या कौलात कोणाचीही चेष्टा करण्याचा हेतू नाही. देव हा कित्येक काळापासून मानवाला कोड्यात टाकणारा विषय आहे. त्यावर बरंच संशोधनही झालेलं आहे. पण अशा संशोधनात आपण कोणीही भाग घेतलेला नसतो. म्हणून आपल्या मिपावरच्या मित्रमंडळींना काही अनौपचारिक प्रश्न विचारून व त्यांच्या उत्तरांतून काय दिसून येतं याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. यातून जे निष्कर्ष निघतील ते वैज्ञानिक सत्य वगैरे असण्यापेक्षा आपल्याला विचार करताना दिशा द्यायला उपयोगी पडतील अशी आशा आहे.
एके काळी कौल लिहिताना त्या कौलामागे काय कारणपरंपरा आहे हे लिहिण्याची सोय होती. आता ती नाही. तरीही मी पहिलाच प्रतिसाद टाकून तो कौल भंपक नाही http://www.misalpav.com/node/14698#comment-243682 असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक प्रतिसाद टाकून http://www.misalpav.com/node/14698#comment-243660 यात देवाचा व त्यातून निर्माण होणाऱ्या श्रद्धांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे असं सांगितलं होतं.
मिपावर जे तांत्रिक बदल झाले त्यामुळे दुर्दैवाने कौलांवर पहिले प्रतिसाद देखील प्रथम दिसत नाहीत. त्यामुळे हे प्रतिसाद तुमच्या नजरेत आलेले नसण्याची शक्यता आहे. अन्यथा तुम्ही "काय उपयोग कौलाचा" म्हणून चिडवलं नसतंत असं वाटतं. फुटकळ धागे बरेच येतात, पण सरसकट टिप्पणी करण्याआधी जर लेखकाने हा धागा फुटकळ नाही, असं लिहिलं असेल तर निदान त्यामागची भूमिका तरी वाचावी. असो. लवकरच मी त्या कौलावर आधारित लेख टाकेन. (तेही पहिल्या प्रतिसादात लिहिलं होतं) त्यावेळी जर तुमचा काही सार्थ प्रतिसाद आला तर आवडेल.
मिपावर जे तांत्रिक बदल झाले त्यामुळे दुर्दैवाने कौलांवर पहिले प्रतिसाद देखील प्रथम दिसत नाहीत. त्यामुळे हे प्रतिसाद तुमच्या नजरेत आलेले नसण्याची शक्यता आहे
हे माहित असूनही आमचा प्रश्नरूपी प्रतिसाद आपल्या स्पष्टीकरणापूर्वीच आला होता याकडे अमंळ दुर्लक्ष झालेलं दिसतय. पण असो, विषय तसा गंभीर असल्यानं होतं असं कधी कधी.
देव नाही. राम, कृष्ण काल्पनिक होते. व्यास , वाल्मिकी वगैरे जेफरी आर्चर, सिडने शेल्डन सारख्या कल्पक माणसानी रन्गवलेली पात्रेच ती!
श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिन्ह सरस्वती, स्वामी समर्थ वगैरे दोन हात, दोन पाय आणि एकच नाक असणारी सामान्य माणसेच. साधना, उपासना वगैरे वेळेचा अपव्यय, आणि साक्षात्कार हा भ्रमिष्टपणा.
साधना, उपासना वगैरे वेळेचा अपव्यय, आणि साक्षात्कार हा भ्रमिष्टपणा.
हे मात्र मनापासून आवडले! च्यामारी सगळी संतमंडळी थोतांडच सांगत होती येकुणात! कोण आहे रे तिकडे.. थ्ये दासबोध, ज्ञानेश्वरी, नाथभागवत आण बघू जरा.. स्साला सगळं पेटवूनच टाकतो येकदाचं तिच्यायला!!
मत वरीलप्रमाणे दिले आहे. कारण त्याचेच फक्त आस्तित्व जाणवते.
देणार्याने देत रहावे
घेणार्याने घेत रहावे
घेता घेता घेणार्याने
एखाद्या'कौली' देणार्याचे मत घ्यावे
पहिला सोडुन सगळेच पर्याय योग्य वाटत असल्याने मत दिलेले नाही.
शेवटुन दुसरा पर्याय वाचुन देवबाप्पांची आठवण झाली.
