मराठा लाईट इनफंट्री - भाग - ७ (अंतीम भाग.)
भाग - ७ अंतीम.
या लढाईत मराठयांचे मजबूत नुकसान झाले. पण त्यांना थांबून चालणार नव्हते. त्यांनी लगेचच उरलेल्या सैनिकांची जमवाजमव केली आणि पुढ्च्या लक्षावर लक्ष केंद्रित केले. ते होते सॅंटेरो नदीच्या आसपासची शत्रूची ठाणी. दुपारपर्यंत हे उद्दिष्ट त्यांनी मोठ्या तडफेने पार पाडले आणि बर्याच जर्मन सैन्याला युध्दकैदी केले. ही मोहीम त्यांनी एवढ्या तडफेने चालवली की असे म्हणतात जर्मन सैन्याला सावरायला वेळच मिळाला नाही. या भयंकर लढाई नंतर मात्र या बटॅलियनला विश्रांती देण्यात आली. या सेनिओ नदीच्या युध्दात मराठा रेजिमेंटचे ४ आधिकारी आणि १०९ सैनिक धारातिर्थी पडले.
या महत्वाच्या युध्दानंतर दोस्तराष्ट्रांच्या सेनेची खचलेलेल्या जर्मन सैन्याची ससेहोलपट करत उत्तरेकडे आगेकूच सुरू झाली. त्यात मराठ्यांच्या तिनीही बटॅलियन्स सामील होत्या. २३ आणि २९ एप्रिल रोजी पो नदीचे विस्तीर्ण पात्र पार करून हे सैन्य पुढे गेले तर आल्प्स पर्वताने त्यांची वाट अडवली. त्या मुळे त्यांना थांबावेच लागले.
पो नदी मराठ्यांनी रणगाड्यावर बसून पार केली. (बहुदा पाणी कमी असावे त्या महिन्यात). अशी -
८ व्या इंडियन डिव्हिजनच्या गुप्तहेर खात्याने त्यांच्या मुख्यालयाला ३० एप्रिल रोजी जो अहवाल पाठवला त्यात त्यांनी स्पष्ट्पणे म्हटले होते
“शत्रूच्या सैन्याची अवस्था अत्यंत शोचनीय झाली आहे”
“थोड्याच दिवसात जर्मन सैन्याने बिनशर्त शरणागती पत्करली आणि चार वर्षे चाललेले हे युध्द संपूष्टात आले.
मराठे या लढाईत शौर्य गाजवून, भारतात यायला तारांटो बंदरात जहाजात चढले.
त्याचे नाव होते – “ अर्व्हेडिस इटालिया”.
वाचक मित्रहो ही लेखमाला इथेच समाप्त करतो.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या बर्मामधल्या जपानी सैनिकांच्या विरुध्दची कामगिरी,
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील कामगिरी, या बद्दल परत केव्हातरी.
तो पर्यंत या विषयावर आपली रजा घेतो.
लेखमाला समाप्त.
जयंत कुलकर्णी.
ता.क. आपण जर ही लेखमाला वाचली असेल तर परत एकदा एकच मागणे मागतो - सैनिकांना आदराने वागवा. लक्षात ठेवा त्यांना या पेक्षा जास्त अपेक्षा आपल्या कडून नाही. आणि माझ्यासाठी, - ही लेखमाला आवडल्यास जरूर कळवा.

प्रतिक्रिया
लेखमाला आवडली.
असेच म्हणतो. धन्यवाद.
+१
+२
लेखमाला आवडली. धन्यवाद
असेच म्हणतो. आणखी लिहा.
तुमचे मागणे
आदराने वागवा...!!!
"याद रखो वो कुर्बानी..."
लेखमाला खुप आवडली
मालिका अतिशय आवडली. कृपया
नमस्कार ! ज्यांनी ही
कुलकर्णी साहेब, उत्तम व अभ्यासपूर्ण लेखमाला!
चांगली लेखमाला
अतिशय माहितीपूर्ण मालिका!
अहो मालक लिन्क द्या ना
अहो मालक लिन्क द्या ना
लेखमाला आवडली
लिन्क द्या ना आधीच्या भागाचि
सगळे भाग
लिन्क द्या ना आधीच्या भागाचि
क्या बात!
सुंदर लेखमाला.
अतिशय माहितीपूर्ण मालिका!