कोलंबस-२
ह्या पाक कृतीचा आस्वाद अगदी निवांत दिवशी च घ्यावा.
अर्थात ह्या दिवशी कुठल्याही अदर अॅक्टीविटीज ना थारा नसावा.
कुठल्याही नाही.
गरमागरम भात आणि आमटी बाबत मॅनियॅक असलेल्यांसाठीच ही पाकृ आहे.
दोन पेग घेतल्यावर जी नशा चढते त्याचा अनुभव येतो.
उगाच दोन मुद भात एक डाव आमटी वाल्यांनी वाटेस जाउ नये.
-----------------------------------------------------------------------------------------
"सिक्रेट काय"?
त्यात कसले आहे सिक्रेट?
" त्याशिवाय का १०००० लोकांसाठी वडाळ्याच्या गणपतीत बनणार्या कोलंबस ची चव फक्त १० लोकांसाठी बनवलेल्या पाकृ ला येते?"
१० नाही २०. तुम्ही दोघे ते दोन दिवसात संपवता.
"विषयांतर नको"
काहीही नाही हो तसे. फोडी शिजवायचे पाणी आणि तुरडाळ शिजवायचे पाणी वापरायचे. तुमच्या भाषेत पाकृ ला चव यायची असेल तर ..........
"च्यामारी एवढे सोप्पे"
-----------------------------------------------------------------------------------------साहित्यः तुम्हाला आवडते ती भाजी
१. बटाटा २. फरसबी ३.टॉमेटो ४.वांगे. ५. शेवग्याच्या शेंगा ६. कोहळा
२. तुरडाळ
भाजी चे आवडी प्रमाणे फोड्या (तुकडे) करावे. भाजी स्वच्छ धुवावी.
भांड्यात शिजवुन घ्यावी. शिजवलेले पाणी अजिबात टाकु नये.
साधारण ३ लिटर आमटी करता १ छोटा पेला तुऱडाळ कुकर मधे शिजवावी.
तुरडाळ शिजवताना त्याची एकदम पेस्ट होणार नाही आणि ती कोलंबस मधे तोंडाला लागणार नाही ह्या बेताने शिजवावी.
मोठ्या भांड्यात फोड्याच्या पाण्यात ही शिजवलेली डाळ त्यातील थोड्या पाण्यासकट टाकावी.
त्यात आपल्याला जी आमटीची क्वांटीटी हवी आहे त्या प्रमाणे पाणी टाकावे.
सांबार पावडर टाकावी. एक चमचा १ लिटरला ह्या मापाप्रमाणे. अर्थात ह्यात आपल्या आवडी नुसार फरक होउ शकतो.
चांगली उकळी आल्यावर घरच्या तुपात फोडणी द्यावी. राई, हींग, कडीपत्ता वाली. चांगला कडीपत्ता मिळाला तर भारी मौज.
___________________________________________________
गरमा गरम भाताबरोबर ओरपावी.
ही पाकृ चमच्यानी जेउ नये.
जेवता जेवता घाम आला की ओळखावे कोलंबसला भारत देश मिळाला.
----------------------------------------------------------------------------------------
जाता जाता: जवळ पास असलेल्या लोकांना एकदा घरी बोलावुन प्रॅक्टीकल दाखवावे काय?
म्हणजे ते ज्योत से ज्योत काहीसे म्हणतात ना ते होइल.
वाचने
5461
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
बर.. येतो पहायला आणि खायला.
सांबार मसाला पाठवुन द्या...
:)
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
अश्लील अश्लील.......
मास्तर खाणावळ चालु केली कि काय तुम्ही?
फटु नसलेल्या पाकृ
सही..
In reply to सही.. by मस्त कलंदर
चालले सगळे लगेच उठुन पाहुणाचाराला.
ती सांबार पावडरची रेसिपी द्या
In reply to ती सांबार पावडरची रेसिपी द्या by स्वाती२
ते परभु मास्तरला काय इचारते
In reply to ते परभु मास्तरला काय इचारते by गणपा
उडपीच्या सांबाराबद्दल मास्तर
In reply to ते परभु मास्तरला काय इचारते by गणपा
प्रभु सर,
In reply to प्रभु सर, by पैसा
दी गो तु...तुवें दिली किदे
ह्या ला आमच्या ईथे ढकु
In reply to ह्या ला आमच्या ईथे ढकु by कुक
>>>ह्या ला आमच्या ईथे ढकु
@ जयपाल ढकु या रेसिपिला
जबराच...आता ठाण्यात असायला
हम्म! पाकृचा फोटू नाही तो
प्रभो