नुकतेच कॉंग्रेसने ग्राम ते सेवाग्राम नावाचा कार्यक्रम केला. राजमाता सोनियाने आपल्या उपस्थितीने ह्या कार्यक्रमाला "चार चांद" लगावले.
http://72.78.249.107/esakal/20101015/5539132099363826945.htm
त्याआधी माणिकराव व अन्य कुणीतरी तसेच तेजस्वी रत्न यांच्या प्रांजळ चर्चेत अशी बाब उघडकीस आली की राजमातेच्या सभेकरता आणि अन्य कार्यक्रमाकरता कोट्यावधी रुपये मंत्र्यांकडून वसूल करण्यात आले. ( अर्थात सगळे मंत्री हे सेवेचे व्रत घेऊनच राजकारणात उतरले आहेत. त्यामुळे ते आपल्याच खिशात हात घालून तो सगळा खर्च करतील ह्याची खात्री आहे. सामान्य जनतेवर त्याचा पैशाचाही बोज पडणार नाही ह्याबाबत निर्धास्त असावे.)
स्वतः राजमाता असा कोट्यावधींचा त्याग रोजच करते त्यामुळे तिला त्यात काही विशेष वाटलेले दिसले नाही. चालायचेच.
पण ह्या सभेचे मिरवणूकांचे जे फोटो दिसतात त्यात भारताच्याच झेंड्याचे रंग असलेले असंख्य काँग्रेसचे झेंडे लोक मिरवताना दिसतात. तर अशाने ध्वजसंहितेचा भंग होत नाही का?
कुठल्याशा राजकीय पक्षाने देशाचा झेंडा एक प्रकारे बळकावून देशाची प्रतिष्ठा हायजॅक करायचा हा प्रकार नाही का?
इथे ध्वजसंहितेचे जाणकार मोठ्या संख्येने आहेत. कुणी सांगेल का?
बाकी कुठल्या पक्षाने असे केले तर त्याला ते स्वातंत्र्य आहे का?
वाचने
2321
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशोक चक्र नसल्यामुळे सदरहू
६० वर्षांपूर्वी, देशभक्ती
In reply to अशोक चक्र नसल्यामुळे सदरहू by शुचि
अरेरे
मला जास्त माहित नाही, पण
In reply to अरेरे by नितिन थत्ते
कुठल्याशा राजकीय पक्षाने
In reply to अरेरे by नितिन थत्ते
सेवाग्राम
ध्वजसंहिता बरीचशी