धारयते स: धर्म:
श्री. यनावाला व त्यांच्या विचारसरणीचे लोक थोडा एकांगी विचार करत असतात असे वाटते. पहिली गोष्ट म्हणजे धर्म व कर्मकांड यातील फरक ते लक्षात घेतातच असे नाही. चतुर्थीला चंद्रोदयानंतर जेवण, उपासाला चालणारे/न चालणारे पदार्थ, श्राद्धाला करावयाचे पिंड, इत्यादींना विरोध करतांना ते या गोष्टी म्हणजे धर्म नव्हे या कडे दुर्लक्ष करतात. या कांडांना "चुकीचे" असे गेली हजारो वर्षे शेकडो संत/ अभ्यासक सांगत आले आहेत. तेही अयशस्वी झाले याचे कारण सर्वसाधारण माणूस यांच्याप्रमाणे "विचारवंत" नसतो. (वैयक्तिक: यनावालांची तर्कक्रीडा साधारणत: ५% वाचकही सोडवू शकत नाहीत. जालावरील उच्चशिक्षित वर्गाची ही स्थिती तर सामान्य माणसाचे काय ? ) त्याला आधाराची गरज भासते तेव्हा तो धर्माकडे वळतो व त्याचे दुर्दैव हे की त्याला जास्तकरून भेटतात ते सत्यसाईबाबा, नरेंद्रमहाराज इत्यादी. हे खरा धर्म समजावून सांगण्यात कशाला वेळ घालवतील ? ते तुमच्या अडचणीला नागबळी हे उत्तर असे सांगतात व त्याला फ़िल्मीसितारे व क्रिकेटपटूही बळी पडतात. टिव्हीवर ते लाखो लोक पहातात व त्यांचाही विश्वास वाढत जातो. गतानुगतिक जन कांडाला बळी पडू लागतात ते यामुळे. याला तुमचा विरोध आहे का ? असेल तर मग तुमचा विरोध धर्माला / धार्मिकतेला नाही आहे.
धर्माची व्याख्या "धारयते स: धर्म: " अशी आहे. जनप्रवाहाला जो धारण करतो, त्याला मोडून देत नाही तो धर्म. काय सांगतो असा धर्म ? शेजार्याला मदत कर, चोरीमारी करू नकोस, भुकेल्याला अन्न दे, वगैरे. याला कोणी का विरोध करावा ? व याला मी विरोध करतो म्हणून मी विचारवंत अशी शेखी मिरवावी ? अनिष्ट गोष्टी कशात नाहीत ? सर्वात आहेत त्याप्रमाणे धर्मातही आहेत. विरोध करावयाचा तो त्यांना करा ना ! तुम्ही धर्म मोडावयास निघालात तर तो एखादेवेळी मोडेलही; पण पहिल्यांदी चांगल्या गोष्टी नष्ट होतील. वाईट प्रथा जास्त चिवट असतात. त्या तुम्हाला पुरून उरतील. तुम्हाला तसे व्हावयास पाहिजे आहे का ?
मी एकदा श्री. यनावालांना म्हणालो होतो, " खरे तर तुमचाच देवावर जास्त विश्वास पाहिजे. तुमच्या घरातील मोलकरीण आज तुमच्या घरात चोरी करत नाही कारण तिचा देवावर विश्वास आहे. तिची गरज असली तरी ती पैसे पळवत नाही. आपण असे का करत नाही याचे तिला कारण सांगता येणार नाही पण तुम्हाला ते नक्कीच कळत आहे. तुमच्या विचारवंत नसलेल्या मोलकरणीचा धर्मावरचा विश्वास उडाला की पहिला बळी पडणार आहे तो तुम्हा विचारवंतांचा. या तथाकथित "अडाणी" लोकांच्या मनातील धर्म नाहिसा करा, ते हातात बडगा घेतील व मग पहिले टाळके फुटणार ते तुमचे." हिटलरच्या ताब्यात सत्ता आल्यावर आईनस्टाईनला पळावे लागते.
गाडगेमहाराज विचारवंत होते का ? शाळेतले शिक्षणही न झालेल्या त्या महात्म्याला तुम्ही विचारवंत नक्कीच म्हणणार नाही पण त्यांनी तुम्हा विचारवंतांपेक्षा धर्मावर जास्त कठोर प्रहार जन्मभर केले. आणि महत्वाचे म्हणजे हे सर्व त्या तळागाळातील माणसांना जास्त धार्मिक बनवण्याकरिता. शनी शिंगणापूरात आम्ही चोरी करून दाखवतो हे सांगणे काय विचारवंतांचे लक्षण ?
शेवटी एक प्रश्न. विचारवंत व धार्मिक कोणाला म्हणावयाचे ? नोबल पारितोषक मिळाले, मी हिंदुस्थानातला सर्वात श्रीमंत झालो, देशाचा मंत्री झालो म्हणजे मी विचारवंत झालो का ? रिक्षाचे मीटर फास्ट करण्यात काय चूक असे सांगणारे एक थोर विचारवंत पुण्यात आहेतच म्हणा. तेच धार्मिक बद्दल. रवीवारी चर्चला जातो, चतुर्थीला सिद्धी विनायकाला जातो तो धार्मिक ? मग देवाचा एक फोटोही घरात नसणारा, देवळात न जाणारा, पण पदरमोड करून विद्यार्थी सहाय्यक समितीला पैसे पाठवणारा ?
शरद
वाचने
5915
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>गाडगेमहाराज विचारवंत होते
आवरा !!
आपण
In reply to आवरा !! by परिकथेतील राजकुमार
अहो मग घोळवायचाना मला लगेच.
In reply to आपण by प्रिया देशपांडे
तुम्ही
In reply to अहो मग घोळवायचाना मला लगेच. by परिकथेतील राजकुमार
अरे रे ! कामात खुप व्यग्र
In reply to तुम्ही by प्रिया देशपांडे
धन्यवाद
In reply to अरे रे ! कामात खुप व्यग्र by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद. मी देखील तुम्हाला
In reply to धन्यवाद by प्रिया देशपांडे
>>मग देवाचा एक फोटोही घरात
सुंदर लेख
शरद राव
सदस्य क्रमांक ९१
In reply to शरद राव by रामदास
धन्यवाद देऊन आलो.
In reply to सदस्य क्रमांक ९१ by सहज
सहमत!
In reply to शरद राव by रामदास
सर्व
श्री. यनावाला यांचे लेखन मी
छान
शरदकाका
+१
In reply to शरदकाका by प्रियाली
हा लेख उपक्रमावर टाका.
In reply to शरदकाका by प्रियाली
हा लेख उपक्रमावर टाका.
In reply to शरदकाका by प्रियाली
असहमत
In reply to शरदकाका by प्रियाली
ते ग्राउंड
In reply to असहमत by मिसळभोक्ता
सहमत, पण
In reply to ते ग्राउंड by प्रियाली
गलतीसे मिष्टेक
In reply to सहमत, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख खूप आवडला.
लेख आवडला. छान आहे. पटला.
>>रवीवारी चर्चला जातो,
आवडला
अवांतराशी सहमत. ज्यांना हा
In reply to आवडला by चेतन
इकड काय, अन तिकडं काय
In reply to अवांतराशी सहमत. ज्यांना हा by अवलिया
गमतीशीर लेख