Skip to main content

भारतीय इंजिनिअरिंग क्षेत्र

लेखक नितिन थत्ते यांनी मंगळवार, 28/09/2010 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच विकास यांच्या "गोईंग फॉरवर्ड" या धाग्यावर जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली. त्यानिमित्ताने इंजिनिअरिंगच्या व्यवसायाविषयी आणि शिक्षणा*विषयीचे माझ्या मनात आलेले फुटकळ विचार. इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अ‍ॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ही संस्था आहे पण ती इंजिनिअरांचे नियंत्रण करीत नाही. डॉक्टर, सीए, सीडब्लूए यांची व्यावसायिक नीतिमत्तेची नियमावली असते. तशी इंजिनिअरांची नसते. इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांतल्या शिक्षणातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्या कोर्सेस मध्ये फील्डवर्क चे प्रमाण खूप जास्त असते. डॉक्टरांना दुसर्‍या वर्षापासून प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये रुग्ण तपासणी वगैरे करावी लागते. सीएंना ३ वर्षे आर्टिकलशिप करावी लागते. शिवाय डॉक्टरांना एक वर्षाची इंटर्नशिप केल्यावरच प्रॅक्टिस करता येते. सीएंना पास झाल्यावर ३-४ वर्षे दुसर्‍या सीएच्या हाताखाली काम केल्यावरच सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळते. वकीलालाही असेच काहीसे असते. इंजिनिअरिंगच्या शिक्षणात हे फिल्डवर्क फार फार कमी असते. कॉलेजमधील लॅबमधील आणि वर्कशॉपमधील काम हे काही फील्डवर्क म्हणता येणार नाही. अगदी शेवटच्या वर्षीचे प्रॉजेक्ट हे सुद्धा फील्दवर्क म्हणायला मी धजावणार नाही. येऊनजाऊन तिसर्‍या वर्षाच्या उन्हाळी सुट्टीत महिनाभर एखाद्या कंपनीत काम केले तर तेवढेच. पण ते सुद्धा कंपल्सरी नसते. त्यामुळे इतर व्यवसायाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो 'मार्केट रेडी' असतो. इंजिनिअर तसा नसतो. त्याला बहुधा वर्षभराचे कंपनी ट्रेनिंग करायला लागते. ते तो पहिला जॉब ज्या कंपनीत करतो तिथेच मिळते. म्हणजे त्याचे फील्डवर्कचे क्षेत्र एकदम लिमिटेड होते. शिक्षणातला दुसरा मोठा फरक म्हणजे शिकवणारे शिक्षक. डॉक्टरांना शिकवणारे शिक्षक प्रॅक्टिसिंग डॉक्टर असतात. ते दररोज रुग्णोपचार आणि शस्त्रक्रिया करीत असतात. सीएंना शिकवणारे प्रॅक्टिसिंग अकाउंटंट असतात. वकीलांना शिकवणारे प्रॅक्टिसिंग वकील असतात (चूभूदेघे). पण इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवणारे शिक्षक मात्र प्रॅक्टिसिंग इंजिनिअर नसतात. ते केवळ प्राध्यापक असतात. क्वचित प्रसंगी काही व्हिजिटिंग प्राध्यापक इंडस्ट्रीमधून येतात. मी सीओईपीला होतो तेव्हा अनेक प्राध्यापक तिथूनच इंजिनिअरिंग शिकलेले आणि इंजिनिअर होताच एकीकडे एम् ई करीत प्राध्यापक म्हणून लागलेले होते. म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीचे तोंडही कधी पाहिले नव्हते. :( [काही हुन्नरी प्राध्यापक बाहेर इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन करीत असत आणि इंडस्ट्रीचा अनुभव मिळवीत + स्वतःचा काही फायदा करून घेत असावेत :) . कारण इतर प्राध्यापकांमध्ये ते 'वरकमाई' करीत असल्याची चर्चा असे ;) ]. दुसर्‍या शब्दात इंजिनिअरिंग कॉलेजेस ही व्यावसायिकांची कॉलेज असल्यासारखी न चालवली जाता ती आर्टस किंवा कॉमर्स कॉलेजासारखीच चालवली जातात. अशा वातावरणामुळे परीक्षार्थीपणा वाढीस लागून क्रिएटिव्हिटी आणि व्यावसायिकता कमी होत असावी का? *टीप : बरीचशी माहिती मी २६ वर्षांपूर्वी अनुभवलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षणावर आधारली आहे. सीओईपीच नव्हे तर व्हीजेटीआय आणि सरदार पटेल कॉलेजात सुद्धा अशीच परिस्थिती होती. पण यात आजही फार फरक झाला असेल असे वाटत नाही. तसेच आय आय टी मधल्या शिक्षणप्रणालीविषयी माहिती नाही. कदाचित परकीय देशांच्या सहकार्याने उभारलेल्या असल्यामुळे सिस्टिम वेगळीही असू शकेल. इथे सदस्य असलेल्या आणि हल्ली किंवा पूर्वी इंजिनिअर झालेल्यांकडून भर घातली जावी अशी अपेक्षा.

