Skip to main content

मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा

Published on मंगळवार, 28/09/2010

काल रात्री घासूगुर्जीचा स्वप्नांचा कौल  आणि आमच्या कशे कावळे येती आणिक...या विडंबनाला शुचितैनि दिलेला प्रतिसाद वाचून झोपलो, पण नेहमी सारखी गाढ झोप काही येईना, मध्यरात्री गदिमांचा मोर आमच्या स्वप्नात नाचू लागला आणि आम्ही झोपेतच गाण म्हणायला सुरुवात केली 

मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा
बाई मला प्रतिसाद ठासू हवा

टाकला सैलसर सवाल धाग्यावरी
घावला अतरंगी बकरा ग त्यावरी
मोकळे करा या मनास जालावरी
पितरं आली कितीदा स्वप्नी मोजून हळू टंकवा

त्या विडंबनातील अंजन लई झोंबते
क्युरीऑसीटी कुठे पण माझी थांबते
फिरफिरुनी फुटकळ धागे मी काढते
सार्‍या जाली प्रसिद्ध झाला पितरांचा चांदवा

बघ चीज कराया येतील गुर्जी ते
किती हुषार, त्यांच्या गुणास मी जाणते
पहा कौला त्यांच्या नगरी वाखाणते
अक्कल नाही , तुला जरा ही कळते हे "केशवा"

लेखनविषय:

वाचन संख्या 4058
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

बघ चीज कराया येतील गुर्जी ते किती हुषार, त्यांच्या गुणास मी जाणते पहा कौला त्यांच्या नगरी वाखाणते
धमाल!

धासू विडंबन आहे, अपेक्षेप्रमाणे. अर्थात, ह्या मीटर वर तुमची हुकुमत आहेच म्हणा. (संदर्भः प्रतिसाद विजुभै..) (स्पष्टीकरणः सदर विडंबन "म्यानातुन उसळे..." ह्या मीटर मध्ये म्हणावे. दर शेवटच्या शब्दात एक गुरू जोडावा.)

वा वा टोचा मारुन वातावरण अगदी हलके केलेत हो गुर्जी. गुर्जींवर माझे प्रेम आहे, म्हणजे त्यांच्या लिखाणावर.* *वरील प्रतिसाद हा पुर्णपणे काल्पनीक असुन त्याचे कुठल्याही वा कोणीही कोणालाही उद्देशुन लिहिलेल्या जुन्या प्रतिसादाशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

>>फिरफिरुनी फुटकळ धागे मी काढते सार्‍या जाली प्रसिद्ध झाला पितरांचा चांदवा जय हो!!

हे हे हे टोचे कसे मारावे ते आमच्या केसुकाकंना विचारा ;) * *वरील प्रतिसाद हा पुर्णपणे काल्पनीक असुन त्याचे कुठल्याही वा कोणीही कोणालाही उद्देशुन लिहिलेल्या जुन्या प्रतिसादाशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला!!! अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला!!! * आज सकाळी सकाळी गुर्जींनी हे विडंबन दाखवले आणि दिवस चांगला सुरू झाला. *वरील प्रतिसाद हा पुर्णपणे सत्य असुन त्याचे कुठल्याही वा कोणीही कोणालाही उद्देशुन लिहिलेल्या जुन्या प्रतिसादाशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ हेतूपूर्वक समजावा.

हॅ हॅ हॅ .. लै भारी केसुशेठ.. महान आहात तुम्ही च्यायला, लैच पाणचट चालल होत, काही हि झाल कि काढा धागा --टुकुल

मार डाSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSला !!!!!!!!

खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास खल्लास ;)

काय खरं नाही आज. मरतोय, हसून हसून...

अजुन किती दिवस ही पापी पितर येणार नाना जाणे. अशा फुटकळ धाग्यामुळे चांगले वाचनिय धागे पाठीमागे पडतात. त्यामुळे असल्या धाग्यावर चाप हा हवाच.

खल्लास! फुटकळ धाग्यांवर विडंबन हा रामबाण उपाय आहे हेच खरे. ;)

मिपाच्या या काशीवरि खेळतो "सुमार" ! गहिवरले जीव "वरी" , सुटले पितर ! ;-)

छान भुस्काट पाडलं व तुमी त्या सर्वपित्रीचं! पितृपक्षांत 'सुतरफेणीला' ही पितरफेणी म्हणतात का हो ?

चांगलं विडंबन... मीटरातला घोळा मुक्तसुनीत अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.
अक्कल नाही , तुला जरा ही कळते हे "केशवा"
मधील केशवा हे संबोधन आहे हे चटकन लक्षात येत नाही. :)

काय गुर्जी जोरदार आतषबाजी सुरु आहे! एवढ्यात दिवाळीचे वेध लागले वाट्टं! ;) (नाचरा)मोररंग

In reply to by रामदास

रामदसशेठ, बच्चे की जान लोगे क्या? (बच्चा)केशवसुमार त्या धाग्यांच्या रेट्या पुढे विडंबनाचा रेट खूप कमी पडेल.. (इ स्लो)केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार