिहिलं आहे. आणि तेही सगळं खरं खरं... अगदी अक्षर नं अक्षर खरं आहे....
तरीही थोडंसं इथेही लिहीण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून...
आम्ही पहीली ते चौथी आमच्या गावातल्या शाळेत शिकलो... शाळेचं नाव रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव कॉंड
पाचवी ते बारावी आम्ही गोरेगावच्या शाळेत शिकलो...शाळेचं नाव ना म जोशी विद्याभवन गोरेगाव - रायगड
दोन्ही शाळा मराठीच (अगदी अकरावी बारावीला विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम इंग्रजीत होता तरी प्राध्यापक मराठीतच शिकवायचे. परीक्षा मात्र इंग्रजीत द्यावी लागायची)
जाता जाता पुन्हा सागांवंसं वाटतं... आम्ही मराठीतूनच शिकलो... आणि तरीही आम्ही कुठे मागे पडलो नाही... हा आता थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली... पण त्यात काही विशेष नाही...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो.
मी २००० च्या सिटी हायस्कूल बॅच चा विद्यार्थी, २००६ ला वालचंद मधून बी.ई. झालो.
(कृष्णाकाठचे ऋण कधीही न विसरु शकणारा)
चावटमेला
१ ली ते ४ थी गुजराती माध्यम सुर्तेला मग ५ ते १० मराठी माध्यम खोडाल्याला. मग ११ वी dnanvardhini baswant college शापुरात.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
१ ते ४ थी जिल्हा परिषद शाळा मोखाडा (जि. ठाणे)
५ ते १० रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय मोखाडा (जि. ठाणे)
११ ते १५- केटिएचएम कॉलेज नाशिक
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
१ली ते ४थी - पुणे विद्यार्थी गृह, पुणे
५वी ते ७वी - ए एम आय [ऑल महाराष्ट्र इंस्टिट्युट], पुणे. ही शाळा लॉ कॉलेज रस्त्यावर आहे. आता नाव बदललेले आहे.
८वी ते १०वी - एम आय टी, पुणे. सेमी ईंग्लिश.
एक दीड वर्षाचा असताना भिवंडिजवळ पडघे नावाचे गाव आहे, तेथे रहात होतो. वडिल भिवंडिला मराविमंमध्ये होते. तर पडघ्याला कॉन्हेंट बालवाडीत जायचो, एका चर्चमध्ये. पण नंतर पुण्याला आल्यानंतर मराठी शाळेत [बालवाडी] जावु लागलो. सुरवातीला मराठी [अबकड] काही समजायचेच नाही त्यामुळे झोपुन जायचो :)
- संताजी धनाजी
शिशू वर्ग ते ४थी ब्राह्मण शिक्षण मंडळाचे, ब्राह्मण विद्यालय ठाणे.
५ वी ते १० वी पी. ई. सोसाईटीचे न्यू इंग्लिश स्कूल {संपूर्ण मराठी माध्यम (८- १० विज्ञान आणि बीजगणित सुद्धा) }
ठाणे. आजही तेथील जुने शिक्षक भेटले की आनंद होतो....मलाही आणि त्यांनाही....{ म्हणजे दिसताच गल्लीत पळ काढणे, रस्ता ओलांडणे असे प्रकार दोन्ही बाजूनी घडत नाहीत :) }
एच.बी.
ठाणे
मराठीतूनच शिक्षण
मॉण्टेसरी ते १० वी डॉ बेडेकर विद्या मंदिर ठाणे,
मुलीला मराठी शाळेतच घातली आहे.
(मोठेपणी नुकसान केले म्हणून शिव्या खायची तयारी ठेवली आहे).
खराटा(रंग माझा वेगळा)
शिक्षणाचे माध्यम
In reply to शिक्षणाचे माध्यम by भाई
शिक्षणाचे माध्यम
मी
In reply to मी by भडकमकर मास्तर
मास्तर तुम्हाला दंडवत
माझेही
In reply to माझेही by यशोधरा
सहमत ...
८ वी -
मराठी
अरे वा !
In reply to अरे वा ! by शितल
अरे वा
सगळी कोल्हापुरची मंडळी आहेत वाटते?
In reply to सगळी कोल्हापुरची मंडळी आहेत वाटते? by स्वाती राजेश
अरे वा
In reply to अरे वा by राजे (verified= न पडताळणी केलेला)
हो....
In reply to हो.... by स्वाती राजेश
मी पण कोल्हापुरकर :)
In reply to सगळी कोल्हापुरची मंडळी आहेत वाटते? by स्वाती राजेश
मी पण..
In reply to सगळी कोल्हापुरची मंडळी आहेत वाटते? by स्वाती राजेश
मी पण कोल्हापूरी.......
In reply to मी पण कोल्हापूरी....... by तात्या विंचू
काय सांगता ?
मराठी
सध्या - बेंगलुरु
१० वी ब
१ ली फ
पहिली ते चौथी
मी पण...
मी पण मराठी माध्यमातून शिकलेला
मराठी १ ते
In reply to मराठी १ ते by शिंगाड्या
४ थी फारच आवडलेली दिसते!
In reply to ४ थी फारच आवडलेली दिसते! by चतुरंग
अरे हो जरा
मी ही
इंग्रजी माध्यमात शिकलो
म. ए. सो. मुलांचे विद्यालय..
In reply to म. ए. सो. मुलांचे विद्यालय.. by एक
म. ए. सो. मुलांचे विद्यालय..
मराठीतूनच
In reply to मराठीतूनच by विकास
मराठी..
मी ही मराठीच :)
मी मराठी...
मराठी...
मी १ली ते
मराठी...
कल्याणी
In reply to कल्याणी by रविराज
चिरीमिरी
दांडगट शाळेतून...
माझी शाळा.....
आमचा प्रवास..
In reply to आमचा प्रवास.. by विसोबा खेचर
मो ह विद्यालय, ठाणे.
१ ते १०
मराठी
सहमत
अर्थात मराठी
आक्षेप
In reply to आक्षेप by ईश्वरी
खरड वाचा
नु.म.वि. - पुणे
नुसते मवाली विद्यार्थी, पुणे २.
In reply to नुसते मवाली विद्यार्थी, पुणे २. by ब्रिटिश टिंग्या
नूमवीय
In reply to नूमवीय by llपुण्याचे पेशवेll
कारण ते
In reply to नुसते मवाली विद्यार्थी, पुणे २. by ब्रिटिश टिंग्या
चूकून २दा झाला
दुर्दम अर्बुद
In reply to दुर्दम अर्बुद by विसुनाना
'दुर्दम
टिळकनगर
सुभेदार वाडा
माझेही १०वी पर्यंत मराठी माध्यमच..
५ ते १०
सरस्वतीय
कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, मोखाडा
मराठी!!!!
In reply to मराठी!!!! by चावटमेला
अरे वा!
मला
सेमी
होय... आम्ही मराठीतूनच शिकलो...
अरे वा!
माझ शिक्षण
मी
भेळ
आम्ही रयतेची लेकरं
१ली ते ४थी -
संपूर्ण मराठी
मराठी