वाचने 35212
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

नितीन थत्ते. सर्व प्रथम अभिनंदन. खुप छान चर्चा विषय सूरू केल्या बद्दल. बहूतेक वेळा विद्द्यार्थी आपली आवड न लक्षात घेता मिळणारी नोकरी, मिळणारे गुण , पालकांचे प्रेशर, पीअर प्रेशर इत्यादी कारणांनी कोर्स निवडतात. आवडी प्रमाणे कोर्स निवडण्याची मूभा असल्यास बर्याच समस्या सुटू शकतील. इंजीनियरींग कॉलेजेस मधे ईंडस्ट्रीशी ईंटीग्रेट करून प्रोजेक्टस आणायची जबाबदारी फॅकल्टी वर असते. बहूतेक कॉलेजेस मधे या बद्दल आनंदच असतो. समर ट्रेनींग कोणीच सिरिअसली घेत नाही. विद्द्यार्थ्यांनाच ते अरेंज करायला सांगितले जाते. कॉलेजमधे खूप पैसे खर्च करून इक्विपमेंटस् / फॅसिलीटीज आणल्या जातात. त्याचा प्रॉडक्टीव्ह किंवा ट्रेनिंग करता उपयोग शून्य असतो. असे आणि वरच्या चर्चेत आलेले अनेक मुद्दे विचारात घेतले तर सध्याच्या टेक्नीकल एज्युकेशनमधे अमूलाग्र बदल हवा हीच गोष्ट प्रर्कषाने जाणवते.

कळकळ दाखवणारे कितीजण कॉलेजमधे शिकवायला जायला तयार आहेत? .. मिळेल त्या पगारात.. शेवटी हे सगळं मिळणार्‍या मोबदल्याशी रिलेटेड आहे असं वाटतं. कॉलेज चालवणार्‍यांना ईंडस्ट्री ट्रेन्ड, अनुभवी लोकं ठेवणं परवडणारं नसेल तर असेच अनुभव न॑सलेले, नुकतेच डिग्री मिळवलेले लोक प्राध्यापक म्हणून ठेवले जाणार. बाहेरच्या इंडस्ट्री मधे कामाला भरपूर वाव आणि भरपूर मोबदला मिळणार असेल तर लोकं तोच पर्याय प्रथम निवडणार. व्यावसायिक जीवनात भरपूर पैसा कमवून झाला, सगळ्या गरजा भागल्या आता मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कॉलेज मधे शिकवायला जाऊ (गिव्हींग बॅक टू कम्युनिटी!!) असा विचार करणारे फार थोडे असतात. हे जर आपण करू शकत नसू तर वर वर्णन केलेली परिस्थीती कितीही खरी असली तरी नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार आपल्याकडे रहात नाही. असं वाटतं.

In reply to by एक

साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले. कामाची वेळ सकाळी ११ ते ३. त्यात दोन तासाची लेक्चर्स. आठवड्याला दहा तासाचे काम. महिन्याला ४० तास. म्हणजे इतरांच्या कामाच्या तुलनेत, महिन्याला २.८ लाख रुपये पगार. कुठल्या आयटी वाल्याला मिळतो हो ? उरलेल्या वेळात इतर जोडधंदे. ट्यूशन्स संध्याकाळी. कॉलेज मध्ये शिकवणे म्हणजे "गिव्हिंग बॅक" वगैरे काही नाही.

In reply to by मिसळभोक्ता

साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले. कोणते कॉलेज आहे? रेज्युमे पाठवावा की काय म्हणतो ;) (संधीसाधू)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सहावा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतरचे सर्वांचे पगार आहेत हे. बाय द वे, आमच्या कॉलेजात, नवीन प्राध्यापक नियुक्ती करण्यासाठी २५ लाख "डोनेशन" घेतले जाते उमेदवाराकडून. आणि बरेच लोक देतात. ७० हजाराचा महिन्याला पगार, म्हणजे ३ वर्षांचा पगार हा डोनेशन म्हणून देतात. यावरून लक्षात यावे. गणिताच्या बारावीच्या ट्यूशनचा रेट सध्या वर्षाला ३० हजार रुपये आहे, लहान गावांत. पि-सी-एम पॅकेजला ७५००० रुपये. २५ लाख डोनेशन देणारा प्राध्यापक, वर्गात काहीच शिकवत नाही. त्यामुळे १०० विद्यार्थ्यांना त्याची ट्यूशन लावावी लागते. म्हणजे, वर्षाचे ३० लाख रुपये मिळतात. करा गणित. इकडे नुसती आय टी वाल्यांच्या पगारांच्या नावाने खडे फोडणारी मंडळी, ह्या द्रोणाचार्यांबद्दल "पवित्र शिक्षकी पेशा" म्हणून मूग गिळून बसतात की नाही, ते बघा.

