
 |
| From Pictures |
" width="300" height="300" alt="" />
या आधी जागुतैने या भाजीची रेसिप दिलेली वाचली अन लक्षात आल अरे आपण तर खूपच वेगळ्या पद्धतीने करतो ही भाजी.
म्हणून मग परत भाजी आणून हा सारा उपद्व्याप !!
खरच एकदा करून पहा, वेगळ्या चवीची अन जागू ताईन इतकीच फक्कड!!.
तर सामग्री:-
एक जुडी अम्बाड्याची भाजी.
एक ते दीड मूठ ज्वारीची कणी( माझ्या कडे ज्वारी मिळते, तुम्हाला नसेल मिळत तर थोडे तांदूळ भिजवले तरी चालतील)
एक मुठभर तूर डाळ.
एक ते दीड मूठ शेंगदाणे
१ टी स्पून जिरे.
१/४ टी स्पून मेथीदाणे .
आवडी नुसार हिरव्या मिरच्या,( मी फक्त एक वापरते)
तिन चार लसूण पाकळ्या (आमचे लसूण मोठे असतात, आपल्याकडचे १० कुड्या म्हणा हवेतर)
हळद, हिंग , मीठ.
फोडणी साठी.
चार पाच लसूण पाकळ्या , हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हिंग अन हळद.

 |
| From Pictures |
" width="300" height="300" alt="" />
कृती.
प्रथम ज्वारीची कणी, तूर डाळ अन अर्धवट फोडलेले शेंगदाणे भिजत घाला.
भाजी निवडून धुवून घ्या. पातेल भर पाणी उकळत ठेवा, पाणी उकळल की त्यात भाजी घालून वेळून घ्या.
या मूळे भाजीचा आंबट पणा थोडा कमी होतो.
आता हा वेळलेला भाजीचा गोळा एका भांड्यात थोडे पाणी खाली घालून ठेवा, अन त्या गोळ्यावर भिजलेली कणी, डाळ अन शेंगदाणे उपसून घाला.
झाकण ठेवून चांगली वाफ येऊ दया.
एकदा कणी शिजली की त्या मध्ये हिंग हळद अन मीठ मिसळा.
लसूण अन मिरची ठेचून घ्या अन या भाजीत मिसळा. जवळ जवळ शिजत आलेल्या या भाजीवर मग मेथी अन जीऱ्याची एकत्र कुटून पावडर घाला.

 |
| From Pictures |
" width="300" height="300" alt="" />
फोडणी साठी एक पळीभर तेल गरम करा.
त्यात लसूण पाकळ्या मग कढीपत्ता अन मिरच्या घाला. शेवटी हिंग अन हळद घालून ही फोडणी वरून भाजीवर ओता अन चांगले ढवळून घ्या. थोडी दुबदुबीत च राहु द्या ही भाजी.
खाताना भाकरी असेल तर क्या कहने. आपण जसे वर्जिन ऑलिव ओईल कच्चे खातोना तसे आम्ही या भाजी बरोबर कच्चे शेंगदाण्याचे तेल खातो, बरोबर थोडी मिसळलेल तिखट.

 |
| From Pictures |
" width="300" height="300" alt="" />
प्रतिक्रिया
आंबाड्याच्या भाजी खाली बसुन
मस्त.. तात्या. -- प्रसिद्ध
अंबाडीची भाजी का अंबाड्याची?
अंबाडा
In reply to अंबाडीची भाजी का अंबाड्याची? by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो..खूप मस्त होते त्याची
In reply to अंबाडा by पैसा
आम्ही पण ! फक्त कोल्हापूर
In reply to हो..खूप मस्त होते त्याची by प्राजु
रेशिपी छानच !!
छान
रताळ्याची पाने पहील्यांदा
In reply to छान by सहज
अरे बापरे अम्बाडी की
शॉरी शॉरी
अपर्णातै अंबाडीला अंबाडा काय
In reply to शॉरी शॉरी by स्पंदना
वा !
मस्तच...आवडती भाजी..!!
ह्या भाजीचे इंग्लीश नाव काय
इंग्रजी नाव माहीत नाही पण घोंगुरा म्हणतात
In reply to ह्या भाजीचे इंग्लीश नाव काय by पक्या
धन्यवाद. इथल्या देशी दुकानात
In reply to इंग्रजी नाव माहीत नाही पण घोंगुरा म्हणतात by बेसनलाडू
पूर्व किनार्यावर कधीकधी
In reply to धन्यवाद. इथल्या देशी दुकानात by पक्या
अंबाडीला सॉरेल लिव्हज
In reply to ह्या भाजीचे इंग्लीश नाव काय by पक्या
मला खूप खूप आवडते ही
छान रेसिपी. इथे ते बाटलीतले