'ग्रँटा'मध्ये पाकिस्तानच्या वेगवेगळ्या वास्तवांचं चित्रण
ग्रँटा या साहित्यविषयक इंग्रजी मासिकाचा नवीन अंक समकालीन पाकिस्तानी साहित्याला वाहिलेला आहे. वर्तमानपत्राच्या बातम्यांमधून आणि आपल्या पूर्वग्रहांच्या पडद्यांतून आपल्यापर्यंत सहसा न पोचणारं पाकिस्तान त्यातून दिसतं.
काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या मुहम्मद हनीफ यांच्या 'अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज' या कादंबरीमध्ये झिआ-उल-हक यांच्या विमानाला झालेल्या अपघाताचा (खरा) प्रसंग घेऊन त्याभोवतीच्या कट-कारस्थानाची कहाणी रचली होती आणि त्याद्वारे झिआंच्या जुलमी राजवटीवर विखारी विनोदाचे कडक ताशेरे ओढले होते. झिआंच्या पोटात जंत होतात हा त्यातला प्रसंग हलकट विनोदाचा चांगला नमुना म्हणता येईल. हनीफ यांच्या 'बट अँड भट्टी' या ताज्या कादंबरीतला एक भाग ग्रँटाच्या अंकात वाचता येईल. प्रेम आणि हिंसा यांना वेगळं न करू शकणार्या पुरुषाचं या प्रेमकथेत चित्रण आहे. हनीफ पाकिस्तान बी.बी.सी.साठी काम करतात. लेखकाची छोटी मुलाखत इथे वाचता येईल.
नदीम अस्लम यांच्या 'लैला इन द विल्डरनेस' या कथेत पुरुषप्रधान, धर्मांध समाजव्यवस्थेत मुलीच्या जन्माविषयी असणारी परिस्थिती चित्रित केली आहे. त्यातला काही भाग इथे वाचता येईल.
जमील अहमद यांच्या 'द सिन्स ऑफ द मदर'मध्ये कुटुंबापासून दूर जाऊ पाहणार्या एका जोडप्याची शोकांतिका आहे. कमीला शम्सी यांच्या 'पॉप आयडॉल्स' या ललित निबंधामध्ये कराचीत पाश्चिमात्य संस्कृतीच्या सान्निध्यात लहानाचं मोठं होण्याचे अनुभव आहेत. पाकिस्तानातून पश्चिमेत स्थलांतरित झालेल्यांच्याही कहाण्या या अंकात आहेत. याशिवाय मोहसीन हमीद ('द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट' या गाजलेल्या कादंबरीचे लेखक), डॅनिएल मुईनुद्दीन अशा काही गाजलेल्या आणि नव्या लेखकांचं लिखाणही अंकात वाचता येईल.
समकालीन पाकिस्तानी कलाकारांच्या कलाकृतीही अंकात वापरलेल्या आहेत. लेखाच्या सुरुवातीची प्रतिमा तिथूनच घेतलेली आहे.
ओळखपत्रावरचं छायाचित्र, मुघल लघुचित्रं, कंपनी शैलीतली चित्रं आणि युरोपिअन शैलीतली चित्रं यांच्या एकत्रीकरणातून उभं केलेलं, वेगवेगळ्या काळांतल्या जगांत मिसळलेल्या आधुनिकोत्तर वास्तवातल्या अस्मितांचं चित्रण भासणारं 'तुम्ही इथं इतिहास शोधायला आलात का?' हे नुस्रा लतीफ कुरेशी यांचं चित्र पाहा:
जगाला ज्यानं भिववून सोडलं आहे अशा हिंसा आणि धर्मांधतेकडे दुर्लक्ष न करणारं, गुलाबी अतिरंजित वास्तव न दाखवणारं, पण पाकिस्तानी लोकांचं माणूसपणही दाखवणारं अशा प्रकारचं लिखाण या निमित्तानं पाकिस्तानाबाहेरच्या जगासमोर येतं आहे ही महत्त्वाची बाब आहे.
अधिक तपशील न्यू यॉर्क टाईम्स आणि गार्डिअन मधल्या लेखांत वाचायला मिळेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद
छान!!! या विषयावर अजून
सहमत
रोचक धागा
हेच म्हणते. माहितीपूर्ण आहे
धन्यवाद!
कल्पक आणि भन्नाट चित्रे
पाकीस्तान विषयी
उत्तम
उत्तम लेख
पाकिस्तानातले कलाकार
करुन दिलेला परिचय आवडला.
परिचय
पाकीस्तानातले कलाकार
पाकिस्तानातले कलाकार.
पाकिस्तानी कलाकार
देश आणि जनता
धन्यवाद!