In reply to by मिसळभोक्ता

>>साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले ही पक्की माहिती आहे कि शुद्ध लोणकढी ?? (एरवी शंका नसती घेतली, पण आजच दुसऱ्या एका धाग्यावर अशीच एक थाप वाचली आहे) थांबा १-२ दिवस, थेट अश्वमुखातून माहिती काढतो (straight from the horse's mouth)

In reply to by मिसळभोक्ता

सरकारी कॉलेज, पूर्ण अनुदानीत किंवा महागड्या उच्चभ्रु शिक्षणसंस्थेत कायमस्वरुपी तसेच विद्यापीठातील शिक्षकांना असे दांडगे पगार आहेत. सर्वच कॉलजमधील शिक्षकांना नाही असे वाटते. बरेचसे शिक्षणमहर्षी आपापल्या अभियांत्रीकी शिक्षणसंस्थेत मुद्दाम नवखे, कमी पैशावर त्या त्या सेमिस्टरचा / वर्षाचा अभ्यासक्रम उरकतील असे लोक नेमतात.

In reply to by सहज

सहावा वेतन आयोग हा केंद्र सरकारने स्थापला असल्याने, सरकारी अनुदाने असलेल्या महाविद्यालयातच सदर आयोगाने निर्दिष्टकेलेली वेतने दिली जात असावीत हे स्वाभाविक आहे. परंतु मूळ मुद्दा हा "पवित्र शिक्ष्हकी पेशा" स्वीकारायला किती लोक तयार आहेत, हा श्री. एक ह्यांच्या प्रश्नावर आधारित होता, त्यामुळे शिक्षकी पेशाचे आजचे अनुभव सांगावे हे उद्देष्य. हल्लीच एका शिक्षिकेने एका ब्लॉगवरून एक निबंध मिपावर कॉपी-पेस्ट करून, स्वतःचा म्हणून ठोकून दिल्याचे (आणि त्याचे उदात्तीकरण करण्याचे) उदाहरण समोर आहे. आय टी वाल्यांच्या मेहनतीच्या कमाईवर तुटून पडणारे किती जण ह्या सडलेल्या (आणि पुढच्या पीढीला, आपल्या भविष्याला सडवणार्‍या) धंद्यावर तुटून पडताहेत हे बघायचे. आणखी एक उदाहरण देतो. पुण्याचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय. यंदा अकरावीचे नवीन १२० विद्यार्थी येथे प्रवेश घेते झाले. अकरावीच्या वर्गात बाके आहेत ८०. शिकवणीच्या प्राध्यापकांनी सांगितले: बघा, तुम्ही कॉलेजात जाऊ नये, हीच कॉलेजाची इच्छा आहे. मग उगाच कशाला जाता ?

In reply to by मिसळभोक्ता

गरवारेचे कॉलेजचे उदाहरण तर घरातले आहे. पूर्ण सहमत.

हल्ली ५०-६० च्या वर प्रतिसाद दिसले की मी शक्यतो ते काथ्याकुट/चर्चा वाचायचे टाळतो. आज चुकुनच हा धागा उघडला. आणि कधी कधी चुका ही चांगल्या असतात हे पटल. :) थेत्तेसाहेब एवढा चांगला विषय तेवढयाच चांगल्या रितीने चर्चेस आणल्या बद्दल धन्यवाद. निकोप पणे ही चर्चा तडीस नेतायत म्हणुन समस्त प्रतिसाद कर्त्यांचे ही आभार. खुप दिवसांनी चांगली चर्चा वाचायला मिळाली. (शिक्षण एकात, करियर दुसर्‍यात आणि आवड तिसर्‍यात असलेला) -गणपा

