Skip to main content

एका कारसेवकाचं मनोगत !!

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आधी हि लिंक वाचा !! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms आज अठरा वर्षांनी आलेल मनोगत मला पुर्ण पटले वा पटले नाही असे नाही...मी औ.बादला असताना बरेचशे पाकधार्जीणे मुस्लीम पाहिलेत.भर चौकात टीव्ही लावुन पाकिस्तान संघाची मॅच काय बघतात,त्यांच्यासारखी केशभुषा काय करतात. ईकडे नागपुरचाळीत असताना एकदा एका मुस्लीम दुकानदाराने,ईंडिया मॅच हारल्यावर ' अरे तुम्हारी ईंडिया हार गयी ' असं एकवले होते.ईतकी धर्माधंता ? अर्थात हिन्दुमध्ये धर्माधंता नाही असे नाही.पण मंदिराच्या जागी मस्जिद किंवा मस्जिदच्या जागी बांधुन प्रश्न सुटणार आहे का ? होय ठीक आहे मस्जिद तोडली गेली पण म्हणुन सर्व हिन्दु दोषी आहेत का ? मग बुध्दाचे पुतळे विटंबित करणारे मुस्लीमही दोषी नाहीत का ? जस्ट डोन्ट नो व्हाट ईज राईट एन्ड व्हाट ईज राँग ...प्लीज सजेस्ट सध्या अयोध्या खटल्याचा निकाल लवकरच लागणार असल्याने हा धागा सध्यासाठी वाचनमात्र केला असून या विषयावर चर्चा संपादक मंडळाच्या विचाराने सुरू करण्यात येईल. कृपया संयम बाळगावा, ही विनंती. -संपादक मंडळ

वाचने 2999
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

माझे मत - जो पर्यंत राष्ट्रिय मत बनत नाही तो पर्यंत जसे आहे तसेच ठेवावे - अश्वथाम्याच्या डोक्यावरच्या जखमे सारखे. आपल्या पिढ्यांना कळले पाहीजे आपण वेळीच जाकरुक झालो नाही तर काय होते ते. ह्यात धर्म येतच नाही. आपल्या राष्ट्रावर बाबर चे आक्रमण झाले हा इतिहास. त्या आक्रमणा निमित्ताने मिर बाकी ने बांधलेल्या बाबर च्या गौरवाची मशिद आपल्या राष्ट्रविरोधी आहे की नाही हे आपल्याला कळले पाहीजे. ज्यांना हे राष्ट्र आपले आहे असे वाटते ते असल्या आक्रमणाच्या निशाणि विरुद्ध आपोआपच होतील. जर उद्या अमेरीकेच्या लक्षात आले की ओसामा लादेन ने त्याचे स्मारक डब्लु टी ओ च्या जागेवर बांधले आहे तर तिथे लोकांना काय वाटेल. ते स्मारक पुजतील का धिक्कारतील. आपल्याला हा संभ्रम पडतोच कसा. माझे ह्या बाबतीतले मत इच्छुकांनी www.rashtravrat.blogspot.com मध्ये, "MAKING PEACE WITH HISTORY" ह्या नावाने २२ सप्टेंबर ला पोस्ट केलेले वाचावे. इंग्रजी मधुन असल्या कारणाले येथे देत नाही. राष्ट्रर्पण

In reply to by रणजित चितळे

आपल्या प्रतिक्रीयेत आमचे एक दुरदेशीचे काका दिसले. असो.. सर्वांच्या भावनांची कदर + आस्था + आदर वगैरे ठेवुनही आपले तर स्पष्ट मत आहे की त्या जागेवर एक छानसा बार उभा करावा. कोणत्याही बारमध्ये जेवढी एकता दिसते तेवढी कुठल्याही देशात दिसत नाही. सर्व धर्म / जाती-जमाती / वंश / वर्ण / रंग / वय हे विसरुन लोक तिथे गुण्यागोविंदाने एकत्र येतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

"बैर बढाते मंदिर-मस्जिद, मेल कराती मधुशाला" असे सिनीअरमोस्ट बच्चनसाहेबांनी म्हटलेले आहेच. ;)