त्यामुळे देव मुंबईत आहेत अस पर्याय आला असता तर आम्ही मत दिलं असतं बॉ! :D
देवबाप्पा,
तुम्ही जिथे कुठे असाल, तिथून परत या. तुम्हाला कोणी रागावणार नाही. तुम्ही गेल्यापासून पर्यानं दारु सोडली आहे, टिंग्या हलकटपणा करत नाही, नानुने हिंदूसंस्कृती आणि वेदाभ्यासावर लिहिणे सोडलं आहे.
आम्ही तुमची वाट पाहतो आहोत, लवकर परत या. :)
वा वा !! चान चान !!!
काही दिवसांपुर्वी नव्या मेंब्रांनी उच्छाद मांडला होता. आता जुन्या जाणत्या खोंडानींही तोच मार्ग अवलंबला आहे.
बहुतेक वचपा काढायची वेळ आहे.
असचं चालुद्या
>>देव अस्तित्वात आहे की नाही
आहे म्हणजे आहेच.
>>असल्यास कुठे?
नक्की माहित नाही, पण देवाला बघितले आहे, धुसरसे,
बर्यान्चदा इथेच मिपावर (काहींच्या प्रतिक्रियांमध्ये), रस्त्यांवर, ( काही वृद्द लोकांना रस्ता ओलांडताना मदत करताना ) काही ठिकाणी (अनाथ मुलांच्या शाळेला कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय देणगी देताना), काही विशिष्ट लोकांमध्ये, जी माणसांशी माणसांप्रमाणेच वागतात, एका वैदिनीमध्ये जीने आपला अर्धा भाकरीचा तुकडा समोरच्या कुत्र्याला टाकताना तिच्यात मी देव पहिला होता. आपल्या पिल्लांसाठी झगडताना एका कुत्र्यामध्ये, आपल्या वासराला मायेने चाटत असताना एका गायीमध्ये,
मी देवाला स्पष्ट बघू शकत नाही , कारण माझी दृष्टी तितकी सक्षम नाही, पण समजल्यास इथे टंकायला नक्कीच आनंद होईल.
कल्पकता हा विषय अश्लीलतेसारखा असतो. त्याची व्याख्या करता येत नाही. पण दिसल्यावर मात्र कळतो. शिकवता तर येतच नाही. तुम्हाला शिकवण्याची गरज आहे असंही वाटत नाही. तुमच्याकडे ती भरपूर आहे. इथे ती वापरून शोऑफ करता असं वाटलं इतकंच.
ऐ साकी मुझे पिला मस्जिद मे बैठकर.....
ऐ साकी मुझे पिला तु मस्जिद मे बैठकर....
...या फिर वो जगह बता जहॉं खुदा नही......!
किती साध्या ,सरळ शब्दात केती गहन गोष्ट मांडली आहे.
(इथे खुदा 'परमेश्वर ' या अर्थाने घ्यावा)
आणि माणसातलं देवत्व कथन करणारी अजुन एक नज्म आहे...
...बहुत दूर है मस्जिद यहा से..
...बहुद दूर है मस्जिद यहा से..
..चलो किसी बच्चे को हसाया जाए!
अशी गुरू नानकबद्दल आख्यायिका आहे :
गुरु नानक मक्केला पोचले, आणि एकदा कुठेतरी विश्रांतीसाठी आडवे झाले. कोणीतरी त्यांना हटकले - "काब्याच्या दिशेला पाय करतोस!" नानक म्हणाले "क्षमा करा, मी म्हातारा आहे, दमलेलो आहे, आणि दिशा वगैरे मला नीट कळत नाही. पवित्र काबा नाही (अल्ला नाही) ती दिशा बघून माझे पाय तुम्हीच तिकडे ढकला..." हटकणारा वरमला, कळायचे ते कळून चुकला.
या आख्यायिकेचे आणखी चमत्कारी रूप असे, की त्या नाठाळ हटकणार्याने नानकांचे पाय ढकलले, पण प्रत्येक वेळी ज्या दिशेला ढकलले, त्या दिशेला दूरवर काबा दिसून आला.
तात्पर्य काय्...तर चरा चरात देवत्व आहे!
माझी श्रद्धा त्या एक supernatural शक्तिवर आहे. आणि मला वाटतं की आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण destined आहे. त्याला देव म्हणा, परमेश्वर म्हणा..किंवा universal power म्हणा.
...त्या शक्तिचे अस्तित्व नाकारता तर येतच नाही.
