कलमाडी आणि राष्ट्रकुल भ्रष्टाचार
सुरेश कलमाडी हा पुण्यातून कायम निवडून येत असलेला खासदार. कुठली ना कुठली लफड्यात त्याचे नाव गुंतलेले असून हा पुण्यातून कायम निवडून कसा येतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. मागे कुठल्याशा स्पर्धांच्या वेळी चकाचक केलेले बाळेवाडीचे क्रीडासंकुल आज दयनीय स्थितीत आहे. पण त्याचे कुणाला फार सोयरसुतक आहे असे वाटत नाही. कलमाडींनी तिथेही अमाप पैसा कमवला असे ऐकिवात आहे.
मराठा लॉबी प्रबळ असणारी काँग्रेस व राष्ट्रवादी पुण्यात इतकी भक्कम असताना ह्या मूळ कानडी भाषिकाला आपले स्थान टिकवून ठेवता आले म्हणून कलमाडींचे कौतुक करावे का पुणेकरांची कीव करावी हे कळत नाही. पवार आणि त्यांच्या घराण्यातील इतर मातब्बरांशीही ह्याचे फार सख्य नाही असे वाटते.
सध्याचा भ्रष्टाचार जो राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने घडला तो ह्याला जरा जड जातोय का असे वाटू लागले आहे. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षा बोंबलत आहेत पण काँग्रेस तितक्या हिरिरीने ह्याचा बचाव करताना दिसत नाही.
पण हा माणूस महा बिलंदर आहे. ह्या प्रकरणातूनही तो शिताफीने सुटून पुढच्या लोकसभा विलेक्शनला भरघोस मताने निवडून येऊ शकेल. काही वर्षापूर्वी चक्क भाजपचे समर्थन मिळवू शकलेला हा काँग्रेसवाला आहे!
इतक्या प्रकरणात गुंतूनही तसा ठणठणीत राहिला कसा हा? अफाट पैशामुळे की अफाट जनसंपर्कामुळे? का वलयांकित व्यक्तिमत्वामुळे?
तुम्हाला या माणसाविषयी आणि ताज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविषयी काय वाटते? विशेषतः पुणेकरांना.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आता ऐन स्पर्धेच्यावेळी काय
सर्वांनी CWG बघायला जाण्या अगोदर हि बातमी वाचून जाने.
(विषय दिलेला नाही)
छत्री आणि टॉयलेट नॅपकीन फारच
आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो.
700 कोटी रुपयांचा धूर करण्यात आला.
"लिव्ह टू लव्ह"
पुरे झाला खेळ, आता हिशेब
आता कलमाडी