जमीन का पाणी
"जमीन का पाणी" हा खेळ कोण खेळत नाही लहानपणी?
पण गंमत म्हणजे आपल्याही नकळत हा खेळ मोठेपणीदेखील चालूच रहातो.
भावनेच्या भरात वाहून जाऊन एखाद्या निर्णयाप्रत यायचं की थंड डोक्याने निर्णय घ्यायचा हा तो खेळ.
पैकी या "डाऊन टू अर्थ" - जमीनीवरच्या लोकांच्या आम्हा पाण्यातील लोकांना खूप हेवा वाटतो.
हे ना निराशेच्या भोवर्यात गटांगळ्या खातात ..... ना अतिउत्साहाच्या लाटांवर आरूढ होतात....
यांचे पाय नेहमी ठाम जमीनीवर.
कोणत्याही निर्णयात यांचं चित्त स्थिर!
नाहीतर आम्ही पामर - सतत उन्माद, हर्षोल्हास, औदासिन्याच्या थपडा खात खात हेलकावे खाणारे.
उत्साह, मरगळीच्या द्वंद्वात आलटून पालटून जखडलेले.
आज परत एकदा विश्वास बसला जगात दोन च प्रकारचे लोक आहेत - भावनाप्रधान आणि व्यवहारी , एक खेळ नेहमी नेहमी खेळला जातो - जमीन का पाणी
प्रतिक्रिया
>>आज परत एकदा विश्वास बसला
जमीन का पाणी म्हणजे कोणता
असतो एक खेळ. त्याला तळ्यात की
आमच्याकडे या खेळास दगड का
आमच्याकडे हाच
सुंदर प्रकटन.. मनापासून
अश्या लेखाना प्रतिसाद देण्यार्याचे
+१
टुबी
कोणी मला
तो सामान्य जनतेचा खेळ आहे
शुचि ताई.. चांगला धागा आहे..
सुरेख प्रकटन.