ते त्या व्यक्तीचे मनोगत आहे. त्याला जे काय वाटले ते तिथे लिहिले गेले आहे. त्या मनोगताचा इथल्या औ. बादच्या किंवा नागपूरचाळीतल्या मुस्लीमांशी बादरायण संबन्ध कशासाठी लावला गेलाय हे कळालेच नाही. तात्काली उन्मादाच्या भरात किंवा भावनेच्या भरात एखादे कृत्य केले त्याचा नन्तर पश्चाताप होतो. जे केले त्याची खरोखरीच गरज होती का याचा विचार पडतो. हे शक्य आहे. जॉर्ज बर्नाड शॉ ने म्हंटले होते की "मी घाऊक तिरस्कार करत नाही." औ.बादचे काही लोक तसे वागतात म्हणून सगळे तसेच आहेत का? नागपूरचाळीतील एखादा माणूस वागतो म्हणून एखाद्या समाजातील सगळेच लोक तसेच असतात का? बर्‍याचदा शिक्षणामुळे देखील विचारातील कट्टरतेत फरक पडतो. अशिशीक्षिताना भडकावणे सोपे असते. माझ्या मुलीला तिच्या शाळेत कोणीतरी मुस्लीमांबद्दल वेडेवाकडे काहितरी सांगितले होते. त्यावर मी तीला ओळखीतल्या अनेकांची उदाहरणे देऊन सगळेच तसे नसतात असे साम्गितले. हे म्हणजे काही हिंदू च्या एका पुस्तकात "करतल भिक्षा वृक्षतल निवास " म्हणजे हाताच्या तळव्यात मावेल एवढीच भीक्षा मागून उदरनिर्वाह करावा . घर वगैरे न बांधता झाडाखाली झोपावे असे म्हंटले आहे. म्हणून सगळे हिंदू भीक मागून जगतात असा याचा विपर्यास करायचा का? बामियान चे बुद्धाचे पुतळे तोडणार्‍याना अफगाण जनतेची सहानुभूती कधीच नव्हती. त्या राजवटीला त्यांच्यावर लादले गेले होते. सगळेच अफगाणी लोक तालीबानी नव्हते. तसेच सगळेच धर्मांध नसतात. मंदीर असले किंवा मशीद असले तरी काय फरक पडणार आहे. त्या ताळे लावलेल्या मशीदीत कोणीच जात नव्हते. हिंदू अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर आणणारानी मशीदी चा अजेंडा केवळ निवडणूका डोळ्यांपुढे ठेवून राबवला. त्यामुळे त्यांची राजकीय रोटी भाजून झाली. भाजप सत्तेवर असताना अडवाणीना एक दिवसही रामजन्मभूमीची आठवन झाली नव्हती. कारन त्या नुसत्या आठवणीमुळे सुद्धा त्यांचे सरकार कोसळू शकले असते याची त्याना जाणीव होती. भाजपलाच आता अडवाणी जड झाले आहेत. संघ परीवाराला सगळ्याच बाबतीत नेहमीच संभ्रम असतो. केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठी समाजांमध्ये काड्या लावण्याचा उद्योग करणारे लोक फक्त समाजातील उपयोगी घटकाची माथी भडकवण्याची कामे करतात. पर्यायाने देशाचे नुकसानच करतात.

In reply to by विजुभाऊ

नागपूरचाळीतील एखादा माणूस वागतो म्हणून एखाद्या समाजातील सगळेच लोक तसेच असतात का?
सहमत. अंडरवर्ल्ड/गुन्हेगारी जगतात मध्ये अनेक मराठी माणसे आहेत्. ह्यावरून अमराठी माणसांनी काय निष्कर्ष काढायचा?कोट्यावधींचा कर बुडवणारे हॉटेलवाले,बिल्डर्स्,कंत्राटदार,राजकारणी हे बहुतांशी हिंदु आहेत. ह्यावरून काय बोध घ्यायचा? देशाचे खरे शत्रु कोण? हे लोक की केवळ मॅचच्या निमित्ताने फटाके वाजवून टाइमपास करणारे लोक? --

