नेहमी प्रमाणे आम्ही संगीत तबकडी सुरु केली आणि मिपा वाचायला सुरुवात केली... पराशेठचा खुषखबरी धागा वाचून संपायला आणि तबकडीवर खेबुडकरांचे दाम करी काम येड्या लागयला एकच गाठ पडली आणि आम्हाला तबकडीतून भलतेच बोल ऐकू येउ लागले
बारा डोळ्यांनी धागं सारी वाचकजन बगतो
प्रतिसादावर माणूस मरतो प्रतिसादावर जगतो
प्रतिसादाला पैसं मागतो 'परा'स नाही काम रे
काम करी दाम येड्या काम करी दाम रे
टिआरपीची जादू लई न्यारी, सार्या जालाला त्याची हाव
काम सोडून लिवतय लेख, प्रतिसादा मागूनी धाव
जल्मापासून सारी माणसं ह्या रोगाची गुलाम रे
कुनी टुकार कौलेबाज कुनी कुनी टंके पांचट फुटका
चांडाळ चौकडी जमवी कुनी रमवी जिव दो घटका
शंभर अकडा नक्की ठरला, सोडला त्यानं लगाम रे
ह्या वाव्वा बाडिस पाई, कुनी भंपक लावी जीव
कुनी खरडी निरोप धाडी, कुनी बदलून टाकी नाव
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखी मैत्रीचं नाम रे
अचरटावानी लेखनी, धाग्याच्या गळ्याला फास
टंकल्यालं लगीच उडवितं. लेखाच होतय फसं
वाचक मेलं शरमंदीनं, वाचन होई हराम रे
पानावर पुढच्या जाती, हे धागं टाकोटाक
प्रोत्साहन मंडळ निघते, पॅकेज काढल झाक
शेड्युल ठरवून प्रतिसादाच,अता करावा अराम रे
वाढेल टिआरपी आता छनछन्नुक तालावरती
पैशानं नवोदित खुस, पैशानं ज्येष्ठ बी खुलती
प्रतिसादांच्या बादशहाला, "केश्या" करतो सलाम रे
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))=))=)) अग्गग !!! पर्या ,
=))=))=))
अग्गग !!!
पर्या , नाउ व्हाट ?
कलगी तुरा रंगणार का आता
कलगी तुरा रंगणार का आता ;)
अगागागगागागागा!!!!
अगागागगागागागा!!!!
केसुसेठ, लई भारी!!
सुपीक माती
केसुंना हल्ली फारच सुपीक माती मिळू लागली आहे. ;) खणा खणा.
सुपीक का मऊ??
In reply to सुपीक माती by प्रियाली
सुपीक का मऊ?? ;)
सुपीक माती मऊ असते
In reply to सुपीक का मऊ?? by प्रभो
असे आपले आमचे (अ)ज्ञान. ;)
केसु करी काम वेड्या
तमाम हे काम रे!! ;)
('परा'गंदा)रंगा
अर्र, पर्याचा बाजार उठवून
अर्र, पर्याचा बाजार उठवून पुरती माती झाली की इथे!!
सहमत आहे
In reply to अर्र, पर्याचा बाजार उठवून by ३_१४ विक्षिप्त अदिती
(खोदकरी)बेसनलाडू
थ्ड थ्ड्..थ्ड! एकदम जोरदार
थ्ड थ्ड्..थ्ड! एकदम जोरदार ..!
परा.. हाऊ अबाऊट दिस??
दणका!!!
दणका!!!
आ रा रा पार बाजार उठवला आमचा
आ रा रा पार बाजार उठवला आमचा केसुशेठनी
तुमच्या पुढच्या धाग्याची आता मातीच केली पाहिजे.
धाग्याची माती
In reply to आ रा रा पार बाजार उठवला आमचा by परिकथेतील राजकुमार
करायचे रेट कार्ड पाठवा..
छ्या...
छ्या... अमुक मिनिटांत अमूक प्रतिसाद वगैरे गर्जना आणि त्यातील गोम यांचा या विडंबनात समावेश नसल्यानं हे विडंबन साफ फसलं आहे. किंवा ते मुद्दाम फसवलं असावं. ;)
त्यासाठी
In reply to छ्या... by श्रावण मोडक
वेगळा रेट आहे मोडकशेठ.. ;)
(वेगवेगळा)केशवसुमार
आयला
In reply to त्यासाठी by केशवसुमार
दाम करी काम हेच खरं... ;)
हा हा हा =))
हा हा हा
=))
अचाट प्रतिभा केसुशेठ!
धुवांधार काव्य
चेष्टा का काय!!!
धन्यवाद!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार