✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निर्लज्ज व्हा - भाग ३

आ
आदिजोशी यांनी
Tue, 10/12/2010 - 11:56  ·  लेख
लेख
'निर्लज्ज व्हा' च्या ह्या तिसर्‍या भागात आपण जे काही बघणार आहोत त्याला समर्थपणे तोंड द्यायला किंवा त्यातून निव्वळ निभावून जायला निर्लज्जपणा सोबतच कमालीचा अफाट डांबरटपणा, थोडाफार निगरगट्टपणा आणि कोडगेपण आवश्यक आहे. त्याचं असं आहे की बॉस आणि नोकरी कोणत्याही क्षणी बदलू शकतात. ट्रेनमधे आपण रोज फार फार तर जाऊन-येऊन ३-४ तास घालवतो. पण बायको हा असा विषय आहे की जो भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवून फेस आणतो. मी मी म्हणणारे आणि बाहेर गर्जना करणारे नरसिंह घरात शिरायच्या आधीच आपली नखं आणि दात काढून ठेवतात. आमच्या एका कर्दनकाळ मास्तरांना सकाळी सकाळी केवळ धोतर नेसून कपडे वाळत घालताना पाहून मला बायको हा विषय काही तरी वेगळा आहे ह्याची बालपणीच जाणीव झाली होती. आमचे मास्तर सकाळी सकाळी केवळ धोतर नेसून कपडे वाळत घालत होते ह्यात काही वावगं नाही. पण त्यांची ती कसरत सुरू असताना त्यांची धर्मपत्नी समोर खुर्चीत बसून चहा पित होती हे महत्त्वाचं आहे. लग्न झालेल्या सगळ्याच पुरुषांच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच असं नाही. काही काही बायका मोठ्या मनाने कामवाली बाई ठेवायची परवानगी देतातही. पण ह्या पलिकडेही अनेक मानसीक ताण आहेत. सगळ्यात महत्त्वाचा ताण म्हणजे आपल्याला वेळेवर उठवायचा त्यांचा अट्टाहास. 'घड्याळ हे माणसाने वेळ मोजण्यासाठी तयार केलेलं यंत्र आहे. जगन्नियंता हाताला घड्याळ बांधत नाही. सकाळी ९ वाजून पंधरा मिनिटांनी पॄथ्वी निर्माण करीन. दुपारच्या जेवणानंतर हलकेच वामकुक्षी आटपून साधारण ५ च्या सुमारास माणूसाला जन्म देईन असं ब्रम्हदेवाने ठरवलं नव्हतं.' हे मी बायकोला लक्षवेळा ऐकवूनही ती त्यातून बोध घेत नाही. इतक्या स्ट्राँग अर्ग्युमेंटवर ती 'तू ब्रम्हदेव नाहीस' ह्या एका वाक्यात बोळा फिरवते. बायकोसोबत आयुष्य काढायचं असल्याने असे कैक समर प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. त्यातले काही आता आपण बघू. घटना १ - सामान्य दॄष्टीकोन वेळ - रविवार सकाळी कधीही पार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायको तुम्हाला उठवायच्या प्रयत्नात आहे. बायको - ऊठ बघू... तुम्ही - ५ मिनिटं... बायको - तो गजर बोंबलून बोंबलून शांत झाला... तुम्ही - खरंच ५ मिनिटं बायको - ५ मिनिटं ५ मिनिटं करत करत तास झाला. कितीवेळ झोपायचं ह्याला काही सुमार आहे की नाही. उठ बरं लवकर, मला मदत कर पटापट. किती कामं पडलेयत. तुम्ही - झोपू दे गं थोडावेळ. आज सुट्टी आहे. बायको - मलाही सुट्टी आहे, तरी मी उठले ना? तुम्ही - ह्या आठवड्यात मर मर काम केलंय. दमलोय मी. झोपू दे मला. (सुजाण नागरीकांनो आणि अजाण बालकांनो, तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी हे वाक्य जर तुम्ही उच्चारलं तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही.) बायको - काम केलंय म्हणजे? मी काम नाही करत? मी नाही दमत. तुम्ही - अगं पण... बायको - तू आपला