ही घटना त्याच काळातली ज्याबद्दल मी काल लिहल आहे.काल लिहलला लेख ह्याच बाबतीत लिहायचा होता.पण दारु कींवा तत्सम नशा करुन माणुस भरकटतो.तसा मी काही कारणांमुळे भरकटलो.म्हणुन गाडीला वेगळेच वळण देउन एका वेगळ्याच कोप-यात थांबवुन टाकली.:)
लहानपण आठवल की मला राग जास्त येतो.मी तसा लहानपणापासुन रागीट व माणुसघाण्या असल्याने मला जग व त्यात घडणा-या घटना एके ठीकाणी शांत उभा राहुन बघायला आवडतात.त्यात सहभागी होउन 'सामाजिक प्राणी' बणने(?) मला कधी जमले नाही.नाही माझ्यात मीपणा नाही हे ह्यासाठी सांगतोय की आता मला ज्या घटनेबद्दल (ह्याला घटना म्हणावे का ही शंका आहे,पण दुसरा पर्यायी शब्द मला माहीती नाही) बोलायचे आहे त्याबद्दल मी खुप काही आठवल की माझा तरकट (म्हणजे सारखा रुसलेला,तक्रारी करणारा म्हणुन सर्वांना न आवडणारा ह्या अर्थाने) स्वभावच लक्षात राहतो.ह्या घटनेत जे सांगणार आहे त्याबद्दलही मला तक्रार करायची आहे,पण कारणीभुत कोणाला धराव(?) हे माहीती नाही.सुरु करतो.
आम्ही मुंबईतच कोठेतरी कामासाठी जात होतो,कामासाठीच असणार फीरायला जाणे वडीलांना आवडत नव्हते.उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन तीन ठीकाणी फीरुन आलो की त्याच आठवणीवर वर्ष घालवणे अपेक्षीत होते.सांगण्याचा उद्देश हा की वडीलांबद्दल मला खुप काही कौतुक वगैरे कधीच वाटल नाही.फक्त लिहुनच मी ते बोलु शकतो म्हणुन ईथे लिहतो.:) असो.
आम्ही बस स्टॉपवर उभे होतो.दीवस थंडीचे व वेळ सकाळची ६-७ची म्हणुन हवेत गारवा होता.मी माझे आवडते पिवळे शर्ट घातले होते.कदाचित दुसरी चॉईसच नसल्याने तेच आवडायचे.त्याखाली निळी जिन्स कींवा तत्सम पॅन्ट घातली होती,पण बुट घातले होते हे आठवतय,तेपण काळे बुट होते,म्हणुन माझी आत्मविश्वासाची पातळी खुप वाढली होती.थंडीत भुक लागते हे वडीलांना मान्य असाव म्हणुन त्यांनी "वडापावला पैसे द्याना" ह्या माझ्या मागणीला बिनविरोध पाठींबा दर्शवत दोन तीन रुपये सुपासारख्या पसरलेल्या हातावर टेकवले.'रस्त्यावरचा वडापाव खायचा नाही खराब असतो' ह्या अर्थाची वाक्ये मला कधी ऐकायला मिळाली नाहीत्,म्हणुन कदाचित माझी रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढली.
वडीलांनी पैसे दीले ह्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात वेळ न घालवता वडापावच्या गाडीजवळ गेलो.
आता मेन सीन सुरु........
समोर एक घाणेरड्या चेह-याचा माणुस थंडीने फुटलेले ओठ पसरुन आतले खराब दात दाखवत माझ्याकडे बघत होता.शरीरातले कपडे घाण,मळकट वगैरे शब्दांच्या मर्यादा अनेक पटीने ओलांडल्यासारखे होते.तो माझ्याकडे बघत माझ्या दीशेने चालु लागला.मी तो जराही जवळ आला की सुरक्षीत धुम ठोकता येईल असे पोजीशन घेतले. तो आला त्याने माझ्याजवळ खाली पडलेल्या कच-याकडे बघितले,वडापाववाला त्याच्याकडे बघुन जोरात काहीतरी ओरडला तसा तो माणुस जरा लांब गेला.पाच सहा हातांवर लांब उभा राहीला,माझ्याकडुन त्याला काही अपेक्षा असावी म्हणुन तो माझ्याकडे बघत होता.मला आजही तो चेहरा पुसटसा आठवतो.माझ्या हातात वडापाव आला.तो माझ्याकडे बघतच होता.पण आता तो लांब होता,म्हणुन मला वडापाव तोंडात भरायचे धाडस झाले.मी त्याला माझा वडापाव देउ शकत नव्हतो.आता खुप विचार केला की अस वाटत की माझ्यात नी त्याच्यात फार काही फरक नव्हता.मीही पैसे मागुनच आणले होते,फक्त देणारे हात माझ्या वडीलांचे होते.असो.
