मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोप्पे अप्पे -फोटोंसहित अद्ययावत.

दिपाली पाटिल · · पाककृती
हे अप्पे करायला अगदी सोप्पे नी मस्त आहेत... साहीत्य: २ वाट्या जाड रवा आल - मिरची पेस्ट चवीनुसार मीठ १ बारिक चिरलेला कांदा १ बारिक चिरलेली हीरवी मिरची पाणी चटणीसाठी: ओलं खोबरं २ हीरवी मिरच्या भाजून मीठ मुठभर कोथंबीर दही फोडणीचे साहीत्य : मोहरी, कढीपत्ता, हींग कृती: १) आधी चटणीचे सगळे साहीत्य थोड्या पाण्यात बारिक करून घेणे आणि त्यावर कढीपत्त, मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या. २) एका पातेल्यात रवा, पाणी, मिरची, आलं-मिरची, मीठ एकत्र करून घ्यावे नी ५-१० मिनीटे बाजूला ठेवा. ३) तोपर्यंत अप्पे पात्र तापत ठेवा. ४) आता एक छोटा वाडगा घेऊन त्यात ३ पळ्या रव्याचे मिश्रण, थोडा कांदा आणि इनो घाला. आणि तापलेल्या अप्पे पात्रात टाका. ५) ५-७ मिनीटे एकेका बाजूने खरपूस करावे नी लग्गेच खाय्ला घ्यावे. टीपः इनो टाकल्यावर टाइमपास करू नये नाहीतर ते अप्पे न होता दगडं होऊ शकतात.

वाचने 12927 वाचनखूण प्रतिक्रिया 40

रेवती Wed, 09/22/2010 - 04:02
वाह! फोटू पाकृ दोन्ही मस्त! मलाच इनो घ्यावासा वाट्टोय!;) चटण्यांचा फोटू तर झकास आलाय. माझी मावशी असेच आप्पे करते. फरक एवढाच कि पाण्याऐवजी आंबट ताकात रवा भिजवून ठेवायचा. मग इनोची गरज पडत नाही. आता मावशीचं वय झालं म्हणून 'नो स्वयंपाक' पण तिच्या हातचे रव्याचे आप्पे आणि फोडणीचा ब्रेड विसरणे अशक्य!

In reply to by दिपाली पाटिल

रेवती गुरुवार, 09/23/2010 - 07:20
साधारण चार तास भिजवायचा रवा! मी कालच ताकातले आप्पे केले होते जरा जास्त वेळ सात तास भिजले तर तितकेसे चांगले झाले नाहीत. आता नीट जमेपर्यंत प्रयोग सुरु !:)

शिल्पा ब Wed, 09/22/2010 - 06:37
फोटोत तर छान दिसताहेत...चटण्या पण भारीच...तोंडाला पाणी सुटले.. पण हे आप्पे करायला काही वेगळी भांडे लागते का? कुठे शोधायचे?

In reply to by शिल्पा ब

दिपाली पाटिल गुरुवार, 09/23/2010 - 23:37
कै च्या कै...एकतर मी म्हणतेय की आणेन अन तू म्हणतेयस की पुणेरी आमंत्रण... आता मी नाही आणणार ज्जा... :D

In reply to by दिपाली पाटिल

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/23/2010 - 18:31
नाहीतर पुढच्या कट्ट्याला हेच घेऊन येइन...
दिपालीतै, तु आणी मी पुढचा कट्टा माझ्या कॅफेत करुयात का ? ;)

In reply to by पर्नल नेने मराठे

मदनबाण Wed, 09/22/2010 - 10:20
+२ ए दिप्स ताय...फोटोचा काय झोल झाला हयं ?

दिपाली पाटिल Wed, 09/22/2010 - 22:16
आता पहा फोटो, संपादकलोकहो , जरा माझ्या पाकृ च्या हेडलाइन मध्येही टाका नं "आता फोटोसहीत" नाहीतर बिचार्‍या लोकांना ते उगाचच पापी असल्याचं दु:ख होत रहील ...

पैसा Wed, 09/22/2010 - 22:25
एकदम सोप्पे! पण त्या फोटोने तुमचं काम कठीण झालं म्हणा! :P बाकी इनोचं लक्षात ठेवायला हवं. खायचा सोडा चालेल का?

नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 22:28
मस्त. अगदी लास्ट मोमेंटला एनो टाकण्याची आय्ड्या आवडली. ते (लाळ पुसायचं) फडकं कुठे गेलं बरं?

काजुकतली Fri, 09/24/2010 - 11:48
चटणी आणि चटणी पात्र दोन्ही बेस्ट.... इनो किती घालायचा ते लिहिले नाही. मी एका-एका घाण्यासाठी एक एक चमचा असे गृहीत धरु का???? गेल्याच आठवड्यात मी आप्पे पात्र घेतले विकत (इथलीच एक रेसिपी पाहुन धाडस केले शेवटी :) ) आता त्याचा सदुपयोग करायची वेळ जवळ आलीय बहुतेक.....

In reply to by काजुकतली

दिपाली पाटिल Sun, 09/26/2010 - 06:18
काजूकतली, ३ पळ्यांसाठी (अंदाजे १ १/२ कप) अर्धा - पाउण चमचा (टेबल्स्पून) इनो पुरेसे होइल..इनो घातलेले मिश्रण अगदी एकदा वापरता येइल असे वेगळे आणि थोडे-थोडे बनवावे.

In reply to by दिपाली पाटिल

चिंतामणी Sun, 09/26/2010 - 09:28
३ पळ्यांसाठी (अंदाजे १ १/२ कप) अर्धा - पाउण चमचा (टेबल्स्पून) इनो दिपाली, तुला "टी" स्पुन म्हणायचे आहे ना.

In reply to by दिपाली पाटिल

चिंतामणी Mon, 09/27/2010 - 13:52
माझ्या माहिती प्रमाणे टेबल स्पुन म्हणजे मोठा चमचा अथवा डाव. १ ते दिड कपाला अर्धा - पाउण टेबलसुन नाही लागणार. अर्धा - पाउण चमचा (म्हणजे टी स्पुन) लागेल.

In reply to by चिंतामणी

दिपाली पाटिल Mon, 09/27/2010 - 22:10
अहो चिंतामणी टेबलस्पून म्हणजे डाव नव्हे. फूड मेजरिंग स्पून्स येतात त्यातला टेबलस्पून. अगदी टेबलावर वापराय्चा चमचा अर्थात डाव म्हणाजे टेबलस्पून नव्हे हो. तरीच म्हटलं १/२ - ३/४ टेस्पून इनो कही फार नहीये तरी तुम्ही असं कां म्हणताय... जनरली चहाचा चम्चा टी-स्पून अस्तो आणि पोहे खाय्चा टेबल स्पून असतो... :D :D :D

In reply to by प्राजु

दिपाली पाटिल Sun, 09/26/2010 - 09:11
ती वाटीच तशी आहे...इकडे सॅन फ्रान्सिस्कोच्या चायना टाऊन मध्ये खुप मस्त आणि स्वस्त मिळतात अश्या प्लेट्स, वाट्या...

विलासराव Tue, 09/28/2010 - 09:43
पण मला नाही आवडले. अवांतरः जे खायला मिळणार नाही ते सगळ मला आवडत नाही मिळेपर्यंत तरी.