एका जेलियाने
डान्राव हे आमचे फार जुने मित्र आणि थोडे जुने राको (राकोचा अर्थ विचारण्यासाठी कृपया व्यनी आणि खरडी वापरू नयेत. तुम्हाला राकोचा अर्थ माहित असेल तर तुम्ही नशीबवान आणि माहित नसेल तर तुम्ही आनंदी (आठवा: अज्ञानात आनंद असतो)). डान्रावांच्या प्रदीर्घ कारकीर्दीवर 'एका जेलियाने' नामक पुस्तक लिहीण्याचा मानस आम्ही अनेकदा जाहिर केला आहे. आता प्रश्न असा पडेल की जेल या इंग्लिश शब्दाचा (खरंतर शब्दांचा gel आणि jail) इथे काय संबंध? तर संबंध आहे. डान्राव डोक्यास जेल (gel) लावतात आणि अनेकोत्तम सामाजिक कार्यांचा ध्यास घेऊन डान्राव जेलमधे जातात. (अर्थात लोकं या अनेकोत्तम कामांना तुंबडी भरणे म्हणतात आणि डोक्याच्या जेलला चार वडे तळून होतील इतकं तेल म्हणतात हा 'इनो'मय भाग निराळा! त्याची चर्चा आपण इथे करणार नाहीत.)
डान्रावांची राको म्हणून 'एका जेलियाने' हे पुस्तक लिहीण्याची जबाबदारी अर्थातच आमच्यावर येऊन पडली. तसंही 'हा जेल नावाचा इतिहास आहे' हे डान्रावांचं हे सव्वातीन ओळींचं खंडकाव्य अलिकडेच फार प्रसिद्ध झालं आहे. आणि आतल्या गोटातली बातमी अशी आहे की या खंडकाव्याला आयटी वाईफ स्वयंपाक समितीचा बहुमानाचा 'कुकर' पारितोषिकही मिळणार आहे. (अर्थात पारितोषिकप्राप्त पुस्तकाची निवड करणार्या समितीत श्री.श्री. पूजावाले गुर्जी, स्विडीश चिंग्या, खानेसुमार गुर्जी, मस्त सिकंदर आणि खुद्द आम्ही होतो ही बाब निराळी!) तर 'एका जेलियाने' लिहीण्याची जबाबदारी आमच्यावर पडली. पण अलिकडेच बेरकेवाडी म्हैला मंडळाला फ्लेक्स बनवण्याचे नवीन कंत्राट मिळाल्यामुळे आम्ही फार बिस्सी झालोत. तेव्हा आम्ही या पुस्तकाला फक्त प्रस्तावना लिहायची आणि आमचे अतिपरममित्र श्री. चंंद्रराज गवार यांनी पुस्तक लिहायचं अशी तडजोड मान्य करण्यात आलेली आहे. या प्रस्तावनेसाठी काही संदर्भांची जमवाजमव करत असतानाच जनतेचे डान्रावांबद्दल काय विचार आहेत हे 'बहुतांची मंतरे'मधे वाचावयास मिळाले. तर आमचे डान्रावांबद्दलचे विचार जगजाहीर आहेतच, आता जनतेच्या विचारांची दखल घ्यावी म्हणून याच विचारांचे संकलन करून आम्ही 'एका जेलियाने'ची प्रस्तावना लिहीली. तीच प्रस्तावना इथे आम्ही लेखस्वरूपात मिपावर मांडत आहोत.
