सुसाट......... नादखुळे विनोदः
१)
गब्बर : " ये हात मुझे दे दे ठाकूर..."
ठाकूर (वैतागून) : घे, माझे हाथ घे, विरू चे हात घे, जय चे हात घे, बसंतीचे पण हात घे...सगळे हात गोळा कर आणि दुर्गा माता बन...
गब्बर : माफ कर यार, तू तो sentimental हो गया ....
***********************************************************************
२)
रशियन डोअरकीपरचे नाव काय असेल सांगा बरं?
- "उभाका बसकी"
जपानी हॉस्पिटलच्या बाहेर Silent Zone असतो, तिथल्या पाटीवर काय लिहीलेले असते?
- "हाकानका मारू"
चीनी शाळेचे नाव काय असेल?
- "या शिका"
सिंगापूरमध्ये एक उंच इमारत असते. त्या इमारतीच्या टेरेसवर एक सूचना फलक असतो. त्यावर काय लिहिलेले असेल?
- "वाकू नका"
आफ्रिकन स्विमींग पूल चे नाव काय असेल?
- "या डुंबा डुंब डुम"
***********************************************************************
३)
परीक्षेच्या RESULT नंतर:
जर चांगले गुण मिळून पास झाला तर…
शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ...
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...
जर नापास झाला तर….
शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .
.
.
.
पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....
-
-
-
सगळे बदलतात पण मित्र नाही.
*********************************************************************************
४)
शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर
शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा
थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले,
'' महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?''
...
'' अगं काही नाही गं... हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता''
************************************************************************************
५)
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला चिडवण्यासाठी म्हणतो, "ती बघ तुझी नातेवाईक..!"
.
....
.
.
.
.
.
.
.
बायको : अय्या....!!! सासूबाई !!!!!
*************************************************************************
६)
घोर कलियुग -
एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो.
मुलगी - तुझ्या घरी आई-बहीण नाहीयेत का?
मुलगा - नाही.
.
.
.
.
मुलगी - मग चल ना तुझ्या घरी जाऊ,इथे काय टाईमपास करतोयस!!!!!!!
*****************************************************************************
७)
भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...!
.
.
.
.
....
घरमालक:- अरेSSS....., १५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का????
**********************************************************************************
८)
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???
...
बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ..!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3954
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा आवडता विनोद
हॅ हॅ हॅ. हे सत्यात पण उतरु
In reply to माझा आवडता विनोद by आप्पा
स्टेशन
हे पुणे असणे शक्य नाही.
In reply to स्टेशन by Arun Powar
खरं आहे.
In reply to हे पुणे असणे शक्य नाही. by मृत्युन्जय
उत्तरात सुधारणा :
In reply to हे पुणे असणे शक्य नाही. by मृत्युन्जय
+++१
In reply to हे पुणे असणे शक्य नाही. by मृत्युन्जय
सिंड्रेलाचं आवडतं गाणं
हीहीहीहीही. हे बेष्ट आहे.
In reply to सिंड्रेलाचं आवडतं गाणं by Arun Powar
गणपती बाप्पा
पुनर्जन्म..
बाळा ,तुझे नाश्ता-पाणी तर
In reply to पुनर्जन्म.. by Arun Powar
"इनो घ्या मालक!" -- नक्की
In reply to बाळा ,तुझे नाश्ता-पाणी तर by मृत्युन्जय
इनो घेतल्यावर हा इनोद वाटायला
In reply to "इनो घ्या मालक!" -- नक्की by ३_१४ विक्षिप्त अदिती
मराठी
पुण्यातील दुकानातील अफ्रीकन
विजुभौ कुठे आहे हा बोर्ड?
In reply to पुण्यातील दुकानातील अफ्रीकन by विजुभाऊ
हा.. हा.. विजुभाऊ. लै भारी.
अजुन एक..