काल घरी बसूनच काम केलं... संध्याकाळी बराच कंटाळा आला होता.... त्यात बेसन पेरून सिमला मिरची खायची इच्छा झाली.
फ्रीज उघडून बघितला तर मिरच्या होत्या.. मस्तपैकी पीठ पेरून भाजी केली. ही घ्या कृती.
साहित्यः
१. ३-४ मोठे चमचे तेल
२. १-२ हिरव्या मिरच्या तुकडे करून
३. २-३ सिमला मिरच्या चिरून
४. ३-४ मोठे चमचे चण्याचे पीठ
५. बरेच जण ह्यात कांदा घालत नाहीत. पण मला आवडतो म्हणून मी वापरला..त्यामुळे हवा असल्यास १ मोठा कांदा चिरून
६. फोडणीसाठी हिंग, मोहरी. जिरे, कडिपत्ता
७. अर्धा चमचा हळद
८. मीठ (चविनुसार)
९. लाल तिखट (चविनुसार)
कृती:
१. कढईमधे मध्यम आचेवर तेल गरम करा.
२. तेल गरम झालं की त्यात हिंग, जिरे, मोहरी,हिरव्या मिरच्या व कडिपत्त्याची फोडणी करा.
३. त्यात कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परता.. (साधारण ३-४ मिनिटे)
४. त्यात चिरलेली सिमला मिरची टाकून एक मिनिट परता.
५. आता त्यात मीठ टाकून हलवा व झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजवा.
६. सिमला मिरची शिजली की त्यात हळद,तिखट टाकून एकजीव करा.
७. त्यावर बेसन भुरभुरवा.
८. सर्व मिश्रण एकत्र करून त्यावर झाकण ठेवा. मंद आचेवर एक दणदणीत वाफ काढा. (५-७ मिनिटे) म्हणजे बेसन शिजेल.
मस्त गरमा गरम पोळीसोबत खा. तोंडी लावायला मेतकुट घ्यायला विसरू नका.. ;)
@रेवतीताई : मेतकुट संपलं आहे... पुढचा लॉट लवकर पाठव.. ;)
वाचने
12763
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
देश तिकडे अयोध्या निकालात
मस्त भाजी........... अशी भाजी
प्रभोशेठ, कवा येतायसा
मस्त फोटो
आहाहा !
आय टी वाली
In reply to आहाहा ! by मस्तानी
म्हणूनच
In reply to आय टी वाली by शेखर
प्रभ्या चा पाकृ ला चान चान
का हो ?
In reply to प्रभ्या चा पाकृ ला चान चान by निखिल देशपांडे
दुरुस्ती- चान चान म्हटलं की
In reply to का हो ? by मस्तानी
भाजी छान!
:))))
In reply to भाजी छान! by पिवळा डांबिस
दह्यात कालवलेलं आहे म्हणून..
In reply to भाजी छान! by पिवळा डांबिस
आता पिडांकाकांनी दिलेल्या
In reply to भाजी छान! by पिवळा डांबिस
प्रभो, अरे किती जाहिरात करशील
किती
In reply to प्रभो, अरे किती जाहिरात करशील by रेवती
घरचा आहेर
In reply to प्रभो, अरे किती जाहिरात करशील by रेवती
प्रभो
धन्यवाद, करून पाहतो
In reply to प्रभो by चिंतामणी
बेसनलाडू
In reply to धन्यवाद, करून पाहतो by बेसनलाडू
तुम्ही सूचना केल्याबद्दल तुम्हाला
In reply to बेसनलाडू by चिंतामणी
हा हा हा.
In reply to तुम्ही सूचना केल्याबद्दल तुम्हाला by बेसनलाडू
अरे वा ! मस्तच दिसतेय भाजी...
छान.
बरोबर् ..पीठ पेरलेली ढबू
In reply to छान. by चित्रा
ग्रेट..! -- काही नगण्य अपवाद
मस्त रे प्रभ्या
प्रभो, मस्तच रे !!
वा!
In reply to प्रभो, मस्तच रे !! by सूड
करुन पाहते!
मस्तच...!!
वा वा! प्रभ्या, छान रेशिपी
वा वा वा प्रभ्या लै भारी
सर्व वाचक-प्रतिसादक
आता काकालोक रागावणार
In reply to सर्व वाचक-प्रतिसादक by प्रभो