डान्राव त्यांच्या अनेकविध कारनाम्यांमुळे प्रसिद्ध आहेत. डान्रवांच्या कर्तृत्वासमोर आपण किती खुजे आहोत याची वारंवार कल्पना येते. उदा: त्यांचे केस. अनेकदा खासगीत आणि जाहिररित्या अनेक मुलींनीही डान्रावांना केशसंवर्धानासाठी टिप्स मागितल्या आहेत, अनेक राजकारण्यांनी, उदा आपले धमालचंद्रपंत, डान्रावांना त्यांच्या सुप्रसिद्ध धवलस्मितासाठी टिप्स मागितल्या आहेत. डान्राव किती महान आहेत आणि कोणीकोणी त्यांच्याबद्दल काय गौरवोद्गार काढले हे लिहायचं असेल तर चार डान्राव लागतील. तर एवढं सर्व डीट्टेलवारी लिहीण्याऐवजी डान्रावांच्या विविधरंगी कर्तबगारीचा एक सांख्यिकी लेखाजोखा आपण घेऊ या.
डान्रावांची एकूण जालिय आणि आंतर-जालीय प्रतिमा ही वेगवेगळ्या सदरांमधे विभागता येईल:
१. डान्रावांची कल्पकता: गरजूं*नी पुणेरी पाट्या, पिझ्झा हटमधली संध्याकाळ, इ.इ. लेख पहावेत.
२. डान्रावांची लेखनलांबी: यात डान्रावांनी लिहीलेली विविध खरडखेचरं (ही धमाल मुलगा, आनंदयात्री (जिवंत आहेत का?), मस्त कलंदर, बिपिन कार्यकर्ते, ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्या खवमधे मिळतील) आणि डान्रावांचे प्रतिसाद (राजकीय विषयांवरचे विविध प्रकार आणि लांबीचे धागे उसवावेत) येतात.
३. डान्रावांचे केसः याबद्दल बहुत काय बोलणे
४. डान्रावांची डॉन ही प्रतिमा: यात डान्रावांनी व्यसनांशी दिलेला लढा येतो
५. डान्रावांचे वायदे: डान्रावांना अतिपूर्वीच 'वायदा-इ-आझम' असा किताब (ते स्वतः खिताब म्हणतात!) मिळालेला आहे.
६. डान्रावांची एकूणच जालिय आणि जालबाह्य प्रतिमा: यासाठी मात्र सखोल आणि स्वयंपूर्ण अभ्यासाचीच गरज आहे.
७. डान्रावांना देवत्त्व बहाल होणे: रजनीकांत इत्यादींना इत्यादी या कॅटेगरीत टाकणारी इतर विधानं डान्रावांना देवत्त्व बहाल करतात.
*गणप्याने बदनाम करण्याआधी हा शब्द चांगल्या अर्थाने वापरत.
तर वाचकांच्या पत्रव्यवहारात डान्रावांबद्दल एकूण १०६ विधानं करण्यात आलेली आहेत. पैकी कल्पकतेबद्दल २०, लेखनलांबी आणि वेग याबद्दल १०, डॉन प्रतिमेबद्दल ३, वायद्यांबद्दल २, डान्रावांच्या एकूण प्रतिमेबद्दल २२ आणि डान्रावांना देवत्त्व बहाल करणारी एकूण १७ विधानं आहेत. पण विजयी वीर आहेत डान्रावांचे केस, या केसांबद्दल एकूण ३२ विधानं आहेत. एकूण विधानांच्या एक तृतीयांश, ३३% विधानं डान्रावांच्या केसांबद्दल आहेत यावरून डान्रावांच्या केसांच्या महतीची कल्पना यावी. आजपर्यंत युवतींच्या केसांवर काव्य रचलेली आहेत, पण डान्रावांसारख्या निधड्या छातीच्या राजकारणी अभियंत्याच्या केसाबद्दल केसभरही वाङ्मय नव्हतं. आज ते सर्व जगासमोर उपलब्ध आहे याचा मला फार अभिमान वाटतो.
