मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अप्रतिम चवीचे mediterranean salad - तबूले (tabouleh)

जाई अस्सल कोल्हापुरी · · पाककृती
साहित्य : १ वाटी दलिया (दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.) १ वाटी बारीक चिरलेली पार्स्ली १ वाटी बारीक चिरलेला पुदीना १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर १ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात १ वाटी बारीक चिरलेली काकडी १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो मीठ चवीपुरते ३ चमचे जिरेपूड (जिरे खमंग दरवळेपर्यंत भाजुन घ्यावेत.मग त्याची पुड करावी) २-३ चमचे लिंबाचा रस ऑलिव्ह ऑईल ३-४ चमचे कृती: १) दलिया + पार्स्ली +पुदीना + कोथिंबीर + कांद्याची पात + काकडी + टोमॅटो बाउलमध्ये मस्त एकत्र करावे. २) चवीपुरते मीठ घालुन व्यवस्थित कालवून घ्यावे. ३) लिंबाचा रस घालावा. ४) ऑलिव्ह ऑईल हळु हळु मिक्स करावे. ५) प्लेट मध्ये घेउन serevr करावे किंवा स्वतः खावे. ** खुप छान colourful दिसते. चव वेगळी पण मस्त लागते. पोट्भरीचे आणि fibres , carbs, vitamins,anti-oxidents भरपूर असल्याने अतिशय nutricious salad आहे.

वाचने 5699 वाचनखूण प्रतिक्रिया 30

In reply to by गणपा

काय वाकड आहे देव जाणे माझं आणि त्याचं. पण तरीही.... ingredients : वरून असं visualise करायचं!

In reply to by निवेदिता-ताई

पैसा Wed, 09/29/2010 - 22:49
पार्स्ली म्हणजे कोथिंबिरीसारखी दिसणारी एक वनस्पती. तिची पानं थोडी मोठी अस्तात. parsley ती साधारणपणे मोठ्या शहरांत मिळते. फलटणला मिळणं थोडं कठीण दिसतंय.

कवितानागेश Wed, 09/29/2010 - 23:07
(दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.)>>>> यामुळे शिजल्यासरखा मऊ होईल का? चिकट होणार नाही ना?

In reply to by कवितानागेश

जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 11:59
दलिया २-३ वेळा धुवून घ्यावा. आणि त्यावर उकळते पाणी (साधारण दुप्पट) ओता. आणॉ झाकुन ठेऊन द्या. अगदी मऊ होतो. आणि तो पुर्ण शिजला नसल्याने जास्ती nutricious असतो. अश्या form मध्ये दलिया कधी खाल्ला जात नाही. आणि मस्त तो पिळुन घ्या. नंतर मग लिंबाचा रस ,जिरेपूड सगळे फ्लेवर्स स्पंज सारखे अब्सोर्ब करतो.

In reply to by शिल्पा ब

मितान Wed, 09/29/2010 - 23:38
मी या सॅलडमध्ये कुसकुस वापरते. दलिया खूप वेळ शिजवल्याशिवाय मऊ होत नाही. यात मऊ लागणे अपेक्षित नाही का ?

In reply to by शेखर

कुंदन Wed, 09/29/2010 - 23:47
अरे कुसकुस म्हणजे आपण शिर्‍यासाठी वापरतो त्या प्रकारचा रवा. ट्युणिशिया नामक देशातील एक प्रसिद्ध पा कृ आहे ती. -- ( ट्युणिशिया रिटर्न्ड) कुंदन.

In reply to by जागु

जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 13:13
ऑलिव्ह ऑईल ला एक वेगळा फ्लेवर असतो. त्यात्ल्या त्यात vergin olive oil ला (काहिही केमिकल प्रोसेस न केलेले) तो जास्ती deep असतो. त्यामुळे salad मध्ये कच्चे वापरतात. आणि बर्‍याचदा काही डिशेस मध्ये फक्त पॅन ला स्प्रे करण्यासाठी वापरतात.

जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 13:17
कोणीतरी छापु शकेल का? असेल तर ID द्या. आणि मग चढवा इथे. (तेवढ्यासाठी बाहेर जाणं 'आज' जमेल असं वाटत नाहिये.(permission येन इल्ले)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

स्वछंदी-पाखरु गुरुवार, 09/30/2010 - 17:53
जाई तै... मी तुम्हाला माझा पत्ता दीला तर चालेल का हो????? छायाचित्र देण्यापेक्षा ती पाकृ पार्सल केली तर अति उत्तम...... स्व्.पा. "माझी आई म्हणत्ये... ऊतु नये मातू नये आणि फुकटची पाकृ सोडु नये......." ता.क. : पाकृ खाल्यानंतर (जबरी दुष्परीणाम न झाल्यास ) प्रतिक्रिया देण्यात येईल........

In reply to by स्वछंदी-पाखरु

जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 18:52
कशाला कष्ट घेता? मीच माझा पत्त्या देते.तुम्ही घरीच या ना खायला! सह टुकुंब या. .... इतके घाबरु नका.काही होणार नाही तब्येतीला.! (काय झालंच तर उतारा ही सुचवला जाईल) ;)

पैसा गुरुवार, 09/30/2010 - 22:22
जाईच्या सिस्टीमला कायतरी प्रोब्लेम आहे. तस्मात मी अपलोड करते आहे. photo