Skip to main content

चौकट

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 29/09/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
मळलेल्या वाटेवरुन मी जातो बागेतल्या त्या कोपर्‍याकडे गुलमोहोराखाली असलेल्या लाकडी बाकाकडे तिथे असतो गुलमोहोराच्या फुलांचा पखरण ल्यायलेला जमीनतुकडा. मला हे चित्र सुखदायी वाटतं वाटतं करावंसं चौकटबध्द मी चौकट टाकतो त्या चित्राभोवती. आता लाकडी बाक, मागे बहरलेला गुलमोहोर अन् त्याखालची लालरेशमी जमीन ... तरीही आजूबाजूस राहतेच उरलेली अनाच्छादीत जमीन अन् लांब गेलेली फिकट वाट. मग मी चौकट लहान करतो लाल जमीनीच्या तुकड्यासाठी ओबडधोबड जमीन आणि वाट काढूनच टाकतो चित्रातून. आता राहते फक्त लाल फुलांचीच जमीन लाकडी बाक आणि मागचा गुलमोहोर. मग मी प्रवेश करतो चौकटीत, अन् जाऊन बसतो चित्रातल्या त्या लाकडी बाकावर . . रम्य आठवणी काढायला वाटेवर भेटलेल्या माणसांच्या . . .
लेखनविषय:

वाचने 2506
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मुक्तक आवडले.
मग मी चौकट लहान करतो लाल जमीनीच्या तुकड्यासाठी ओबडधोबड जमीन आणि वाट काढूनच टाकतो चित्रातून.
--- नॉस्टॅल्जिया/स्मृतिरंजनामागचं अचूक रहस्य.

कलानिर्मितीच्या प्रक्रियेचं छोटेखानी पण नेटकं वर्णन आवडलं...