कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.
सोमवारी सकाळी ओफस मध्ये पोहचतो तोच मॅनजरने बोलावून घेतल. मॅनेजरच्या कपाळावर चांगल्याच आट्या पडल्या होत्या. मला म्हणाला- " तुला काही महत्वाचा सांगायचा आहे. US team wants to add a new module to our software, that will enable the product to communicate over the network in a better way. This needs to be done within next 5 to 6 weeks. And you need to drive this!" मला जे ऐकले ते अनपेक्षित होत. काहीही विचार न करता मी बोलून गेलो -" But i dont know anything about networking and since this design is not ready I doubt this can be done in month and a half." माझ्या चेहर्यावरचा प्रश्न्चिन्ह पाहून तो म्हणाला " You have a point there, but the module is already written and is being used in some other parts of the product. There is a guy called Friedman who has built this. He will explain the design and code structure to you and then you need to study it and explain that to team-mates over here, they will take care of integration! You will have to attend a late night call twice a week but you will enjoy this stuff"
मॅनेजरला ह्याचा जाम वैताग आला होता! त्याला काही तरी करून एका महिन्यात रिलीज संपवायच होत. मी बग टाकून किडा केला होता आणि अमेरिकन लोकांनी नवीन काम दिला होत. असो दुसर्यादिवशी रात्री माझी फ्रेडी बरोबर मिटींग झाली. अमेरिकन म्हणजे ऊर्मट आणि वर्ण्द्वेषी अस बरच काही ऐकून होत. पण प्रत्यक्ष अनूभव मात्र वेगळा होत. फ्रेडी तसा चार वर्षाचा अनूभव असलेला माणूस. पण एकदम कूल! पहिल्याच मीटींग मध्ये त्याने ढोबळ आर्किटे़चर समजावून सांगितला. त्याची सांगण्याची पद्धत इतकी मस्त होती कि सगळ्च सोपा वाटायचा. पूढ्च्या मिटींग्च्या आधी मी ठरवला थोडा वाचून जाव. वाचताना डोक्यात शिट्ट्या वाजत होत्या नुसत्या. वरून साध्या वाटणर्या त्या मोड्युल्मध्ये प्रचंड complex logic होत. त्याने कुठले जगावेगळे API वापरले होते देव जाणे. मिटींगमध्ये जाताक्षणी मी त्याला सांगून टाकले " Friedy, that module seems to be very complex, I would have loved to learn it. But I dont think I'm good enough to do this in such a short period of time." फ्रेडी " Dude just chill. You are trying to be modest!" हा आरोप आयुष्यात पहिल्यांदाच झाला होता. खरच हसू आल. तो पुढे " Things might seem to little complex because you are doing it for the first time. I will explain it to you. Its damn simple....." तो सांगायला लागला की सगळच सिंपल व्हायचा. मिटींग संपायच्या आधी मी त्याला विचारला. " One question. Where can I find the documentation of some of the API's that are used in code!" तो हसून " Nowhere! b'coz they are undocumented so far. I got them directly from the belly of the beast. Thanks for reminding me that. i'll cover them in the next meeting first. " ह्या माणसाचा ज्ञान अफलातून होता. network stack चे जितके details तो सांगायचा ते कूठल्या पूस्तकातही दिले नव्हते! आमचा काम छान चालल होता. मी फ्रेडीबरोबर जे काय शिकलो होतो ते सरांशी डिस्कस करायचचो आणि मग बाकिच्या टिमला समजावून द्यायचो.
आज सकाळी सकाळी "All hands meeting" झाली. कंपनीचे ह्या क्वॉर्टरचे रिझल्ट्स काही खास लागले नवते. मिटींग्मध्ये डारेक्टरने आश्वासन दिला- "No need to panic. This is not going to affect anyone. The results look bad just because we have no major releases in this quarter and we are following new accounting method. With couple of release planned for next quarter we are going to bounce back! "
त्याच दिवशी दुपारी मॅनेजर न मला विचारला तुझा फ्रेड्मन बरोबरचा डिस्कशन कसा चालू आहे! मी-" बहुदा संपत आल आहे." तो- " Good. Now you are ready to take control of that module." मी त्याच्याकडे दुर्लक्ष केला आणि संध्याकाळ्च्या मिटींगच्या तयारीला लागलो! रात्री फ्रेडी ने डिस्कशन संपवला. तसा आता नावाला एक भाग राहिला होता. मी त्याला म्हणालो "Looks like we can wrap it up by next week."
दुसर्यादिवशी ऑफिस मध्ये गेलो. फ्रेडीची मेल आली होती- " Dude, it was great discussing the design with you. This is my last day at the office. I wish you all the best for your career" मला काहीही समजला नाही. तोवर बनिया तिथ आला! " एक बूरी खबर है यार. अमरिका मे अपने कंपनीमै लोगो को दो-तिन महिने की सॅलरी देके निकाल दिया है! " तेव्ढ्यात मॅनेजरन मला ताबोड्तोब बोलावला -" Friedman will not be available anymore. As you know most of the dev team will be busy troubleshooting. You are going to do that role now! " जड झालेल डोक घेवून डेस्क्जवळ आलो! खूर्चित बसून मॉनिटरकड पहात बसलो. मनात विचार आला" चार वर्ष त्या डोमेन मध्ये डोक खपलेल्या त्या हुशार मानसाचा रोल आपण कसा करनार, तेवढी लायकी आहे का आपली?" त्या बंद पड्लेल्या मॉनिटर मध्ये माझा चेहरा प्रतिबिंबित झाला होता. अंगावर शहारा आला. प्रतिबिंबात कपाळावर बट्बटीत शिक्कामोर्तब झाल होत " Cheap labor!". गेल्या सहा महिन्यात कंपनीन दिलेल्या भरगच्च पगारानही कलंक धुवून निघाला नव्हता!
Book traversal links for कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लिन्क्स पुन्हा विसरल्या
लेखन चांगले आहे. पण स्वत:ला
हमम
मान्य, माझेही म्हणणे तुम्हाला
सहमत आहे रंगा. आता आपण चीप
इथ चिप पैसा किंवा काम ह्या
चिप लेबर..
मस्त..
>>हा भाग मला (का कोणास ठावूक)
हे नॉलेज ट्रान्स्फर म्हणजे
Not that bad..
सोडून जातेवेळीची के टी इज
बरोबर आहे..
काम फ्रेडीने केले असले तरीही
KT देणे म्हणजे स्किल्स
हा चांगला मुद्दा मांड्लात
योग्य मुद्दा..
त्याला पूर्व कल्पना दिली
रंगराव तुमचे चीप लेबरचे
जरा हळू
मला उगाचच इतके दिवस तुम्ही
आयला. आता काय घोड मारल!
ते शेवटचे 'आ'कार आहेत ना ते
प्रयत्न करतो!