घरी आलास की बसतोस तंगड्या पसरून. मला ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळावं लागतं. तुम्ही - मी सुद्धा मधून मधून मदत करतोच की तुला. बायको - डोंबलाची मदत. शेवटचं काम तू कधी आणि काय केलं होतंस सांग बघू. (खूप प्रयत्न करूनही आठवत नाही. आठवण्यासाठी मुळात कामं करावी लागतात.) बायको - नाही ना आठवलं. कसं आठवेल? आठवण्यासाठी मुळात कामं करावी लागतात. जरा इकडची काडी तिकडे करायला नको. तुम्ही - हे बघ, मला काड्या करायची सवय नाहीये. हॅ हॅ हॅ... (सुजाण नागरीकांनो आणि अजाण बालकांनो, तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी अशा प्रसंगी विनोदबुद्धीला आवर घातला नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही.) बायको - फालतू विनोद केलेस तर पातेलं घालीन डोक्यात... तुम्ही - मान अडकेल अगं तुझी... (विनोद नकोत) बायको - हे बघ, मी मस्करीच्या मूड मधे अजिबात नाहिये. बायको म्हणजे काय कामवली बाई वाटली तुला? आत्ताच्या आता उठ आणि पटापट मला आवरायला मदत कर. बायको आपल्याला बळजबरीने खेचून बेडवरून उठवते. रवीवार सकाळ लोळत घालवण्याच्या तुमच्या मनसुब्यांबर पाणी फिरवलं जातं. बेडवरून खेचून उठवण्याव्यतिरिक्त तोच इफेक्ट देणारे काही वेगळे उपायही बायको वापरू शकते - आईला फोन लावून आपल्याशी बोलायला लावणे (ह्याला पाहुण्याच्या काठीने साप मारणे असेही म्हणतात), पंखा बंद करणे, कुकरमधे नुसतंच पाणी घालून शिट्या होऊ देणे आणि सगळ्यात जालीम उपाय म्हणजे रडणे + बट्ट्याबोळ झाला माझ्या आयुष्याचा हे ऐकवणे. ह्या सगळ्याचा शेवट आपल्या मनासारखा व्हावा अशी इच्छा असेल तर उपाय फार सोपा आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------- घटना १ - माझा दॄष्टीकोन वेळ - रविवार सकाळी कधीही पार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायकोच्या पहिल्या हाकेलाच तुम्ही उठता. बायको - ऊठा... ८ वाजले. (तुम्ही ताडकन उठून बसता.) तुम्ही - अरे यार... इतका वेळ कसा झोपलो? गजर वाजलेलाही समजला नाही. जाग कशी नाही आली मला. बायको - काय झालं रे? तुम्ही - काही नाही गं, आज जरा आवराआवरी करायचा विचार होता. पण तू कशाला उठलीस इतक्यात? झोप अगं थोडा वेळ. किती दमतेस आठवडाभर. ऑफिस घर दोन्ही सांभाळता सांभाळता पिट्ट्या पडतो अगदी तुझा. बायको - असू दे रे, त्यात काय इतकं. सगळ्याच बायका करतात. तुम्ही - सगळ्यांचं मला माहिती नाही. तू पड जरा. मी पटकन कामं संपवतो. चहा टाकतो आणि तुला उठवतो. बायको - वेडा आहेस का अरे. खरं म्हणजे तूच झोप थोडावेळ. ह्या आठवड्यात खूपच काम होतं तुला. तुम्ही - अगं पण... बायको - माझं होईल आवरून इतक्यात. मग उठवते तुला. मस्त आलं घालून चहा करते. तुम्ही - बरं. लवकर उठव पण. तू कामं करत असताना लोळत पडणं आवडत नाही मला. हाय काय अन् नाय काय. द्या ताणून आता सुखाने. जे काम कितीही आदळाअपट केली असती तरी झालं नसतं ते केवळ १ मिनिटाच्या डांबरटपणाने झालं. पण ह्या युक्तिचा उपयोग मर्यादित प्रमाणात करावा. अन्यथा एके दिवशी बायको खरंच कामाला लावेल आणि तुमचा सप्तरंगी पोपट होईल. (निर्लज्जपणे) पुन्हा क्रमशः

