अबब, अगबाई केवढ्या मोठ्या शेंगा ह्या संवादावरुन कदाचित ह्या शेंगांना अबई हे नाव पडल असेल. गुलमोहराच्या शेंगांप्रमाणे ह्या शेंगा लांब होतात. फोटोतील शेंगा कोवळ्या आहेत त्यामुळे त्या छोट्या आहेत.
अबईच्या शेंगांची भाजी व आमटी दोन्ही करतात.
अबईच्या अश्या प्रकारे किंवा तुम्हाला हव्या त्या शेप, साईझ मध्ये कापुन घ्या.
अबईच्या शेंगांची डाळ घालुन आमटी
लागणारे साहित्य:
7-8 अबईच्या शेंगा धुवुन,चिरुन
कोणतीही डाळ गरजेनुसार
१ मोठा कांदा,
१ मिरची
४-५ लसुण पाकळ्या
हिंग,
हळद,
मसाला १ चमचा
अर्धा चमचा गरम किंवा गोडा मसाला
चविनुसार मिठ
थोडासा गुळ
२,३ कोकम किंवा लिंबाचा रस
फोडणीसाठी तेल
(ह्या सगळ्यांचा अदृश्य फोटो)
पहिला मस्त गरम गरम तेलावर लसुण गुलाबी करा म्हणजे मस्त स्वाद येतो. आता त्यावर कांदा, मिरची घाला. मिरची ऑप्शनल आहे. मी स्वादासाठी घातली होती.
आता कांद्याला गुलाबी रंग आला की त्यात हिंग, हळद टाका, थोडे परतवुन हिरव्या गार अबईच्या शेंगा घालुन त्यावर मस्त लाल लाल मसाला टाका. त्यावर लगेच कोणतीही डाळ घाला. आता कलर कॉम्बिनेशन न्याहाळा.
नुसत बघत बसु नका रंगसंगती, नाहीतर करपुन जाईल. मी तेच केल. रंग आवडले म्हणुन बघत बसले आणि भाजी खाली थोडी करपली. न्याहाळून झाले की सगळ एकजीव करा. त्यात गरजेप्रमाणे पाणी घाला. आता जरा धिर धरुन डाळ आणि शेंगा शिजुद्या. सगळ शिजल की त्यात राहीलेला माल मसाला म्हणजे मिठ, कोकम किंवा लिंबुरस, गुळ गरम किंवा गोडा मसाला घाला. चांगल उकळू द्या रटरट आवाज करत. आता अबईच्या आमटीचा "अगबाई झाली तय्यार" म्हणून गॅस बंद करा. बघा झाली तय्यार तुमची अगबाई अरेच्चा अबईची आमटी.

वाचने
8839
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रेट पाकृ आणि सांगण्याची
ओर्पा,,,,,,
जागु, तुला कित्ती वेगवेगळ्या
असच म्हणतो
In reply to जागु, तुला कित्ती वेगवेगळ्या by स्वाती२
हेच म्हणतो
In reply to असच म्हणतो by गणपा
अगदी अगदी!
In reply to हेच म्हणतो by सहज
+१
In reply to अगदी अगदी! by प्राजु
मनापासून धन्यवाद
In reply to +१ by प्रियाली
गिरेट..! -- लाखाची गोष्ट,
छान
नाव
नाव
जागू, मस्त पाकृ आहे.. या
मस्तच !
येऊ द्या
In reply to मस्तच ! by मितान
अबईच्या शेंगा मस्तच गं
जागुतै कुठुन कुठुन शोधुन
स्मिता धन्स. राजकुमारजी,