Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिंतातुर जंतू on गुरुवार, 10/14/2010 - 14:02
'गुलाल-बुक्का' वगैरेंमध्ये ज्याचा उल्लेख होतो त्या बुक्क्याविषयी काही मूलभूत प्रश्न आहेत. तत्पर उत्तरे मिळाल्यास मदत होईल.
  1. 'बुक्का' कशापासून बनवतात?
  2. धर्मकार्यांमध्ये त्याचे काही विशिष्ट स्थान असते काय? असल्यास ते कोणते?
  3. बुक्का काही प्रसंगी अशुभ मानला जातो का? असल्यास कोणत्या प्रसंगी? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
  4. अंत्ययात्रेमध्ये प्रेताला बुक्का लावतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
  5. चितेवर बुक्का टाकतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
मदतीबद्दल अग्रिम धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • 18013 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पंदना on गुरुवार, 10/14/2010 - 14:05

Permalink

अरे हा विचारच नाही केला मी

अरे हा विचारच नाही केला मी कधी. चला या निमित्तान आम्हाला ही थोडेफार समजेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 10/14/2010 - 18:16

Permalink

बुक्का

जालावर फार माहिती मिळाली नाही. जी मिळाली ती ही - In the plate meant for puja, on the right hand side of worshipper turmeric powder (haldi) and vermillion (kumkum) are kept and on to the left Bukka (a black coloured powder prepared from tale (a metal), gulal and sindoor. In the front portion of the plate a bottle of attar (a fragrant essence of flowers), a small plate of sandalwood paste, flowers and durva (a type of fragrant grass) and other leaves. We are aware that attar, sandalwood and flowers have fragrance. The subtle particles of the fragrance are known as gandhkan. Similarly there are subtle particles of colour in leaves and durvas. The frequencies of deity principle are activated through the medium of these subtle particles of fragrance from attar, sandalwood paste and flowers and subtle particles of colour present in leaves and durvas. In the lower portion of the plate keep pan-supari (betel leaf and betel nut) and some coins as dakshina (offerings of money). We can keep a coconut in place of betel nut. Two leaves of betelleaf, betel nut or coconut and dakshina are kept together. Betel leaf, betel nut and coconut have the highest capacity to emit subtle frequencies of deities. The two leaves of betel leaf are representative of God and its activated energy that is Shiv and Shakti. They are invoked to work on a manifest (sagun) level. In the center of the puja plate unbroken rice grains are arranged in small heap.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 10/14/2010 - 18:38

In reply to बुक्का by सुनील

Permalink

पूजेचं ताट कळालं. पण बुक्का

पूजेचं ताट कळालं. पण बुक्का का? कशासाठी? ते नाही हो कळालं.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वछंदी-पाखरु on गुरुवार, 10/14/2010 - 18:24

Permalink

जंतू साहेब.....

जंतू साहेब........ तुमचे चिंतेचे कीडे कसले वळवळतात हो???? लय भारी........ स्वपा सुलेमानी जंतू......
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Fri, 10/15/2010 - 04:59

Permalink

बुक्क्याला काही लोक अबिर पण

बुक्क्याला काही लोक अबिर पण म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 10/15/2010 - 13:25

In reply to बुक्क्याला काही लोक अबिर पण by पक्या

Permalink

बुक्क्याला काही लोक अबिर पण

बुक्क्याला काही लोक अबिर पण म्हणतात. नाय वो "अबीर " पांढरे असते. बुक्का काळा असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 10/15/2010 - 13:41

In reply to बुक्क्याला काही लोक अबिर पण by विजुभाऊ

Permalink

अबीर

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE इकडे बुक्का शोधल्यावर अबीरवर घून जातात. आणि अबीरचा रंग काळा असल्याचे सांगतात. तेव्हा अबीर आणि बुक्का एकच असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 10/16/2010 - 01:16

In reply to अबीर by नितिन थत्ते

Permalink

नाय थत्तेसायेब!

विजुभाऊंचं बरोबर आहे... अबीर पांढरा असतो, आणि बुक्का काळा!! आम्ही पूर्वी एक भारतातल्या देवस्थानांवरची फिल्म पाहिली होती त्याच्यात त्यांनी पांढरा अबीर, काळा बुक्का, लाल गुलाल वगैरे दाखवले होते...
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 10/15/2010 - 09:54

Permalink

मला ऑप्स आणि बॅट्स वाला

मला ऑप्स आणि बॅट्स वाला बुक्का आठवला.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Fri, 10/15/2010 - 13:53

Permalink

वारकरी संप्रदायात बुक्का आणि

वारकरी संप्रदायात बुक्का आणि बुक्केवाली या दोन्हींना अनन्यसाधारण महत्व आहे. सोमवार, गुरुवार, एकादशी या दिवशी नित्यनेमाने भजनाला जाणार्‍या तसेच दिंड्या-वार्‍या केलेल्या व्यक्तीला विचारा. अचुक माहीती बिनबोभाट मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतातुर जंतू on Fri, 10/15/2010 - 14:51