Book traversal links for निर्लज्ज व्हा - भाग ३

  • ‹ निर्लज्ज व्हा - भाग २
  • Up
  • (बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13486 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

खुलासा १

आदिजोशी
Tue, 10/12/2010 - 12:01 नवीन
कुटूंब म्हणजे जग आणि कुटूंबातले प्रश्न म्हणजे जागतिक प्रश्न त्यामुळे कुटूंबामधील उत्तरे हीच जागतिक उत्तरे असा माझा अजिबात समज नाही. खुलासा २ बायका म्हणजे कजाग आणि नवर्‍यांना बायकांचा ताप ही जागतिक समस्या त्यामुळे बायकांच्या प्रश्नांवर उत्तरे हीच जागतिक उत्तरे असाही माझा अजिबात समज नाही.
  • Log in or register to post comments

मेल्या!

यशोधरा
Tue, 10/12/2010 - 12:05 नवीन
:D मेल्या!
  • Log in or register to post comments

ह्या वेळेस थोडा निराश

गांधीवादी
Tue, 10/12/2010 - 12:25 नवीन
ह्या वेळेस थोडा निराश झालो. तुम्ही सुचविलेला उपाय हा निर्लज्जपणाचा उपाय खचितच नाही. थोडक्यात काय, तर सौ. पुढे कोणताच उपाय (दीर्घकाळ) कामी येत नाही. अनंत* वेळा सप्तरंगी पोपट झालेला. मी गांधीवादी नाही, त्या मुखवट्या पलीकडचा , केवळ मी... ------------------------------------------------------------------------------------ * अनंत म्हणजे न मोजता येण्यासारखे. आमच्या अल्पमतीनुसार.
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
Tue, 10/12/2010 - 12:56 नवीन
अगदी असेच म्हणतो. या वेळचा उपाय हा निर्लज्जपणाच काय साधा डांबरटपणाही वाटत नाहीय. हा उपाय पहिल्यावेळीसुद्धा काम करेल असं खात्रीपुर्वक सांगू शकत नाही. उलट रोगापेक्षा औषध घातक ठरण्याची शक्यता आहे. मोठ्या आशेने शेवटपर्यंत वाचलं पण अंती निराशा झाली. तुमचे आधीचे निर्लज्जपणाचे उपाय लोकल समस्यांवर असल्याने त्यांचा उपयोग झाला नाही आणि खरोखर जागतिक अशा समस्येवर निर्लज्जपणाचाही उपयोग नाही हे सिद्ध झाले याचे फार दु:ख वाटले. -((रंग न सांगणारा)पोपट) नगरीनिरंजन पण तुमचे तिन्ही लेख आवडले. अचूक निरीक्षण आहे आणि अनुभव अगदी बरोबर पकडलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/12/2010 - 12:45 नवीन
अ‍ॅडीभौ रॉक्स!
  • Log in or register to post comments

या वेळच्या निर्लज्जपणाची मिती

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/12/2010 - 12:46 नवीन
या वेळच्या निर्लज्जपणाची मिती (मराठी शब्दः डायमेंशन) वेगळी असल्याचं जाणवलं. तरीही (निर्लज्जपणे) निर्लज्जपणा आवडला असं लिहीत आहे. :-D
  • Log in or register to post comments

चपखल प्रतिसाद

आदिजोशी
Tue, 10/12/2010 - 13:18 नवीन
निर्लज्जपणा अनेकदा सटलपणे वापरावा लागतो. ट्रेनमधल्यासारखा निर्लज्जपणेणा इथे दाखवल्यास बॅगा भरून घराबाहेर पडण्याची सोय केल्यासारखे होईल. निर्लज्जपणाची ही वेगळी छटा ओळखणार्‍या आदिती ताईंची अभिनंदन. अर्थात तू जोशी असल्याने हे अपेक्षीतच होतं म्हणा. असो. आपला, आदि जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थात तू जोशी असल्याने हे

विजुभाऊ
Tue, 10/12/2010 - 13:28 नवीन
अर्थात तू जोशी असल्याने हे अपेक्षीतच होतं म्हणा हम्म...... नो कॉमेन्ट्स बाकी लेख झकास रे. असा निर्लज्ज पणा करायला नको वाटते रे. हे म्हणजे बायकोच्या निरागसपणाचा गैर फायदा घेतल्यासारखा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

बाकी चालु द्या!