In reply to by विजुभाऊ

जॉर्ज बर्नाड शॉ ने म्हंटले होते की "मी घाऊक तिरस्कार करत नाही." हे वाक्य पी. जी. वूडहाउसने म्हटले आहे ( जेव्हा त्याला विचारले गेले की "डु यू हेट जर्मन्स?" त्याने हे उततर दिले होते.."आय डोन्ट हेट इन प्ल्यूरल्स") ही आठवण पु.ल. देशपांडे यांनी वूडहाउसच्या लेखात लिहिली आहे.... बाकी शॉने काय म्हटले आपल्याला माहित नाही...

आपल्या प्रतिक्रीयेत आमचे एक दुरदेशीचे काका दिसले. दूरदेशी गेला काका...................

आज १८ वर्षांनंतर कारसेवकाच्या आपल्या भूमिकेकडे त्रयस्थपणे पाहताना मन निराश होतंय. तो उन्माद, तो जोश, तो कट्टरपणा, तो साहसवाद... सारंसारं गळून पडलंय. अर्थात ही मनोवस्था एका रात्रीत बदललेली नाही. बाबरी पतनानंतर देशात, मुंबईत उसळलेली दंगल, मुंबईतली बॉम्बस्फोट मालिका, गुजरातची दंगल, ‘ ते ’ आणि ‘ आपण ’ यात रुंदावलेली दरी, हजारो निरपराधांचे बळी, दुभंगलेली मने, राजकारण्यांचा स्वार्थीपणा, देश म्हणून झालेलं नुकसान, हाती काल लागलं याची कॅलक्युलेशन या सर्वाची टोटल एकच झाली, जे झालं, जे केलं ते नक्कीच कौतुकास्पद नव्हतं. काय मिळालं असं करून हाच एक प्रश्न मनात उरलाय, उरतोय. धर्म, जात, धर्माभिमान, जाज्ज्वल्य हिंदुत्त्ववाद, हे सारं एका ठिकाणी आणि मानवता, देश, धार्मिक सहनशीलता, सहजीवन, देशाचा विकास, तरुणांच्या समस्या हे दुस-या बाजूला. दोन्ही एका तराजूत मोजलं तर दुस-या बाजूचे पारडे जड राहील हे नक्की. मग काय मिळवलं असं करून हा प्रश्न अद्याप निरुत्तर आहेच. त्यांचं आणि आपलं सहजीवन अपरिहार्य आहे याची खात्री पटत चालली आणि पूर्णपणे पटली आहे. मग काय मिळतं असं करून. पाण्यात काठी मारल्याने ते दुभंगणार नाही हे माहीत असूनही का मारायची काठी. वरच्या तरंगांसाठी ? , मंदिर-मशीद नाही बनली तर सर्वसामान्यांचं कुठे अडलंय, गेल्या अठरा वर्षांत कोणाचं अडलं नाही आणि यापुढेही अडणार नाही. का म्हणून पुन्हा तेच वातावरण तयार करायचं, कोणासाठी, वाढती बेरोजगारी, दहशतवाद, शेजारी राष्ट्रांच्या वाढलेल्या भारतविरोधी कारवाया ही संकटं कमी आहेत का ? उद्या अयोध्येचा निकाल काहीही लागला तरी सौगंध राम की खाते है पुन्हा म्हणावसं वाटेल असं वाटत नाही. झालं ते पुरे झालं. अर्थात हा विचार दोन्ही बाजूने होणं महत्त्वाचं आहेच. तसा होतही आहे. दोन दशकाच्या अनुभवातून आपण एवढे तरी शिकलो हे समाधानाचं. देश म्हणून उभं राहण्यासाठी सहजीवन, धार्मिक सहनशीलता हेच महत्त्वाचं आहे याची खात्री पटलीय. धर्माचा अभिमान बाळगावा परंतु तो एका विशिष्ट चौकटीत राहून बाळगायला हवा याची समज खूप आधीच आली आहे. तसाच तो इतर धर्मांचा आदर बाळगावा हे मतही पक्कं झालंय. त्यातच आपल्या देशाचं हित सामावलंय...