Permalink

आतापर्यंत मिळालेली माहिती

बुक्का पांढरा आणि काळा अशा दोन्ही रंगांत सापडतो. पांढरा बुक्का जैन आणि बंगाली लोकांत वापरतात. महाराष्ट्रात काळा बुक्का वापरतात. चंदन, नागरमोथा, बकुळीची फुलं, वाळा, दवणा, मरवा अशा सुगंधी पदार्थांची वाळवून वस्त्रगाळ पूड करून ती कोळशाच्या पुडीत एकत्र करून काळा बुक्का बनवतात. पांढर्‍या बुक्क्यासाठी कापराची वस्त्रगाळ पूड (कोळशाऐवजी) वापरतात आणि चंदन, वाळा, दवणा आदिंबरोबर गव्हला काचरा, देवदार, लवंग, वेलची अशा पदार्थांचा वापर करतात. अनेक नैमित्तिक पूजांत बुक्का वापरला जातो. बहुधा फक्त वैष्णवांत बुक्का वापरतात. त्यामुळे विठ्ठलाचे भक्त बुक्का वापरतात. यात्रेवरून प्रसाद म्हणूनही वारकरी बुक्का घेऊन येतात. कीर्तन करणार्‍या हरदासाला 'आता गप्प बस' असं सांगायचं असतं तेव्हा त्याला बुक्का लावतात म्हणे! प्रेतयात्रेत तिरडीवर गुलाल-बुक्का टाकतात. आणखी माहिती मिळाल्यास कृपया सांगावी.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 10/15/2010 - 16:34

In reply to आतापर्यंत मिळालेली माहिती by चिंतातुर जंतू

Permalink

>>कीर्तन करणार्‍या हरदासाला

>>कीर्तन करणार्‍या हरदासाला 'आता गप्प बस' असं सांगायचं असतं तेव्हा त्याला बुक्का लावतात म्हणे! आठवलं..आठवलं..! बरेचदा लै पिळणार्‍यालासुध्दा 'आता घ्या बुक्का लावायला' म्हणतात ते आठवलं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 10/15/2010 - 15:17

Permalink

अबीर गुलाल उधळीत आला असे एक

अबीर गुलाल उधळीत आला असे एक गाणे आहे. असो. बुक्का हा काळा असतो पांढरे असते त्याला अबीर म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Fri, 10/15/2010 - 22:57

In reply to अबीर गुलाल उधळीत आला असे एक by विजुभाऊ

Permalink

का ही ही

अबीर गुलालं उधळीत रंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर = काळा असतो, वारकरी वापरतात. त्यालाच बुक्का म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 10/17/2010 - 06:50

In reply to का ही ही by मिसळभोक्ता

Permalink

हेच म्हणते. अबीर आणि बुक्का

हेच म्हणते. अबीर आणि बुक्का एकच. वारकरी लोक, अष्टगंधाच्या (पांढर्‍या)मोठ्या टीळ्याच्या वरती अबीराचा काळा छोटा टिळा लावतात..
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 10/15/2010 - 15:18

Permalink

अबीर गुलाल उधळीत आला असे एक

अबीर गुलाल उधळीत आला असे एक गाणे आहे. असो. बुक्का हा काळा असतो पांढरे असते त्याला अबीर म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 10/16/2010 - 14:51

Permalink

म्हणजे अजून अबीर आणि

म्हणजे अजून अबीर आणि बुक्क्याविषयी निर्णय झालाच नाही वाटते. असो. मिसळपाववरील एक सदस्य श्री रा रा अवलिया हे धर्म / अध्यात्म या विषयाचे गाढे अभ्यासक असल्याने ते वेगवेगळ्या वेदांत बुक्क्याविषयी काय लिहिले आहे ते सांगतील.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 10/16/2010 - 20:41

Permalink

शब्दकोशांचा वेध

अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशात "अबीर" आहे (पण बुक्का नाही). त्यांच्या मते अबीर म्हणजे चंदन वगैरे सुगंधी द्रव्यांचे चूर्ण. अबीर आणि बुका हे शब्द हिंदी शब्दकोशांत सापडले. "अबीर" म्हणजे अभ्रकाचे चकचकीत चूर्ण (त्यात काही मिसळले असले तरी "अबीर"च). लाल रंग मिसळून होळीत रंग म्हणून वापरतात. शब्दकोशात यासाठी बुका/बुक्का प्रतिशब्द म्हणून वापरलेला आहे. "बुका/बुक्का" शब्द थेट बघता शब्दाचा अर्थ "चूर्ण" असा आहे, विशेषतः अभ्रकाचे चूर्ण. (शब्दकोश बघून फारसा फायदा झालेला नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतातुर जंतू on Mon, 10/18/2010 - 11:12

Permalink

धन्यवाद

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार! कामापुरती माहिती सध्या तरी मिळालेली आहे. अधिक माहिती मिळाल्यास जरूर सांगावी.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 10/19/2010 - 08:03

Permalink

बुक्का

Image removed. "Deccan Abir or Bukkd is of a black colour, and in addition to all the above contains the following:— Aquilaria Agallocha. Costus Root (Saussurea Lappa, C.B.C., formerly Aucklandia Costus, Falc ); Jatamansi; Liquid Storax. " संदर्भ: हे पुस्तक ह्यातील aquilaria agallocha म्हणजे http://en.wikipedia.org/wiki/Agarwood असे कळले. (अगरबत्ती यावरूनच नाव आले का काय? ) असो. बुक्का का लावतात हे माहिती नाही, पण नाथ संप्रदायाशी याचा संबंध असेल का? वारकरी बुक्का वापरतात हे माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतातुर जंतू on Tue, 10/19/2010 - 11:15

In reply to बुक्का by चित्रा

Permalink

अगर उर्फ ऊद

चित्र दिसत नाही पण अगरबत्ती/उदबत्ती हे शब्द यावरूनच आले. धुपाप्रमाणे उदही जाळतात.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com