येथे अनेकांना राजकारणाच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्याची इच्छा असल्याने, त्या साठी हा धागा चालू करत आहे. आपले विचार मांडताना फक्त गैरसमज अथवा टोकाचे वाद होणार नाहीत या बाबत मर्यादा पाळाव्यात इतकीच विनंती! बाकी धर्मावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हीन उल्लेख केलेले कुठल्याही परीस्थितीत चालणार नाहीत आणि ते प्रतिसाद तात्काळ संपादीत करण्यात येतील. असे काही प्रतिसाद दिसल्यास त्यांना प्रतिसाद न देण्याचा प्रयत्न इतरांनी करावा अन्यथा त्यांचा प्रतिसाद देखील सुक्याबरोबर ओले जळते तसाच विनाकारण उडेल.
अयोद्धा जमीन मालकी आणि रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावरील दिवाणी खटल्याचा निकाल आणि त्यानंतरच्या, म्हणजे वादळा नंतरच्या शांततेस कसे सामोरे जायचे हा भल्या भल्यांना प्रश्न पडला आहे.
तर तुम्हाला राजकीय प्रतिसाद वाचताना काय वाटत आहे? या निकालामुळे राजकीय पडझड अथवा फॉलआउट काय होऊ शकतो? तो काय केवळ सत्तांतरच असणे याच्याशी संबंधीत नाही आहे तर एकूणच बदलत रहाव्या लागणार्या राजकारण्यांच्या स्ट्रॅटेजीस शी असेल असे वाटते का? अनेक प्रश्न पडतात. त्याला तुम्हाला काय वाटते हे समजून घेयला आवडेल तसेच नवीन प्रश्न पण समजून घेण्यास आवडतील...
- निकाल बहुतांशी बाजूने लागून देखील भाजपाला काही फायदा होईल का?
- निकाल अनपेक्षितपणे हिंदूंच्या बाजूने लागल्याने कायम अल्पसंख्यांकांचा मतासाठी वापर करणार्या काँग्रेसची पंचाईत झालेली आहे असे त्यांच्या प्रतिक्रीयेवरून दिसले. अल्पसंख्यांकांचा आता काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल का? एक गठ्ठा मते केवळ पक्षाला ह्या प्रकारापेक्षा उमेदवाराची लायकी बघून मते असे थोडे तरी दिसेल का?
- कम्युनिस्ट कोर्टाचा निर्णय "डेंजरस" म्हणतात कारण त्यात श्रद्धा आणि भावना मानल्या आहेत. बिचारे विसरत आहेत की अजून देशात धर्म हा कायद्याने मानला जातो. नाहीतर मंदीराप्रमाणेच मशिद कशाला हा देखील प्रश्न येथेच नाही तर कुठेही विचारता येऊ शकतो... एकूणच, कम्युनिस्ट हे यात तत्व आणि राजकारण या दोन्हीनी हरलेले (लूजर्स) वाटतात का?
- सप वगैरे नामके वास्ते समाजवादी पार्ट्यांचे काय होईल?
- सप तसेच काँग्रेस मधील काही मुस्लीम नेत्यांनी संयमीत आणि सुस्पष्ट भुमिका घेतली आहे जी त्यांच्या हायकमांडना आणि पार्टीला घेता आलेली नाही. शहाबानो खटल्यासंदर्भात संसदेत बील आणून कोर्टाचा निर्णय नल अँड व्हॉईड होताना पाहून अरीफ मोहंमद खान यांनी जो स्पष्ट विरोध केला होता, तशीच काहीशी भुमिका आता काही आत्ताच्या काळातील मुस्लीम नेते करताना दिसत आहे. फरक इतकाच की यावेळेस त्यांच्या बाजूने बराचसा मुस्लीम समाज आणि काही मुस्लीम विचारवंत देखील आहेत. असा ट्रेंड चालू राहील असे वाटते का?
वाचने
4275
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
आनंद संयतपणे व्यक्त करावा असा
उद्देश
In reply to आनंद संयतपणे व्यक्त करावा असा by नितिन थत्ते
हा हा हा
In reply to आनंद संयतपणे व्यक्त करावा असा by नितिन थत्ते
गठ्ठा
आनंद पोटात माझ्या माईना..
निकाल बहुतांशी बाजूने लागून
निकालाची परिणिती
फारसा फरक कु णालाच पडनार नाहि असे वाटते
घटनादुरुस्तीला चपराक?
गल्लत नको!
In reply to घटनादुरुस्तीला चपराक? by भास्कर केन्डे
सहमत
In reply to गल्लत नको! by सुनील
सेक्युलरिझमची व्याख्या
In reply to सहमत by विकास
व्याख्या
In reply to सेक्युलरिझमची व्याख्या by इन्द्र्राज पवार
+
In reply to सेक्युलरिझमची व्याख्या by इन्द्र्राज पवार
घटनेतील 'सेक्युलर' ची व्याख्या....
In reply to + by नितिन थत्ते
माझे मत
अपेक्षित
In reply to माझे मत by क्लिंटन
1. निकाल बहुतांशी बाजूने
>>>>निकाल बहुतांशी बाजूने
जमातवादी शांत म्हणून शांतता आहे.