डान्रावांचे वायदे आणि त्यांची डॉन ही प्रतिमा (पक्षी: व्यसनांविरोधात लढा) हे डान्रावांचे स्वभावाचे पैलू मात्र अतिदुर्लक्षित आहेत किंवा जनसामान्यांना त्याबद्दल फार चौकशी नाही असं दिसतं. त्यावरूनच राजकारण्यांनी वायदे करावेत आणि ते विसरावेत याला जनता नेहेमीचंच मानते असं दिसतं. एवढंच नव्हे तर, राजकारण्यांचं व्यक्तीगत आयुष्य चव्हाट्यावर आणू नये ही सुद्धा तमाम जनतेची इच्छा दिसते आहे.
डान्रावांच्या लेखनलांबीबद्दलही घसघशीत (१०% ;-) ) विधानं आली आहेत. आणि डान्रावांच्या एकूण, सम्यक प्रतिमेबद्दल २०% आहेत. यावरून डान्रावांच्या लिखाणाची योग्यता आणि प्रसिद्धी मोजता येणार नाही. डान्रावांची प्रतिमा, म्हणजे डान्राव आंघोळ करतात का, फेस आणतात का वगैरे बद्दल लोकांच्या मनात फार खळबळ आहे असं दिसतंय. वरवर पहाता हा सर्व जनतेचा कौल दिसत आहे तरीही याला एक वेगळीच किनार आहे. डान्रावांच्या प्रतिमेविषयी एका सलज्जविरहीत जनसामान्याने बरेच लिखाण केले आहेत आणि त्यानेच डान्रावांच्या एकूण प्रतिमेविषयी बहु लिखाण केलेले आहे. सदर इसम डान्रावांचा मोठा चाहता असावा आणि डान्रावांबद्दल घाऊक प्रसिद्धी करण्यात सदर इसमांस रस असावा असे दिसते. याच्या विपरीत दोन सज्जन आहेत ज्यांनी डान्रावांबद्दल बर्याच वेगळ्या प्रकारची बरीच विधानं केली आहेत. पैकी एकांचा डान्रावांच्या कार्याशी दाट परिचय असावा अशी शंका येते. आणि दुसरे सद्गृहस्थ आहेत त्यांचा डान्रावांशी परिचय नसावा. डान्रावांशी परिचय नसणारा माणूस विरळाच, पण सुदैवाने अशा बर्याच लोकांनी डान्रावांबद्दल लिहीताना लेखणी मोकळी सोडून डान्रावांना देवत्त्व बहाल केलेले दिसत आहे.
डान्रावांसारख्या डोंगराएवढ्या डूडी, डॅशिंग, ढासू व्यक्तीमत्त्वाबद्दल लिहीण्याची खरंतर माझी प्राज्ञा नव्हतीच. डान्रावांच्या महान कार्याच्या आठवणीनेच छाती दडपून जाते. पण मस्त कलंदर, नंदन यांच्यासारखे आग्रही आणि प्रेमळ मित्रमंडळ, पूजावाल्या गुर्जींसारखे महान पथदर्शक, बिपिन, धमाल मुलगा यांच्यासारखे कार्यकर्ते यांच्यामुळे आज मी 'एका जेलियाने'ला प्रस्तावना लिहीण्याची हिंमत केली. आता पुस्तक डॉनार्पण!! अधिक काय लिहीणे?
-- अदितीताई अवखळकर पाटील, मु. बेरकेवाडी, पो. अवखळवाडी
प्रतिक्रिया
सॉलीड गोष्ट आहे. उपद्रवमूल्य
साला पब्लिक कधी डोस्क्यावर
अजून काही नवीन पुस्तकं
हवा
अजून काही :)
;-)
द डॉन ओफ ऑल थिंग्स द व्हास्ट
डानंबनाची गरज नसलेली: अ
लैच जोरदार.. लेख वाचुन मला
हा धागा म्हणजे..
डान्या!!!!!!!!!!!!
+१
कोण तुम्ही ?
ह्याला म्हणतात घरचा अहेर तरी
नन्या, मन्या, सोन्या, नान्या
हम्म.
मस्त धागा. मजा येत
आणखी स्वतःशीच
लेख आवडला!
Pagination