आपल्या नेहमीच्या बोलण्यात बरेच वेळा आपण म्हणी, वाकप्रचार याचां उपयोग करतो. बर्याच वेळा आश्या म्हणी व वाकप्रचार यांच्या मागे काही धटना, गोष्टी धडलेल्या असतात. आपल्या पैकी कुणाला जर आश्या गोष्टी आठवत असतील तर त्याची इथे देवाण-घेवाण करु.
(जर असा घागा आधीच कुणी चालू केला असेल तर सरपंचाना हा धागा उडवण्याची नम्र विनंती. )
सुरुवात मीच करतो.
ऊंटावरचा शहाणा.
एका खेड्यात एक शेतकरी राहात होता. त्याच्या जवळ म्हैस होती. ही भली मोठ्ठी शिंग होती तिला . ती शेतकर्याची एकदम लाडकी होती. उकाड्याचे दिवस होते आणि म्हैस भलतीच तहानलेली होती. अंगणात एक भला मोठ्ठा रांजण होता जो त्या शेतकर्याच्या घरात पिढ्यांन पिढ्यां पासून होता. म्हैशीनं रांजणात डोकावून पाहील. तिला तळाशी पाणी दिसलं आणि कसबस तिने घातल डोक आतं. पाणी पिउन झाल्यावर डोक काही बाहेर येइना. बिचारी जोर जोरात हंबरायला लागली, शेतकरी धावत बाहेर आला. त्याने पण म्हैशीच अडकलेल डोक बाहेर काढायचा बराच प्रयत्न केला पण काही जमेना. रांजण फोडून म्हैशीला सोडवाव तर तो रांजण पिढ्यांन पिढ्यां चालत आलेला. शेतकर्याच मन धजेना.
शेतकर्याची ही धडपड तिथून ऊंटावरून जाणार्या एका वाटसरूनं पाहिली. तो शेतकर्याला म्हणालाकी तो त्याला म्हैशीच डोक बाहेर काढायला मदत करेल. पण तो त्याच्या ऊंटावरून खाली येणार नाही. आणि अंगणातल दार छोट असल्याने ऊंट काही आत येइना. शेवटी शेतकर्यानं कुदळ फावडं घेउन भींत फोडली नि त्या शहाण्याला वाट करून दिली. वाटसरूनही वरून पाहिल म्हैशीच डोक बऱ्यापैकी अडकल होत. त्याने शेतकऱ्याला विचारल कि रांजण आणि म्हैस यात त्याला काय जास्त प्रिय आहे. शेतकर्याला बिचार्याला दोन्हीच प्रिय, पण त्यतल्या त्यात रांजण पिढ्यांन पिढ्यां चालत आलेला त्यामुळे त्याने रांजण सांगितल.
झालं, या शहाण्याने शेतकर्याला म्हैशीची मान कापायला सांगितली. रांजण वाचावायचा म्हणून शेतकर्यानं जड मनाने म्हैशीला मारल. पण तिच डोक आतच राहील. शेवटी म्हैशीच डोक बाहेर काढण्यासाठी शहाण्याने तो रांजणही फोडायला लावला.
जर शेतकर्याने ऊंटावरच्या शहाण्याचा सल्ला न ऐकता आधिच तो रांजण फोडला असता तर, त्याला अंगणाची भींतही फोडावी लागली नसती आणि त्याची लाडकी म्हैस पण वाचली असती.
तेव्हा पासून जो कुणी असा सल्ला देउ लागला की ज्यात ऐकणार्याच फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आसेल तर तो सल्ला देणार्याला ऊंटावरचा शहाणा ही उपाधी मिळु लागली.
अजुन एक गोष्ट.
गाढव मेलं ओझ्यानं अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं
एका गावात एक कुंभार होता. त्याच्याकडे एक गाढव आणि एक शिंगरू होतं. उकाड्याचे दिवस होते, माठांना चांगलीच मागणी होती. त्यामुळे कुंभाराने गाढवाला जरा जास्तच कामाला जुंपल होतं. बिचार गाढव मातीसाठी सकाळ पासून खेट्या मारित होतं, त्या शिंगराला काही काम न धंदा, ते आपलं नुसतच गाढवासंगे फेर्या मारित होतं. (कुंभाराने काही त्याला कामाला जुंपलं न्हवत.) शेवटी अतिश्रमाने नि उकाड्याने गाढव नि शिंगरू दोन्ही मरतात. त्यातल्या त्यात गाढव निदान ओज्याने नि श्रमाने तरी मरतं पण शिंगरू मात्र नुसतच हेलपाट्यान मरतं.
तेव्हा पासून गाढव मेलं ओझ्यानं अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं ही म्हण रुजू जाली.
कुणाला हातावर तुरी देणे का वाक्प्रचार कसा रुढ झाला याची माहीती आहे का?
वाचने
49248
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय सा॑गु
आता
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी"
त्याचप्रमाणे
In reply to भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी" by विजुभाऊ
भैय्या
In reply to भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी" by विजुभाऊ
मस्त ष्टोरी! :)
तेल गेलं तुप गेलं हाती आलं धुपाटणं.
छान धागा
खालमुंडी पाताळ धुंडी
मस्त आहे - चला मी ही प्रयत्न करुन बघतो.
नष्टाश्वदग्धरथन्यास- आवडल्या
In reply to मस्त आहे - चला मी ही प्रयत्न करुन बघतो. by आर्य
मस्त धागा !!!
मला नं तुला, घाल कुत्र्याला
मस्त रे गणपा !!!
In reply to मला नं तुला, घाल कुत्र्याला by गणपा
काही फक्कड मराठमोळ्या म्हणी
तरण्या
In reply to काही फक्कड मराठमोळ्या म्हणी by आर्य
पुराला
सोप्पय
In reply to पुराला by ऋचा
पुरला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा
In reply to पुराला by ऋचा
अजुन कही म्हणी.
कथा
म्हणी
:))
In reply to म्हणी by प्रकाश घाटपांडे
काही नेहेमीच्या आणि काही नविन...
अशीच १ फार
म्हणी..
बैल गेला नि झोपा (झापा) केला .....
लॉजिकल आहे एकदम मस्त माहिती.
In reply to बैल गेला नि झोपा (झापा) केला ..... by गणपा
"म्हणीच्या
गाड्या बरोबर नळ्याची यात्रा.
पण मी जे ऐकलंय ते काही वेगळं
In reply to गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. by प्रा सुरेश खेडकर
'नाळ' नव्हे
In reply to पण मी जे ऐकलंय ते काही वेगळं by वपाडाव
छान धागा..
रिकामा न्हावी.
In reply to छान धागा.. by मस्त कलंदर
रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी
In reply to छान धागा.. by मस्त कलंदर
आणखी काही म्हणी.
मस्त धागा
मराठी म्हणींचे एक अगदी
'गावंढ्या गावात गाढवी सवाशीण'
वासरात लंगडी गाय शहाणी.
कानामागून आली अन् तिखट झाली-