नितिन, लेख छान लिहिला आहेस. मनापासून आवडला. इतरांच्या प्रतिक्रिया न वाचता मी माझी प्रतिक्रिया लिहितो आहे. कदाचित ही प्रतिक्रिया आधीच कुणी लिहिलीही असेल..... ४६ वर्षांपूर्वीच्या स्वतःच्या शिक्षणावर आधारित अशा माझ्या मतानुसार इंजिनियरिंग कॉलेजे इंजिनियर्सना तर्कशुद्धपणे विचार करायलाच शिकवतात, इतर कांहीं फारसे नाहीं. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात त्याचा प्रवेश एकाद्या 'नव्या नवरी'सारखाच होतो! त्यानंतर मुकुंद कंपनीच्यावतीने अनेक वर्षें campus interviewसाठी जाण्याचे भाग्य लाभले त्यात माझ्या कॉलेजमधील अगदीच सुमार वाटत. फक्त I. I. T. Powai मधील विद्यार्थी well-educated & well-trained वाटत. इतर I. I. T मधील विद्यार्थी so-so असत! आपल्या व्यावसायिक अनुभवाचा फायदा आपल्या तरुण मित्रांना द्यावा या विचाराने मी मध्यंतरी मोकळा होतो म्हणून मी माझ्याच कॉलेजमधे 'चकटफू' ferrous metallurgy शिकविण्यासाठी माझी सेवा देऊ केली, head of deptt यांनी त्याचे स्वागत केले व मला ferrous metallurgyच्या प्राध्यापकाकडे पाठविले पण तेथील कुणीच माझ्या विनंतीकडे गांभिर्याने पाहिले नाहीं. त्यावेळी मी सेवानिवृत्तीच्या पलीकडील वयोगटात होतो (म्हणजे कुणाचाही प्रतिस्पर्धी नव्हतो) तरीही दुर्लक्षच करण्यात आले. (कदाचित) त्यांच्या शिकवण्यातील त्रुटी चव्हाट्यावर येतील या भीतीपलीकडे मला इतर कुठलेच कारण दिसले नाहीं. मग मी पुन्हा नोकरीनिमित्त्य परदेशी गेलो व ते स्वप्न तसेच राहिले. व्यावसायिक इंजीनियर्सना कॉलेजांत निमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा फायदा तरुण विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे या तुझ्या मताशी मी १०० टक्के सहमत आहे. आणखी एक गोष्ट अशी कीं इंजिनियरिंगचे शिक्षण तसे १६ वर्षांत संपायचे ते आताअ १७ वर्षांत संपते. त्या मानाने वैद्यकीय व CA यांचे शिक्षण लांबते!

मिभो म्हणताहेत ते फारसे चुक नाहीये. पण एक त्रुटी -जे दर महीना म्हणताहेत ते फक्त सिनियर्स ना ते सुद्धा सहाव्या वेतन आयोगानंतर सुमारे ६०००० रुपये. ज्यानी कॉलेज मधे १५ वर्षे काढली आहेत त्यांना. ट्युशन शिकवणार्‍यांचे(कॉलेज करुन) महीना सरासरी उत्पन्न सुमारे ८०००० ते १५०००० सिनियॉरिटी प्रमाणे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने कारकुनांच्या २७००० जागा भरण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यासाठी ३८ लाख जणांनी ऑनलाईन अर्ज केले आणि २७ लाख जण लेखी परीक्षेला बसले. निवड झालेल्या २७ हजार उमेद्वारांत ३८०० जण इंजिनिआरिंगचे पदवीधर असून २०० जण तर इंजिनिरिंगचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. रिसेशनमुळे सध्या इंडस्ट्रीत जॉब नसल्याने किंवा जॉब कधीही जाण्याच्या भीतीने सुरक्षित पगाराची नोकरी म्हणून हे लोक बँकेत कारकून म्हणून काम करायला तयार झाले आहेत. स्टेट बँकेच्या मनुष्यबळ विभागाला या बदलत्या ट्रेंडचे आश्चर्य वाटत आहे, पण टेक्निकल ज्ञान असलेले कर्मचारी मिळाले म्हणून ते खूशही आहेत. -मेरा भारत महान-

In reply to by योगप्रभू

ह्म्म्म. इंजिनिअर्सनी बँकेत काम करने हे काही नवे नाही. अनेक बँका आणि फायनान्शिअल इन्स्टिट्यूशनना प्रकल्पांना कर्ज वाटप करताना प्रकल्पाची तांत्रिक बाजू तपासण्यासाठी इंजिनिअर लागतातच. अर्थात या इंजिनिअर्सनी कोणत्या पदांशाथी अर्ज केले आहेत हे माहिती नाही.

हा आमच्या कॉलेज मधला किस्सा . आमच्या मास्तरांनी मोटोर चालू करून आवाज होतोय पाणी वर जात नाही म्हणून electrical department च्य नावाने खडे फोडले.म्हणे तुम्ही फेज उलट्या जोडल्या मुळे मोटर उलटी फिरते आहे.तिकडून माणूस आणला तो म्हणला कि “हि तर सिंगल फेझ मोटर आहे”.इथे पहिला पचका आणि नंतर त्याने फक्त मोटोर चे कवर जरा हलवले आणि मोटर सुरु .हा किस्सा अजून कॉलेज मध्ये गाजतोय