तर तो माणुस माझ्याकडे बघतोय म्हणुन मी मान खाली घालुन वडापाव खात होतो.मी नंतर रहावल नाही म्हणुन परत त्याकडे बघितल्,आता तो थोड्या अंतरावर त्याच्या पायाशी पडलेल्या कच-यात काहीतरी शोधत होता.त्याने तो कागद वगैरे कच-याचा असलेला थर अस्ताव्यस्त (?) केला व त्याच्या तळाशी त्याला हवे ते मिळाले..........................................
.................................................................................................................................
..........
.
.
.
.
.
.................................:( हो,त्याखाली वडा पडलेला होता.कुणाच्यातरी हातातुन पडलेला असावा पुर्ण शाबुत होता.To my surprise,त्याने तो वडा एकदाही,एकदाही हाताने साफ केला नाही,जसा हातात आला तसाच त्याने वड्याचा चावा घेतला.वड्याचा अर्धा तुकडा त्याच्या तोंडात गेला.त्याच्या त्या घाणेरड्या तोडांत तो वडा उठुन दीसत होता.त्याने दुस-या घासात तो वडा संपवुन टाकला.त्यावेळी त्याच्या घशातुन काहीतरी विचित्र आवाज आला,कदाचित समाधान मिळ्याल्याच स्वःतालाच दीलेले सिग्नल असाव.आताही तो वडा त्याच्या तोंडातच होता.तो तसाच चावत चावत तो अधाश्याप्रमाणे कचरा हाताने पसरवु लागला.आता त्याचे साईड फेस अगदीच विद्रुप दीसत होते.त्याला दुसरा वडा भेटला नाही,तो पुन्हा माझ्या दीशेने बघायला लागला.मी जन्माचा हावरट,हे बघुन मी काही माझा वडापाव टाकणार नव्हतो,ना त्याला खायला देणार होतो.मी कसातरी वडापाव घशात कोंबला व तिथुन पळुन गेलो.
त्यानंतरच मला ईतकच आठवत की मला वडापाव घशाखाली गेल्यावर कमालीची तहान लागली होती,obviously मी ज्याच्याकडुन वडापाव विकत घेतला होता,पाणीही त्याच्याकडेच पिणार होतो,पण हींमत होत नव्हती म्हणुन भावाला सोबत घेउन गेलो.आता तो माणुस(का मीहीती नाही पण मी तो वेगळा शब्द कधी वापरत नाही) तिथे नव्हता,मी मनसोक्त पाणी पिले.पण माझ्या डोळ्यासमोर तोच त्याचा चेहरा व तो घटनक्रम येत होता.अगदी आजही मला ते दृश्य तसच्या तस आठवत.
त्याचे ते अधाश्यासारख वड्याला अमानुषपणे चावणे आजही आठवत व समाधान दर्शवणारा त्याच्या घशातुन निघालेला आवाज आठवला की खुप बरं वाटत.:(
वाचन संख्या
3227
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कडू
ओ काकामामाभाउ, टाटा
In reply to कडू by chipatakhdumdum
अरेरे ६२ वाचने एक
शानबा, चांगलं लिहिलं आहेस.
प्रतिसाद आले नाही म्हणून
आणि ती सही अशी काय विचित्र
In reply to प्रतिसाद आले नाही म्हणून by शुचि
शानबा तुम्ही नेहमी "आपण वाचता
In reply to आणि ती सही अशी काय विचित्र by शानबा५१२
+१ असेच म्हणतो.
In reply to शानबा तुम्ही नेहमी "आपण वाचता by शुचि
?????
In reply to शानबा तुम्ही नेहमी "आपण वाचता by शुचि
काही गोष्टी अजिबात विसरता येत
छान ...
काही गोष्टी
पैलवान!!
In reply to काही गोष्टी by गुंडोपंत
कस्चं कस्चं
In reply to पैलवान!! by सहज
मी त्यावेळी चौथीत वगैरे होतो
In reply to काही गोष्टी by गुंडोपंत
चांगले लिहिले आहे
बारीक निरीक्षण आहे शानबा.
तुम्हि लिहिलेल्या लेखाचे
चांगले
शानबा, लिहिताय ते चांगलं