काही वेगळ्या रेसिपीज : भाग २
मागच्या भागात आपण स्क्रब्ज च्या रेसिपी पाहिल्या कि ज्यामुळे चेहर्यावरची मृत त्वचा निघुन जाते.
या भागात काही त्वचा उजळ करणार्या ( skin lightening) रेसिपीज पाहु.
आपला प्रत्येकाचा आपल्याला मिळालेला एक वर्ण असतो.तो पुर्णपणे बदलवणे शक्य नसते. म्हणजे जर सावळा वर्ण असेल तर कितीही प्रयत्न केला तरी गोरापान नक्कीच होणार नाही. पण तरीही जो आपला नैसर्गिक वर्ण आहे तो नितळ आणि तजेलदार मात्र नक्कीच होउ शकतो.
१) जेव्हा कधी कच्चा बटाटा किसाल त्यावेळी त्यातला २-३ चमचे कीस बाजुला ठेवून द्या. तो पिळून त्यामध्ये लिंबाच्या रसाचे ४-५ थेंब टाका.आणि चेहर्याला लावून १० मिनिटानी धुवून टाका. काही प्रमाणात naturally bleach होते.आणि उन्हामुळे येणारा काळसरपणा (Tan) हळू हळू कमी होतो.
२) मिल्क पावडर + मध + लिंबू स्किन टोन light करते.
३) साधे खोबरेल तेल + लिंबाचा रस नियमीत वापरा (तेलकट त्वचा असणार्यांसाठी नाही)
४) ओटमिल + दही + टोमॅटो रस एकत्र करून लावा. पॅक साधारण सुकत आला की हळुवार पणे चोळून काढा आणि थंड पाण्याने धुवा.
५) हातांचा काळसरपणा जाण्यासाठी लिंबू रस आणि दुध एकत्र करून लावा ५-६ मिनिटे सुकल्यावर धुवून टाका.
लिंबाच्या साली राहिलेल्या साली हातावर ,कोपर्यांवर घासा. (चेहर्यावर वापरू नका)
६) पपई कुस्करून लावल्याने टॅन जायला खुप मदत होते. पपई ७-८ छोट्या फोडी + मध एकत्र करुन हाता-पायावर लावा. नियमीत (साधारण २-३ दिवसांच्या अंतराने) केल्यास खुप फरक जाणवतो. आणि खबरदारी म्हणून उन्हात जाताना शक्य तेव्हा जॅकेट आणि स्कार्फ घालूनच बाहेर पडा. नाही तर सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा.कारण निसर्ग आहे..तो आपला प्रभाव दाखवणारच! :)
काही उपयुक्त पॅक्स :
१) कुस्करले बनाना २-३ चमचे + मध (कोरड्या स्किन साठी)
२) दही + बेसन + हळद
३) इडली साठी आपण जेव्हा डाळ तांदूळ भिजवतो त्यावेळी वाटून झाल्यावर अर्धी वाटी काढुन ठेवा.(मीठ न घालता) आणि चेहृयावर लावा. अर्धवट सुकत आले की धुवून टाका (हे लिहिताना मलाही हसू येतय्.. :) पण खरच खुप मस्त होते स्किन)
तेलकट त्वचेसाठी तेलकट पणा कमी करण्यासाठी आणि उजळ्पणासाठी काही महत्वाच्या गोष्टी :
चेहरा दिवसातून कमीत कमी ४ वेळा धुण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी टिश्यू ने तरी स्वच्छ करा.कारण सतत तेल त्वचेवर राहिले तर दिसताना तर तेलकट दिसतेच पण स्किन pores (रंध्रे) बंद होउन pimples आणि इतर प्रॉब्लेम वाढतातकरा.
मागच्या भागातल्या रेसिपीज ट्राय करताना बटर, साय ऐवजी दुध किंवा साधे दही वापरा.
१) मध + लिंबू + हळदीची चिमुट
२) काकडीचा कीस + लिबू
३) तांदुळाचे पीठ + बेसन कोरडे मिक्स करून ठेवा आणि चेहरा ओला करुन कोरडे पीठ हलक्या हाताने चोळुन लावा.धुवून टाका.
४) अंडे + कॉर्नस्टार्च (कॉर्नफ्लोअर) चा पॅक लावत जा. त्याने ओपन पोअर्स ब्लॉक होण्यास मदत होते. पर्यायाने चेहर्यावर तेल कमी येते.
तुम्हाला वाचुन कंटाळा आला नसेल तर क्रमशः :)
नाहीतर आठ्वेल तश्या फळ्यावर टाकत जाईन! :)
याद्या
9715
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
पराच्या सूचना अमलात आणल्या
पण त्यामुळे रसभंग होतो आहे
In reply to पराच्या सूचना अमलात आणल्या by मेघवेडा
छान आहे, वाचायला आम्हाला
:) हिहहहह
पॅक= लेप (माझ्या माहितीत
In reply to :) हिहहहह by जाई अस्सल कोल्हापुरी
सूचना चांगल्या आहेत, पण
हेहेहे
In reply to सूचना चांगल्या आहेत, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
या आणखी अश्याच सुचनांची
In reply to सूचना चांगल्या आहेत, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
फेशियलचे भाव
In reply to या आणखी अश्याच सुचनांची by रेवती
हो! नक्किच! माझी पार्लर वाली,
In reply to फेशियलचे भाव by प्रियाली
देवाची कृपा!
In reply to हो! नक्किच! माझी पार्लर वाली, by स्वैर परी
आळशीपणा तर मी पण करते....
In reply to सूचना चांगल्या आहेत, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
छान..यातले माझ्या स्किनला सुट
वा वा ! लिखाण आवडले.
लेप लावा
In reply to वा वा ! लिखाण आवडले. by परिकथेतील राजकुमार