(कायमचा) राजकीय बळी कुणाचाच जाणार नाही.
गिल यांच्याबद्द्ल ठाऊक नाही. पण काँग्रेसला दिल्लीत शीला दीक्षित आणि पुण्यात कलमाडी यांना जोवर समर्थ पर्याय उपलब्ध होत नाहीत, तोवर दोघांनाही (कायमचे) मरण नाही!
विकास यांच्या कडून झालेल्या परिस्थितीचा लेखाजोखा घेणारा एक विस्तृत लेख अपेक्षित होता.
पण ते एका कौलारु मित्राच्या नावाला (पक्षी : || विकास ||) जागले आणि कौल घेऊन मोकळे झाले
असो.
कौल घेताना अधिक लिहीता येत नसल्याने थोडे स्पष्टीकरणः
राष्ट्रकूल स्पर्धेच्या संदर्भात जो गोंधळ झाला आहे. त्याला माझ्या लेखी केवळ राजकारणीच जबाबदार नसून बाबू, डीपिडब्ल्यूचे इंजिनियर्स, कंत्राटदार पण जबाबदार आहेत. पैसे खाल्ले यात नवल नाही, पण इतके गचाळ काम करून विधीनिषेधशून्य कसले विधीनिषेध-मायनस-शंभर वृत्ती दाखवली आहे...
तरी देखील शेवटी जबाबदार हे भ्रष्टराज्यकर्तेच ठरतात कारण अर्थातच राजा कालस्य कारणम (आणि त्या अर्थाने जनता देखील कारण ही लोकशाही आहे). तर अशा या जनतेच्या प्रतिनिधींपैकी, आपल्या सगळ्यांचे नावडते मा. सुरेश कलमाडी यांचे नाव सतत येत असले तरी तटस्थपणे विचार करता, केवळ तेच जबाबदार वाटत नाहीत, तर ज्यांच्या हातात प्रत्यक्ष सत्ता आहे ज्यातून कंत्राटे देणे, लक्ष घालणे, बजेटींग वगैरे झाले ते देखील आहेत... यात अर्थातच शीला दिक्षित, जयपाल रेड्डी आणि मागे राहून किडा (क्रिडा नाही) करणारे दुसरे नावडते मणीशंकर अय्यर देखील आहेत....
पण अर्थात हे राजकारण आहे. त्यामुळे कोणी तरी ते खेळण्यात यशस्वी होणार आणि कोणीतरी बळीचा बकरा... म्हणून हा कौल.
शेवटचा पर्याय निवडला आहे
>> पण अर्थात हे राजकारण आहे. त्यामुळे कोणी तरी ते खेळण्यात यशस्वी होणार आणि कोणीतरी बळीचा बकरा.
राजकारण कीतीही असले .. तरी सगळे राजकारणी ह्यात मातब्बर आहेत.
एकाची चुक दुसरा दाखवुन पाडायला गेला की दुसर्याची चुक पण उघडी पडतेच.
म्हणुन जणतेच्या लक्शात जास्त दिवस काही टिकत नाही , असे माणुन हे राजकारणी दिवसें दिवस देशाचे वाभाडे वढत आहेत.
सत्ता धार्यांना विरोधी पक्श विरोध करतात, मला वाटते सगळ्या राजकारण्यांना जणतेने विरोध केला पाहिजे .
असो हे फक्त शब्दात्च राहणार आहे हे माहित आहे.
खंत देशाची बाकी काही नाही
ईतर कोणी ला पर्याय दिला आहे- बहुतेक बाबु लोकांचा थोडा बळी जाईल.
मनमोहन सिंग राजकियदृष्ट्या प्रभावी नसल्याने दिक्षित किंवा कलमाडी ह्यांचा गेम होण्याची शक्यता कमी. जयपाल रेड्डी ज्येष्ट संसदपटू वगैरे आहेत त्यामुळे त्यांचाही गेम होण्याची शक्यता कमी.बाबू लोकांना इकडून तिकडे करतील आणि कदाचित चौकशी समीती वगैरे नेमून प्रकरण आटोपते घेतील.
