मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राष्ट्रकुल स्पर्धेची सुरवात चांगली झाली, आता ऑलिंपिक स्पर्धेचे दिल्ली यशस्वी आयोजन करू शकते - हा आत्मविश्वास का दम भरणे?

विकास · · कौल

वाचने 528 वाचनखूण प्रतिक्रिया 5

विकास 08/10/2010 - 22:53
आता ऑलिंपिकही भरवू शकतो - दीक्षित
नवी दिल्ली - "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरवात चांगली झाली असून ऑलिंपिक स्पर्धेचे दिल्ली यशस्वी आयोजन करू शकते,'' असा विश्‍वास दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी गुरुवारी व्यक्त केला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने उभारलेल्या जागतिक दर्जाचे मैदाने पाहून दीक्षित यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ""आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे.''

In reply to by विकास

चिरोटा 09/10/2010 - 13:15
"आम्ही प्रचंड पैसे खाल्ले.आमची ऑलिम्पिक भरवण्याची पात्रता नाही"असे उघडपणे ते म्हणू शकणार नाहीत.दीक्षित,कलमाडी राजकारणी आहेत् .तेव्हा त्यांना तसे म्हणणे क्रमप्राप्तच आहे. वर हुप्प्या ह्यांचा मुद्दायोग्य आहे. आंतरराष्ट्रीय पातळीची गुणवत्ता तयार झाल्याशिवाय भारताने मोठे सामने भरवू नयेत असे वाटते.ज्या क्रिकेटमध्ये भारताचा बोलबाला आहे,तेथेही सव्वा दोन कोटींचा ऑस्ट्रेलिया १०० कोटींच्या भारतालाही अनेकवेळा हरवतोच.

सुनील 08/10/2010 - 23:12
जगाच्या एक तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे ५४ देश भाग घेत असलेली राष्ट्रकूल स्पर्धा यशस्वी करणार्‍यांना ऑलिंपिक यशस्वी करवून दाखवणे कठिण असले तरी अशक्य नसावे. माझ विश्वास प्रामाणिक असला तरी "भाबडा" नाही. म्हणून "इतर"ला मत दिले आहे. अर्थात, ह्यावेळी झालेल्या ढिसाळपणातून धडा शिकायलाच हवा. तरच हे शक्य आहे. आणि तो धडा आपण शिकलो आहोत, असे मनापासून वाटते.

In reply to by सुनील

विकास 08/10/2010 - 23:36
वरील प्रतिसादाशी बहुतांशी सहमत. फक्त त्यातील, "तो धडा आपण शिकलो आहोत, असे मनापासून वाटते" या संदर्भात मला अजून तसे वाटत नाही. अर्थात जर मी चूक ठरलो तर आनंदच आहे. :-)

हुप्प्या 09/10/2010 - 01:50
ह्या मोठमोठ्या स्पर्धा भरवू इच्छिणारे कलमाडी टाइपचे नेते हे भ्रष्टाचाराकरता ते करू इच्छितात. त्यांना क्रीडागुणविकास वगैरे प्रकारात काडीचाही रस नसतो. हजारो कोटींच्या उलाढाली करायच्या आणि शेकडो कोटी खिशात सारायचे हा त्यांचा कार्यक्रम असतो. तेव्हा अजून एक मोठी स्पर्धा भरवून त्यांची तिजोरी का भरावी? दुसरे असे की आपली ऑलिम्पिक स्पर्धेतली गुणवत्ता, पदकांची संख्या दयनीय आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिली तर अत्यंत केविलवाणी आहे. ती सुधारल्याखेरीज अशी स्पर्धा यजमान म्हणून भरवणे हे हास्यास्पद आहे. सर्वसाधारणपणे ऑलिम्पिक जिथे भरते तिथला यजमान संघ घसघशीत कमाई करतो (पदकांची). भारताच्या बाबतीत तसे होणे दुरापास्त आहे. अन्य काही उपाय ज्याने भरपूर पदके मिळवता येतील १. अतिरेक्यांचा किंवा खिळखिळ्या बांधकामांचा मोठ्ठा धोका निर्माण होईल असे बघावे. मग तमाम प्रगत राष्ट्रे स्पर्धेतून माघार घेतील आणि मग भारताचे उखळ पांढरे. २. खेळाडूंच्या खोल्यात डास, ढेकूण, साप वगैरे अस्सल भारतीय प्राणी सोडावेत. ते बघूनही अनेक प्रगत देशातील खेळाडू गाशा गुंडाळून चालते होतील. मग काय भारताला रान मोकळे! ३. म्याच फिक्सिंग. खेळाडूंच्या तयारीपेक्षा दाऊद, सालेम, शकील प्रभृतींना हाताशी घेऊन म्याच फिक्सिंगचे उत्तम रॅकेट तयार करावे. मग खेळाडूंवर साम दाम भेद दंड वापरून हवा तो निकाल लावता येईल. बेटिंगवर अमाप दौलतही कमावता येईल. मग काय, कलमाडीला अस्मान ठेंगणे !