देव चराचरात अशी खरोखर अनुभूती असेल तर तसे आचरण होते (आत्मोपम्य बुद्धी होते). ती होईतो सगुण भक्ती, नामस्मरण, ध्यान वगैरे करणे उपयोगी पडते असेच सन्त सान्गतात. तेव्हा हे चराचरात प्रकरण आपले आपल्याला तपासून बघता येईल आणि तसे केल्यास फायदाच होईल असे वाटते. बाकी चू. भू. दे. घे.
हीच गोष्ट खर्या विसोबा खेचरांची पण ऐकलेली आहे:
संत गोर्या कुंभाराकडे निवृत्ती,ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव आणि अजून काही संतमंडळी जमलेली असतात. तेंव्हा जेवणाच्या पंगतीत वाट पहात असताना मुक्ताबाई गोर्या कुंभारास म्हणते की प्रत्येकाचे मडके (डोके) तपासून कच्चे का पक्के ते पहा. मग गोरा प्रत्येकाच्या डोक्यावर हळूच मडक्यावर जी काठी मारून बघायचा ती मारून बघतो आणि शांत बसलेले पाहून पक्के मडके म्हणतो. नामदेवाला मात्र ती काठी लागते आणि तो लागले म्हणून ओरडतो. तर गोरा गंमतीत म्हणतो हे मात्र कच्चे मडके. सर्वजण प्रेमाने हसतात.
मात्र नामदेवास हे खूप लागते, आपल्याला दुखले आणि इतरांना नाही... आपण खरेच का कच्चे मडके? तो विठ्ठलाकडे देवळात जातो तर त्याला आवाज ऐकायला येतो की तू विसोबाकडे जा.
शोधाअंती समजते की विसोबा शंकराच्या देवळात आहे. तेथे जातो तर त्याला दिसते हा विसोबा शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय. नामदेव त्याला ओरडतो. मग विसोबा म्हणतो की मला माझे पाय पण उचलवत नाहीत तूच बाजूस ठेव. मग जिथे ठेवायचा प्रयत्न करतो तिथे शंकराची पिंड तयार होते आणि पाय परत पिंडीवर. मग नामदेवाच्या लक्षात येते. विसोबाला नमस्कार करतो आणि गुरू मानतो...
या दृष्टांतकथेतील धागा एकदम मस्त पटण्यासारखा आहे. नामदेवांबरोबर या कथेचे बीज पंजाबात गेले असेल काय?
(नामदेव पुढल्या आयुष्यात पंजाबात गेले, त्यांच्या पंजाबी/हिंदी रचना ग्रंथसाहेबात आहेत... नानक मक्केला खरोखर गेले की नाही, याबाबत संदेह आहे.)
नानकांची गोष्ट आजच वाचली आणि नामदेवांची लिंक आहे का असेच वाटले (नामदेव हे गुरू नानकांच्या आधीचे असल्याने, नाहीतर उलट देखील असू शकते). बाकी नानक मक्केला गेले असावे असे विकी आणि शिखांच्या काही संकेतस्थळांवरून वाटले.
ऐ साकी मुझे पिला मस्जिद मे बैठकर.....
ऐ साकी मुझे पिला तु मस्जिद मे बैठकर....
...या फिर वो जगह बता जहॉं खुदा नही......! >>>>>
मत पी शराब गालीब मस्जीद मे बैठकर,
मत पी शराब गालीब मस्जीद मे बैठकर,
... एक ही बोतल है, कही खुदा ना मांग ले.. !
--टुकुल
ऐ साकी मुझे पिला मस्जिद मे बैठकर.....
ऐ साकी मुझे पिला तु मस्जिद मे बैठकर....
...या फिर वो जगह बता जहॉं खुदा नही......! >>>>>
मत पी शराब गालीब मस्जीद मे बैठकर,
मत पी शराब गालीब मस्जीद मे बैठकर,
... एक ही बोतल है, कही खुदा ना मांग ले.. !
--टुकुल
देव टिंग्याच्या कौलात आहे
देव नानाच्या मौनात आहे
देव धम्याच्या ठ्यॉ.मध्ये आहे
देव || काड्यावाल्यांच्या|| भ्यॉ.मध्ये आहे.
देव अभिव्यक्तीस्वातन्त्र्यात आहे
देव कौलांच्या पारतंत्र्यात आहे.