धमाल मुलगा
Tue, 10/12/2010 - 16:26 नवीन
>>बायकोच्या निरागसपणाचा गैर फायदा घेतल्यासारखा वाटतो. बायको आणि निरागस? =)) =)) =)) (स्वगतः चला, काडी टाकणेत आली आहे...आता शेकोटी कधी पेटतेय तेव्हढं वाट पहात बसावं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/12/2010 - 15:09 नवीन
ट्रेनमधल्यासारखा निर्लज्जपणेणा इथे दाखवल्यास बॅगा भरून घराबाहेर पडण्याची सोय केल्यासारखे होईल.
अगदी अगदी! तू जोशी असल्यामुळे तुझी अपेक्षा असणार हे माहित होतंच! आणि तुझ्याहीकडून अपेक्षा आहेच, ती म्हणजे निर्लज्जपणाच्या वेगवेगळ्या मित्या दाखवण्याची. अदिती जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

कनक्लुजनः सगळे जोशी

प्रीत-मोहर
Tue, 10/12/2010 - 22:30 नवीन
कनक्लुजनः सगळे जोशी निर्लज्ज???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काही काय ?

अडगळ
Wed, 10/13/2010 - 00:07 नवीन
हा बघा लाजलो . इश्श्य्. (जोशी केल तोटि केल)अडगळ जोशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

हाहाहा!!! मस्तच. - (एकरंगी)

बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/12/2010 - 13:04 नवीन
हाहाहा!!! मस्तच. - (एकरंगी)
  • Log in or register to post comments

पुभाप्र.

गणपा
Tue, 10/12/2010 - 13:08 नवीन
आमचा उपाय. बायको उठवायला आली की तिचा हात धरुन तिलाच.... जाउदे.. गरजुंनी व्यनी करावा ;)
  • Log in or register to post comments

आमचा व्यनि बाय डिफॉल्ट धरत

बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/12/2010 - 13:22 नवीन
आमचा व्यनि बाय डिफॉल्ट धरत जावा..... आय मीन हात सोडल्यावर धरा पण धरा ब्वॉ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/12/2010 - 13:30 नवीन
म्हातारचळ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हॅ हॅ हॅ!

धमाल मुलगा
Tue, 10/12/2010 - 16:35 नवीन
गणप्या... दे टा़ळी! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वा वा वा गणपाशेठ. व्यनि

मृत्युन्जय
Tue, 10/12/2010 - 17:52 नवीन
वा वा वा गणपाशेठ. व्यनि केल्यास इथे लिहिता न येण्यासारखे काहितरी तुम्ही व्यनि मार्फत सांगणार की काय? आणि मुळात "गरजु" हा शब्द काळजाला भिडला एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मुळात "गरजु" हा शब्द काळजाला

विजुभाऊ
Wed, 10/13/2010 - 09:40 नवीन
मुळात "गरजु" हा शब्द काळजाला भिडला एकदम. तो शब्द || गरजू || असा लिहिल्यास काळजाला अधीक भिडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आता ते तुम्ही गणपाशेठला

मृत्युन्जय
Wed, 10/13/2010 - 14:04 नवीन
आता ते तुम्ही गणपाशेठला सांगा. काळजाला अजुन भिडवण्याची जबाबदारी त्यांची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अहो असे म्हणू नका, तो गणपाशेठ

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/13/2010 - 14:21 नवीन
अहो असे म्हणू नका, तो गणपाशेठ फोन येऊन येऊन त्रस्त होईल. शेवटी विचारेल फोन करणारे ते गरजू तुम्हीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

गणपाशेठ बहुधा गरजवंतांसाठी एक

मृत्युन्जय
Wed, 10/13/2010 - 16:16 नवीन
गणपाशेठ बहुधा गरजवंतांसाठी एक टेप तयार करुन ठेवतील. मी गरजू असे कोणी म्हणले की यांची टेप गरजायला सुरुवात होइल. गर्जा जयजयकार गणपांचा गर्जा जयजयकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ

