| From मटार चाट :------
साहित्य:-
कोवळे मटार दाणे दोन वाट्या, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा ताजी मिरपूड, एक चमचे चाट मसाला, अर्धा चमचा वाळलेल्या पुदिन्याची पूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, दहा-बारा भेळेच्या किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या, एक वाटी दही ( जास्त चालेल), दोन चमचे तेल.
कृती :
मिरच्या उभ्या चिराव्या. पातेल्यात तेल तापवावे. त्यावर जिरे व मिरच्या घालून धुतलेले मटारदाणे फोडणीस टाकावेत. अर्धी वाटी गरम पाणी घालून वर पाण्याचे झाकण ठेवावे. उकळी आल्यावर आंच मंद ठेवावी. सुमारे दहा मिनिटांनंतर मटार शिजतील त्यात मीठ व जरून वाटल्यास झाकणीवरचे गरम पाणी घालावे. खाली उतरवुन मिरपूड, पुदिनापूड व चाट मसाला घालून ढवळावे. गार झाल्यानंतर वाढावच्या भांड्यात काढून ठेवावे. दह्यात पाणी व घालता नुसतेच घुसळावे किंवा चमच्याने फेसावे. हे दही भाजीवर घालावे. कोथिंबीर वरून शिवरावी. खायला देताना पुऱ्या कुस्करून वरून घालाव्या व द्यावे. |
प्रतिक्रिया
आहा!
मस्त दिसतेय चाट!!! फोटो जरा
मस्त
छान, सोपा प्रकार.
लालच आह लपलप....तोन्डाला पाणी
वा वा!! छान पाकृ पण फोटू
+१
In reply to वा वा!! छान पाकृ पण फोटू by रेवती
छान पाकृ
वाह ! सकाळी सकाळी साला मजा
थंडी झाली रे फोटुला! पाकृ
In reply to वाह ! सकाळी सकाळी साला मजा by परिकथेतील राजकुमार
थंडी झाली रे
मस्त
साध्या सोप्या तरीहि चटकदार पा़कक्रिया