सर्वसाक्षी , तुमच्या आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
लेख छान झालाय. फोटो टाकून लेखाची रंगत वाढवलीत. दोन्ही फोटो मस्त.
मलाही हेच म्हणावेसे वाटते...'लहानपण देगा देवा'
ईश्वरी
सर्वसाक्षी , सुंदर लेख.
आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मात्र मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्यांचा.
लाख मोलाचं बोललात.
-- गणापा
आपणा सर्व कुटुंबियांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
बाकी "कुणीतरी मोठं आहे पाठिशी " ही भावना खरच बळ देते.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
साक्षीजी,
तुमच्या आई -वडिलांना उदंड आयुष्य लाभो, या सदिच्छा!
अनावश्यक अवांतरः तुमचे वडील बोलताना खरेच 'पतपत्रकाची देयके' हेशब्द वापरतात का हो?
सन्जोप राव
कधी लहर आली तर रात्री आईच्या हातात तेलाची बाटली कोंबुन मान खाली घालुन पुढे उभे राहुन आणि फर्माइशीनुसार डोक्याला आईच्या हाताने तेल लावुन घेण्यात जे सुख आहे ते केवळ अवर्णनियच!
अगदी मनातलं बोललास साक्षिदेवा! माझ्या मते याहून मोठं सुख असूच शकत नाही! आजही माझी ७३ वर्षाची म्हातारी कधी प्रेमाने माझ्या माथ्यावर तेल घालते तेव्हा खूप तृप्ती वाटते!
टोणगा कामानिमित्त बाहेर जायला निघाला तर पंचाहत्तरीची आई बेसनाचे लाडु करून देते आणि ऐंशी वर्षाचे बाबा 'अरे नुसते घरी फालतु कार्यक्रम बघत बसायचे ते तुला सोडायला विमानतळावर येतो' असे म्हणत उत्साहाने निघतात याहुन वेगळे भाग्याचे लक्षण ते कोणते?
क्या बात है! हे वाचून डोळे पाणावले!
साक्षिदेवा, तुझ्या आईवडिलांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाकरता समस्त मिपा परिवाराच्या मन:पूर्वक शुभेच्छा! फोटू टाकल्यामुळे लेखाची शोभा वाढली आहे... :)
तात्या.
कृतज्ञता म्हणतात ती हीच!
आपल्या माणसांकडून, हक्कानं लाड पुरवून, हट्ट करुन घेण्यातलं सुख मिळायला नशीबवानच असावं लागतं ही सुखं पैशात तोलता येत नाहीत! तुम्ही भाग्यवान आहात. :)
दोन्ही प्रकाशचित्रे सुरेख आहेत. पहिल्यात संसाराच्या खेळाला सुरुवात करतानाचे नवथर भाव आणि दुसर्यात सार्थकतेने आशीर्वाद देणारी समाधानाची छटा!
तुमच्या माता-पित्यांना अनेक शुभेच्छा!
चतुरंग
सर्वसाक्षींचे लेख म्हणजे मेजवानी. लेख वाचुन संपल्यावर समजते की आपण वाचतांना किती गुंगलो होतो.
तुमच्या आईवडिलांना शुभेच्छा, अशाच आम्ही ७५व्या वाढदिवसाच्या सुद्धा मिपावरच शुभेच्छा देउ अशी कामना करतो.
बाकी पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले :) .. हा अभिप्राय नक्की कळवा तुमच्या आईवडिलांना :)
माणसाचे आदर्श वयोमर्यादा म्हणजे १०० वर्ष आयुष्य असणे. त्यात एकमेकाच्या सानिध्याचे ५० वर्ष म्हणजे मणिकांचन योग.
सर्वसाक्षींचा वावर सर्वच ठिकाणी असतो. त्यातही त्यांनी मिपावर असे हितगुज टाकले म्हणून मलाच धन्य धन्य असे वाटले.
७५ व्या वाढदिवसाला आमचेही अनुमोदन.
सर्वसाक्षी माझा मात्र एक ठपका : आपण हा सार्वजनिक / कौटुंबिक कार्यक्रम साजरा करायला हवा होता. हे असे गुळमिळीत लिहायला मात्र आवडले नाही. आमची एक संधी हुकली. असो.
वा,साक्षीजी...
मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्यांचा
किती खरं आहे!
तुमच्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उत्तम आयुरारोग्य लाभो ही देवाजवळ प्रार्थना.
दोन्ही प्रकाशचित्रे सुरेख आहेत. पहिल्यात संसाराच्या खेळाला सुरुवात करतानाचे नवथर भाव आणि दुसर्यात सार्थकतेने आशीर्वाद देणारी समाधानाची छटा!
फोटोंबाबत चतुरंगंचे म्हणणे अगदी पटले.
स्वाती
तुमच्या आई -वडिलांना उदंड आयुष्य लाभो, या सदिच्छा!
मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्यांचा
अगदी बरोब्बर आहे!
खरच जुन्या काळातले हीरो-हीरोइन पाहील्या सारख वाटलं. :)
साक्षीदेवा,
आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बाकी आनंदयात्री म्हणाल्याप्रमाणे पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले
:)
-ध मा ल.
आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!बाकी आनंदयात्री म्हणाल्याप्रमाणे पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले
हेच म्हणतो....
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
आई वडिलांना माझ्याकडूनही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कीती सुंदर लिहिलय्... शब्द आणि शब्द मोलाचा आहे..
मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की!
फारच छान..
(अशीच सगळ्यात छोटी असणारी, आई, वडिल, बहिणीच्या आठवणीने हळवी झालेली)
वरदा
प्रतिक्रिया
शुभेच्छा
शुभेच्छा
शुभेछा!!!!!!!!!!!
शुभेच्छा....
शुभेच्छा
शुभेच्छा... :)
साक्षी, फारच छान!
शुभेच्छा!
सुंदर
अनुमोदन
सर्वसाक्षीजी.....
शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा
शुभेच्छा !!!
असेच
तुमच्या आई
निरामय सहजिवन
अभिनंदन...
शुभेच्छा !!!
साक्षीदेव
शुभेच्छा!
आईबाबांना
शुभेच्छा !
तुमच्या
शुभेच्छा !