मिसळभोक्ता
Fri, 10/15/2010 - 03:32 नवीन
नुकताच "अभिमान" पाहिलात वाटतं ! (त्यासाठी पहाटे उठून दात घासून ठेवावे लागतात ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तुमचे हे लिखाण वाचून भावी

सूड
Tue, 10/12/2010 - 13:31 नवीन
तुमचे हे लिखाण वाचून भावी आयुष्यात नक्कीच उपयोग होईलसे वाटते. कारण स्वयंपाक बर्‍यापैकी येत असल्याने असा सप्तरंगी पोपट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, ते अशा अनुभवी मार्गदर्शनामुळे कमी होतील.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Tue, 10/12/2010 - 13:42 नवीन
मस्त! वेगळाच वाटला हा निर्लज्जपणा!
  • Log in or register to post comments

आवडला हा निर्लज्जपणा ...

गणेशा
Tue, 10/12/2010 - 13:54 नवीन
आवडला हा निर्लज्जपणा ...
  • Log in or register to post comments

निर्लज्जपणा आवडला!

स्वाती२
Tue, 10/12/2010 - 16:12 नवीन
निर्लज्जपणा आवडला!
  • Log in or register to post comments

आपल्याला बुवा या बाबतीत

सुहास..
Tue, 10/12/2010 - 16:19 नवीन
आपल्याला बुवा या बाबतीत धम्याने सांगीतलेला ईलाज आवडतो आणी तो मी कटाक्षाने पाळतोही कधी-कधी बाकीअ अ‍ॅडीभौ , तुझा २/३ अंथरुण व्यापण्याचं पुढ काय झाल ? आणी दुसरा प्रश्न वरील प्रसंग जर ऊलट्या बाजुन आला तर काय करावे ?
  • Log in or register to post comments

+१

satish kulkarni
Tue, 10/12/2010 - 16:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments

हम्म

चिरोटा
Tue, 10/12/2010 - 18:52 नवीन
निर्लज्जपणा आवडला..
बायको - असू दे रे, त्यात काय इतकं. सगळ्याच बायका करतात.
बायका असे खरोखरच म्हणतात? ज्यांच्या बायका असे म्हणत असतील ते नवरे (त्यातल्यात्यात)सुखी असावेत.
  • Log in or register to post comments

मस्त रे अ‍ॅड्या??

प्रभो
Tue, 10/12/2010 - 20:00 नवीन
मस्त रे अ‍ॅड्या??
  • Log in or register to post comments

सोज्वळ निर्लज्जपणा.

धमाल मुलगा
Tue, 10/12/2010 - 20:11 नवीन
काळ आणि वेळ: कोणतीही. बायको: तू सिगरेट सोडणार की नाही? नवरा : च्चॅक्क... (डोकं पेपरात खुपसुन तसाच मख्खपणे.) बायको : अरे....शेवटचं विचारतेय, सिगरेट कधी सोडणार तू? नवरा : पुढच्या जन्मी सोडेन. आणि हो, आत्ताच म्हणालीस शेवटचं विचारतेय, आता ह्या जन्मात प्लिज पुन्हा नको हां विचारूस. (असं म्हणुन नवरा मिपावर कोणा कोणाच्या खरडी आल्या आहेत ते पहायला पळतो.)
  • Log in or register to post comments

आणि हो, आत्ताच म्हणालीस

गणपा
Tue, 10/12/2010 - 20:22 नवीन
आणि हो, आत्ताच म्हणालीस शेवटचं विचारतेय, आता ह्या जन्मात प्लिज पुन्हा नको हां विचारूस.
आमच्यात ह्याला बेडर वा धाससीपणा म्हणतात.. (क्षणिक का असेना ) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आमच्यात

मिसळभोक्ता
Fri, 10/15/2010 - 03:30 नवीन
आमच्यात ह्याला स्वप्नरंजन म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

स्वानुभव का धमालशेठ?