फक्त कलमाडी या पर्यायाला मत दिले आहे.
सध्या तरी बळी देण्यायोग्य (म्हणजे 'द्यावा' या अर्थी नव्हे तर 'देऊ शकतो' या अर्थी) एकच बकरा दिसतो.
[It is a little too early to write obituaries].
कलमाडींना "बकरा" केल्याचा देखावा (फारतर) केला जाईल पण त्यांना पार राजकीय विजनवासात धाडले नक्कीच जाणार नाही. कारण तसे केले तर, पुणे "साहेबांच्या" झोळीत अलगद जाईल, जे काँग्रेसला परवडणारे नाही. गाडगिळांना पुण्यात कोणी विचारीत नाही अणि दुसरा कोणी नेता कलमाडींची जागा घेऊ शकेल असे वाटत नाही.
शेवटी "लोकाग्रहास्तव" कलमाडींचे पंख छाटले गेल्याचे दाखवले तरी, प्रत्यक्षात काही होणार नाही. शेवटी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे, नाही का?
कलमाडींना "बकरा" केल्याचा देखावा (फारतर) केला जाईल पण त्यांना पार राजकीय विजनवासात धाडले नक्कीच जाणार नाही.
हात रे! असं करतात का? असले काही तरी अक्षरशः नाही पण वरकरणी होईल याच्याशी सहमत. २६/११ ला फॅन्सी ड्रेस शो ऑफ करणार्या गृहमंत्र्यांचे काय झाले? आता राज्यपाल! पण या संदर्भात कलमाडीं शिवाय दुसरे कोणीच तुर्तास दिसत नाही आहे...
आर्थिक आणि राजकियदृष्ट्या ताकदवान पुढार्याला अडगळीत टाकणे कॉंग्रेस नेत्रुत्वाला झेपेल की नाही ह्या विषयी शंका आहे. पण भाजपाकडे झुकलेला मध्यम्/उच्चमध्यम वर्ग गेल्या १/२ वर्षात काँग्रेसकडे वळ्वण्याचे प्रयत्न राहुल गांधी/इतरांकडून चालु आहेत. तेव्हा कदाचित विरोधी पक्षांनाच फूस देवून कलमाडींचा गेम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल गांधी कॉलेज तरुणांशी नजीकच्या काळात संवाद वगैरे साधतील त्याआधी कलमाडींचा गेम होण्याची शक्यता आहे. बघुया.!!
बि.का..शी सहमत...
कोणीच नाही..
जे कोण "दोषी" आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या बॉसकडे आता "आधीक निष्ठा" सिद्ध करावी लागेल इतकेच.
बाहेरच्या देशात भारताचे हसू झाले त्याची कोणाला पडली नाही आहे. अर्थात बाहेरचे देशही हसतील, पण अजुन पैसा चारुन आपले काम करुन घेतील. चार दिवस झाले की कोणाला याचे फारसे काही आठवणार नाही पण भविष्यातल्या वादपटुंसाठी 'गुगल' या घटनेची नोंद करुन ठेवेल इतकेच.
कोणाचाही (पक्षी पुढार्यांचा)"बळी" जाणार नाही. आधीच "रामजन्मभूमी केस" च्या निकालाची तारीख डिक्लेअर करून ठेवली आहे. त्याच्यावरून हिंदू मुस्लिम दंगे पेटवतील, त्यात काही सामान्य लोकांचे "बळी" जातील आणि लोक बाकीचं सगळं विसरतील. Public memory is very short.