देव घासकडबींच्या त्राग्यात आहे
देब मिपाच्या गुंडाळलेल्या धाग्यात आहे
देव आयडी तआहे. देव बायडीत आहे
देव शरदिनीच्या कवितेत आहे.
देव भडकमकरांच्या गाथेत आहे.
देव रामदासांच्या लेखात आहे
देव गणपाची रेशीपी खात आहे.
( पुढचे तुम्ही जूळवा)
प्रतिक्रिया
निवेदन
टिंग्या, टिंग्या, कित्ती हे
In reply to निवेदन by ब्रिटिश टिंग्या
देव आहे....अलाहबाद हायकोर्ट
In reply to टिंग्या, टिंग्या, कित्ती हे by यशोधरा
देव आहे....अलाहबाद हायकोर्ट
In reply to टिंग्या, टिंग्या, कित्ती हे by यशोधरा
बर्याच दिवसात मिपावर देव
In reply to निवेदन by ब्रिटिश टिंग्या
निष्कर्ष निघाल्यावर त्यावर
In reply to निवेदन by ब्रिटिश टिंग्या
माझंही पुष्करिणीला अनुमोदन.
In reply to निष्कर्ष निघाल्यावर त्यावर by पुष्करिणी
कौलाचा उपयोग
In reply to निष्कर्ष निघाल्यावर त्यावर by पुष्करिणी
मिपावर जे तांत्रिक बदल झाले
In reply to कौलाचा उपयोग by ब्रिटिश टिंग्या
हम्म
In reply to निवेदन by ब्रिटिश टिंग्या
साधना, उपासना वगैरे वेळेचा
In reply to हम्म by मूकवाचक
टिंग्याम्हाराजांच्या कवलाला
तीन नम्बरच्या पर्यायाला मत
देव सध्या दिवाळी अंक काढण्यात बिझी आहे!
हा भंपक कौल नाही.
देव
In reply to हा भंपक कौल नाही. by ब्रिटिश टिंग्या
पर्याय ३ ला मत दिले. देव
देव
वैयक्तिक प्रश्न! पास!
मत दिलेले नाही.
अॅरिस्टॉटल
In reply to मत दिलेले नाही. by धमाल मुलगा
वा वा !! चान चान !!! काही
खैरात लगी बटने, जब.... काय रे
नंटिंग्या मेमो आला का काय ?देव जळी स्थळी काष्टी पाषाणी
>>देव अस्तित्वात आहे की नाही
कल्पक कौल.
ह्म्म
In reply to कल्पक कौल. by राजेश घासकडवी
कल्पकता
In reply to ह्म्म by ब्रिटिश टिंग्या
काय?
In reply to कल्पकता by राजेश घासकडवी
कल्पकतेचा अभाव
In reply to काय? by ब्रिटिश टिंग्या
एक खुप सुन्दर गालिब ची नज्म आहे...
हीच गुरु नानकची गोष्टही आहे
In reply to एक खुप सुन्दर गालिब ची नज्म आहे... by जाई अस्सल कोल्हापुरी
हं.....!
In reply to हीच गुरु नानकची गोष्टही आहे by धनंजय
चराचरात वगैरे
In reply to हं.....! by जाई अस्सल कोल्हापुरी
(खरे) विसोबा खेचर
In reply to हीच गुरु नानकची गोष्टही आहे by धनंजय
मस्त
In reply to (खरे) विसोबा खेचर by विकास
असेच वाटले
In reply to मस्त by धनंजय
त्या गालिब च्या नज्मला उत्तर..
In reply to एक खुप सुन्दर गालिब ची नज्म आहे... by जाई अस्सल कोल्हापुरी
त्या गालिब च्या नज्मला उत्तर..
In reply to एक खुप सुन्दर गालिब ची नज्म आहे... by जाई अस्सल कोल्हापुरी
तद्दन भिकार कौल. अर्थात
देव म्हणजे काय ह्याची
नाना शी सहमत
तुला कशाला रे नसत्या चौकशा
१+
In reply to तुला कशाला रे नसत्या चौकशा by Nile
+२
In reply to तुला कशाला रे नसत्या चौकशा by Nile
दुसर्या पर्यायाला मत दिले
देव टिंग्याच्या कौलात आहे देव
In reply to दुसर्या पर्यायाला मत दिले by विसोबा खेचर
पृथ्वीवर माणूस उपराच ! लेखक -