>>>जेव्हा जेव्हा "दु:शला" ला कंटाळा यायचा तेव्हा ती आमच्याबरोबर "द्युत" खेळायची ...
अरे तिच्या तरीच
द्रौपदीची साडी काढत होता तो
त्यांना सवय नसेल ना साड्या पहायची.......अता चिअर गर्ल म्हणलं म्हणजे काय त्यात आलच सगळं..
=))
"अरे तिच्या तरीच द्रौपदीची साडी काढत होता तो ..."
अहो तसे नाही, आम्हाला नाहीत तसल्या घाणेरड्या सवयी ...
उलट आम्हाला तो दु:सोहळा बघवेना म्हणून मी, धमालिस्तानचे युवराज धमालसिंग, मराठा प्रांताचे अधिपती "इनूराव" व आनंदाबादचे सुलतान "आनंदखान", गुजरात शेर "विजूशाह" असे आम्ही सगळे "आलोच चहा मारुन " असे सांगुन बाहेर निघून आलो होतो ...
फुकट आमच्यावर आळ घेता राव ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
हाव ना राव!
एकतर पुरोचनाकडं चहा मारायला गेल्यावर, त्याच्याकडं आमचा ब्रॅन्ड शिल्लक नव्हता, मग मी आणि डान्या दोघांनी विजुभाऊंचा स्वप्नरथ उसना घेऊन अल्ट्रा-माईल्डसाठी शोधमोहिम सुरु केली, तर असंच फिरता फिरता हस्तिनापुराच्या "सेक्टर नं.१५" च्या ३र्या गल्लीतल्या कुंजबिहारी यादवाच्या 'मथुरा डेअरी' मध्ये किसनद्येव 'खारी लस्सी -डबल मलाई मारके' पित बसले होते. त्यांना आम्हीच सांगितलं गडबडीत राजप्रासादात चला, द्रौपदी वहिनींचं वस्त्रहरण करताहेत आमचे दादा.
किसनद्येव म्हणाले तरीच आंद्या मला सारखा फोन करत होता होय? इथं तिच्यामारी रेंजच मिळत नाही आमच्या मोबाईलला.
आता बोला !
का आमच्यासारख्या सज्जन कौरवांना आमच्या दादांच्या पापात सहभागी करता?
हे लोक चहा मारायला माझ्या गाडिवर यायचे.
(मी कौरवाम्तर्के महालाच्या सर्व प्रकारच्या खाद्य गाड्या वगैरे सांभाळायचो.)
चहा सोबत ह्यांना मी इतर पदार्थ :-
जसे "कृष्ण भजी", " दु:शासन दाबेली","अर्जुन चिवडा", 'घटोक्तच जम्बो केक', 'दुर्योधन सिगारेट' ,'धर्मराज सात्विक उसळ'
आणि "झणझणित तात्या मिसळ" इत्यादी उत्तम उत्तम वस्तु पुरवत असे.
पंचक्रोषित माझे नाव "पुरोचन"((वस्तु) पुरवतो तो पुरोचन!) म्हणुन फेमस होते.
डिसक्लेमरः-
ह्यातला कुठलाही मजकुर २० शतकातील कोणत्याही थोर विभुतींना आणी वस्तुंना लागु होत नाही.
असल्यास निव्वळ योगायोग समजावा.आणी त्यातुन नवे "महाभारत" सुरु करु नये, ही अतिनम्र विनंती.
आपलाच,
मनोबा
पंचक्रोषित माझे नाव "पुरोचन"((वस्तु) पुरवतो तो पुरोचन!) म्हणुन फेमस होते.
पुरातन वस्तु पुरवतो तो पुरोचन अशी ही या नावाची एक फोड आहे.
आणि राजवाड्या च्या भांडरात जुन्या जुन्या वस्तु पुरवल्या म्हणुन कंत्राट कॅन्सल झाले होते.
पुरोचनाने सिमेंट मध्य लाख भेसळ करुन मटेरिअल पुरवलेल्या लाक्षगृहाला लागली आग त्यामुळेच लवकर विझु शकली नाही .
असे आगी नंतरच्या चौकशीत सिद्ध झाले होते.
हा पुरोचन त्यानेच दिलेल्या भेसळ युक्त सिमेंट ने बांधलेल्या जेलच्या भिंतीला भोक पाडुन फरार झाला....(आजतागायत फरारी आरोपीचा शोध लागला नाही. अनधीकृत सूत्रानी दिलेल्या माहतीनुसार त्या पत्त्यावर आता कोण्या साठ्यांचे नाठाळ कार्टे रहाते)
हा इतिहास हस्तिनापूर दफ्तर ३ धाकटी पाती क्र ५ मध्ये सातव्या श्लोकात लिहिला आहे.
( संदर्भ : भूर्जपत्र जावक क्रमांक २३४३२/ह धा पा/ खरड उतारा ७/बवकृआ/फ आ नों)
महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते.
=)) =)) =)) =)) =))
प्रतिक्रिया
पुरूषाचा जन्म..
आयला,
घटोत्कच
आयला,
मग
>>>जेव्हा
पुन्हा तेच ...
फुक्कट आळ!!!
मी पण...
असल्यास
सुटले
जबराच
पुरोचन
महाभारतात
छान!! मायबो
लय भारी....