बळी गेलेला आहे. जगात आपले नाक कापले गेलेले आहे. (आता आपण चिन्यांसारखे त्याबाबतीत अजिबात जागरूक नसतो, ते वेगळे.) हा 'राजकिय' बळी नाही. बाकी, कुठल्या नेत्याचे/नेतीचे टेंपरवारी उच्चाटन होते किंवा कसे ह्याविषयी अजिबात आस्था नाही. आता सालाबादप्रमाणे चौकशी समिती नेमण्यात येईल, अनेक दशकांनी तिचा पहिला अहवाल बाहेर पडेल, तोपर्यंत अनेक नवनवी स्कँडले आम्हास मिळाली असतील, आम्ही हे सगळे केव्हाच विसरून गेलेलो असू. तेव्हा चौकशी समिती नेमून आपण काहीतरी ह्याबाबतीत करतोय वगैरे दाखवल्याचे तत्संबंधित नेत्यांना/ मिनीस्टरांना/ पंतप्रधानांना समाधान मिळेल, कुणीतरी दोन चार नेते लोक इथे तिथे झाल्याने आम जनतेलाही तात्काळ समाधान मिळेल. ('तात्काळ सेवा' म्हणतात ती ही अशी!) पुन्हा पाच-दहा वर्षांनी समजा अशाच स्केलचे इव्हेंट आयोजित करण्याची संधि आपणास मिळाली, तरीही ह्याचीच अशीच पुनरावृत्ति घडेल, ह्याविषयी संदेह नाही. त्यावेळी मात्र कुणाचा असला कौल काढण्याचा उत्साह असलाच, तरी माझा त्यात भाग घेण्याचा नसेल.
गेल्याच शनिवारी दिल्ली वारी झाली.. (त्याचे काय आहे की आमचे एक 'दिल' तिथे रहाते ना.. :))
मेट्रोतून प्रवास करताना आमच्या 'दिला'ने 'खेळगावा'च्या आजूबाजूचा परिसर दाखवला.. अक्षरशः पाण्यात गेला आहे हो.. यमुना नदी चांगलीच कोपली आहे त्या परिसरावर..
'खेळगावा'च्या आत जरी जाता नाही आले तरी अगदी लहान मूलही सांगेल की.. 'अजून दिल्ली बरीच दूर आहे!'
त्या परिसरात रात्री फिरताना बरेच लोक झटून काम करताना दिसले.. त्यात आपल्या 'भूदला'चा ही समावेश होता..
प्रश्न असा पडला की हेच जर आधी केले असते, तर्र आज अशी नाचक्की झाली नसती..
असो, मला एवढेच म्हणायचे आहे की, राष्ट्रकूल स्पर्धेच्या आयोजनात जो काही गोंधळ माजला आहे, त्याचा जबाबदार कोण, ह्याची पाळेमुळे नंतर खोदत बसू.. ह्या घडीला महत्वाचे एकच आहे.. 'चला, दाखवूया सगळ्या जगाला की भारत ह्या स्पर्धेचे यथायोग्य आयोजन करू शकतो.. नव्हे, करणारच!!
जय हिंद!!
प्रतिक्रिया
कुणाचाही नाही
बळी जाणार जनतेचा
In reply to कुणाचाही नाही by सुनील
हो तर , म्हणून तर
In reply to बळी जाणार जनतेचा by गांधीवादी
विकास यांच्या कडून झालेल्या
१+
In reply to विकास यांच्या कडून झालेल्या by अवलिया
'इतर कोणी' ला मत दिले
थोडे अधिक
शेवटचा पर्याय निवडला आहे >>
In reply to थोडे अधिक by विकास
वरिल सर्व हा पर्याय नसल्याने
ईतर
In reply to वरिल सर्व हा पर्याय नसल्याने by गणपा
भेन्डीभाव शी सहमत आहे..
In reply to ईतर by चिरोटा
फक्त कलमाडी या पर्यायाला मत
तात्पुरते
In reply to फक्त कलमाडी या पर्यायाला मत by नितिन थत्ते
हात रे! :-)
In reply to तात्पुरते by सुनील
कलमाडी
In reply to हात रे! :-) by विकास
मत टाकले.
'कोणीच नाही' असा पर्याय
बि.का..शी..
In reply to 'कोणीच नाही' असा पर्याय by बिपिन कार्यकर्ते
बिझनेस अॅज युज्वल
In reply to बि.का..शी.. by वाटाड्या...
+१
In reply to बिझनेस अॅज युज्वल by सहज
देशाच्या इभ्रतीचा
अरेच्या ! हे काय भलतेच...
ह्यो बघा
दिल्ली