मृत्युन्जय
Tue, 10/12/2010 - 20:41 नवीन
स्वानुभव का धमालशेठ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हे अशक्य आहे

पैसा
Tue, 10/12/2010 - 20:47 नवीन
धमु काय मरायचंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कर चलें हम फिदां जान-ओ-तन

धमाल मुलगा
Tue, 10/12/2010 - 21:09 नवीन
कर चलें हम फिदां जान-ओ-तन साथियों.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जगला वाचलास

पैसा
Tue, 10/12/2010 - 21:17 नवीन
तर ये परत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वाचलोय..

धमाल मुलगा
Tue, 10/12/2010 - 21:51 नवीन
मोडलोय पण वाकलो नाहीये ;) हा किस्सा वर्षाभरापुर्वीचा आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बायको

पैसा
Tue, 10/12/2010 - 22:49 नवीन
खूपच लवकर विसरली तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धम्या.... ह्या नंतरच्या

शेखर
Tue, 10/12/2010 - 20:59 नवीन
धम्या.... ह्या नंतरच्या बायकोने दिवस/आठवडाभर केलेल्या शब्दाशिवायच्या कृती पण लिही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ए गप ना शेखरु दादा

धमाल मुलगा
Tue, 10/12/2010 - 21:08 नवीन
ए गप ना शेखरु दादा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

आता कळलं अ‍ॅड्या सटल्टीबद्दल

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/12/2010 - 21:47 नवीन
आता कळलं अ‍ॅड्या सटल्टीबद्दल का आणि काय म्हणतोय ते! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पुन्हा स्वारी

मिसळभोक्ता
Fri, 10/15/2010 - 03:30 नवीन
ह्या नंतरच्या बायकोने दिवस/आठवडाभर केलेल्या शब्दाशिवायच्या कृती पण लिही. सॉरी, मी "न केलेल्या कृतीबद्दल" असे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

आदिजोशी ग्रेट!

पैसा
Tue, 10/12/2010 - 21:05 नवीन
तुमच्या बायकोने हे वाचलंय का?
  • Log in or register to post comments

हे काय विचारणं झालं?

चतुरंग
Tue, 10/12/2010 - 21:06 नवीन
तिच्या परवानगीनेच तर लिहितो तो! ;) (अनुभवी)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चुकताय काका

आदिजोशी
Tue, 10/12/2010 - 21:13 नवीन
तिच्या परवानगीनेच तर लिहितो तो! छे छे... अहो परवानगी कसली? तिच मला लिहून देते आणि मी इथे टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हा हा हा!

चतुरंग
Tue, 10/12/2010 - 21:16 नवीन
अच्छा, तू आमच्यापेक्षा एक पायरी पुढे आहेस तर! ;) रंगाकाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

बायको आणि निरागस? =)) =))

विजुभाऊ
Wed, 10/13/2010 - 09:48 नवीन
बायको आणि निरागस? =)) =)) =)) (स्वगतः चला, काडी टाकणेत आली आहे...आता शेकोटी कधी पेटतेय तेव्हढं वाट पहात बसावं.) धम्या ; असते एखादेवेळेस. तो निरागसपणा आपण जपायचा असतो. अगदी पुस्तकातले मोरपीस जपतात ना तस्सा. स्वप्नाना फुले येण्याच्या काळात तर ते जास्त जाणवत. प्रत्येक कणखर मनाच्या मागे एक कोमल अंतःकरण दडलेलं असतं ( म्हणजे काय ते विचारू नकोस. मी सध्या दवणे स्कूलच्याएन्ट्रन्स ची तयारी करतोय. तज्ञानी मार्गदर्शन करा ) ते मोरपीस आपल्या मनातले बालपण जागवते. कधीकाळी मोरपीसाला वाहिलेलं हळदीकुंकू आठवते. उगाच रचलेले जर तर चे इमले आठवतात. मोरपीस जपायला मोरपीसासारखे भरजरी मन बाणवायला लागतं मग आभाळ खुणावून बोलावत रहाते. फिकुटसा ढग सुद्धा मुसळधार पावसात भिजलेल्या मनाला तरारून आणतो
  • Log in or register to post comments

विजूभाऊ, काही दिवसांनी दवणे

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 14:09 नवीन
विजूभाऊ, काही दिवसांनी दवणे स्वतःच दवणीय ऐकायला तुमच्या पाऊलांशी बसतील! नक्कीच! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा