Skip to main content

रंभा- सुधा----

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 05/10/2010 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
हटके पदार्थ---------------- रंभा- सुधा---- साहित्य- सहा केळी , अर्धा लिटर दुध तापवून गार झालेले, साखर एक वाटी, खोवलेला नारळ एक वाटी.काजूचे काप पाव वाटी. कॄती------ तीन केळीचे काप करावेत , तीन कुस्करुन घ्यावीत, त्यात बाकीचे साहित्य घालून ढ्वळत रहावे.साखर विरघळली की रंभा -सुधा खाण्यास तयार. कालच हा पदार्थ केला होता.......पण फोटो काढायचा राहिला.

वाचने 4324
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मस्त पाकॄ @ सुधांशु अरे भौ पाकृ मधे पण रंभा सुधा जिभेवर नाचणार हे काय कमी आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हे तुम्ही बाहेरुन प्रतिक्रिया टंकुन आणुन उनिकोदात परावर्तित करणे सोडा बॉ.....

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>उनिकोदात आता हे कोण आणखी कोदा?

In reply to by नितिन थत्ते

आता हे कोण आणखी कोदा?
Oh my God.* थत्ते चाचा आज चक्क चक्क तुमचा अभ्यास कमी पडतोय ? *सध्या प्रतिसादातील पहिले वाक्य इंग्रजीत लिहिण्याची फॅशन आली आहे म्हणे.

हे नाव वाचून 'सुशिला', 'शकुंतला',' माणिकमोती', 'त्रिपुरसुंदरी ' अशी नावं असलेले पदार्थ आठवले :) अवांतर : कर्नाटकात मणिकेरीच्या जंगलात रहाणार्‍या एका मैत्रिणीकडे शिकरणाचा अजून एक वेगळाच प्रकार चाखला होता. तिकडे मिळतात ती लाल मोठ्ठी केळी काप करून दुधात घालायचे. थोडी साखर नि वेलची घालायची. आणि हे मिश्रण मातीच्या मडक्यात थोडे विरजण घालून रात्रभर ठेऊन द्यायचं. फार सुंदर चव होती त्याची. आपल्याकडच्या केळ्यांचा असा पदार्थ चांगला लागला नाही :(

आमचे अण्णा म्हणतात, 'आम्ही किराणावाले मुरांबा-पोळी, शिक्रणपोळी खाणंच अधिक पसंत करतो..आमचा यमन, शुद्धकल्याण अगदी तसाच आहे! :) असो, छान पाकृ...फार्फार आवडली. जियो..! तात्या. -- प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

हा पदार्थ राजेळी केळी म्हणून मिळतात त्याचा करतात का?

निवेदिता ताई पाकृ छानच आहे. मी हे शिक्रण करताना केळी किसुन घेते त्यामुळे दुधाला थोडा दाटपणा येतो.