✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गझल

य — यशोधरा, Wed, 09/22/2010 - 16:37

प्रतिक्रिया द्या
5612 वाचन

💬 प्रतिसाद (47)

क्या बात है

श्रावण मोडक
Wed, 09/22/2010 - 16:42 नवीन
क्या बात है! प्रत्येक द्विपदी भावली!!!
  • Log in or register to post comments

छान ....

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/22/2010 - 16:44 नवीन
छान जमलिये...!
  • Log in or register to post comments

छान आहे. तांत्रिक बाबी कळत

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/22/2010 - 16:46 नवीन
छान आहे. तांत्रिक बाबी कळत नाहीत, पण भावार्थ आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त जमलीय, आवडली

पुष्करिणी
Wed, 09/22/2010 - 16:46 नवीन
मस्त जमलीय, आवडली
  • Log in or register to post comments

ज्जे व्वात!

मेघवेडा
Wed, 09/22/2010 - 16:52 नवीन
__/\__ आवल्डीच!
  • Log in or register to post comments

मस्त जमलिए गझल सर्व द्विपदी

निखिल देशपांडे
Wed, 09/22/2010 - 16:58 नवीन
मस्त जमलिए गझल सर्व द्विपदी आवडल्या...
  • Log in or register to post comments

गझलेच माहित नाही पण प्रत्येक

चेतन
Wed, 09/22/2010 - 16:58 नवीन
गझलेच माहित नाही पण प्रत्येक ओळ मस्त जमलेय शेवटची ओळ छान जमलेय (पण पहिल्या सगळ्या ओळींसारखी प्रश्नार्थक नाहि आहे ) चेतन
  • Log in or register to post comments

शेवटच्या दोन ओळी खासच

मितान
Wed, 09/22/2010 - 17:14 नवीन
शेवटच्या दोन ओळी खासच !ब पूर्ण गजल वाचताना उन्हाचा भास होतो आणि या दोन ओळीत सावलीचा गारवा ! खूप छान :)
  • Log in or register to post comments

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे

यशोधरा
Wed, 09/22/2010 - 17:27 नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

सुंदर गझल

सागर
Wed, 09/22/2010 - 17:47 नवीन
वा यशोधरा, सुंदर गझल रचली आहेस खास करुन या ओळी काळीज भेदून आरपार गेल्या पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता? सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने, बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता? चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता.. जबरदस्त आणि बहोत बढीया खूप दिवसांनी एका चांगल्या गजलेची कट्यार काळजात घुसली :) मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments

आवडली गझल! शेवटच्या दोन ओळी

अनामिक
Wed, 09/22/2010 - 20:32 नवीन
आवडली गझल! शेवटच्या दोन ओळी विशेष आवडल्या.
  • Log in or register to post comments

वाहवा

पैसा
Wed, 09/22/2010 - 20:46 नवीन
वाहवा!
  • Log in or register to post comments

गझल आवडली यशोधरा

संदीप चित्रे
Wed, 09/22/2010 - 20:49 नवीन
पण संपूर्ण गझलेत शेवटचा शेर विशेष आवडला >> चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता... सुरेख कल्पना आहे ही .
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

चतुरंग
Wed, 09/22/2010 - 22:30 नवीन
शेवटची द्विपदी अगदी सहज आली आहे आणि अर्थगर्भ आहे, सुंदर! रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

हाय! का नाही कळाले, वाट होती

सुहास..
Wed, 09/22/2010 - 21:08 नवीन
हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली, पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता? सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने, दंश ज्याचा धर्म तो, का मानला मी साव होता! >>> व्वा !! लेखणीत ऊतरले भाव ,की हा केवळ सराव होता? असा हा अंत असहाय्यतेचा,जणु नशीबाचाच अटकाव होता ?
  • Log in or register to post comments

क ड आणी क!!!!!

प्रभो
Wed, 09/22/2010 - 21:09 नवीन
क ड आणी क!!!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!

प्राजु
Wed, 09/22/2010 - 22:27 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

काव्य आवडले-

विदेश
Wed, 09/22/2010 - 22:36 नवीन
खास करून पुढील ओळी- सोबती ज्या मानले,पाठीत केला वार त्याने, दंश ज्याचा धर्म तो,का मानला मी साव होता-
  • Log in or register to post comments

सुरेख!

नंदन
Wed, 09/22/2010 - 23:34 नवीन
घालता कोडे, जवाबाचे तुला का दु:ख झाले? बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता?
--- मस्त.
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता..
--- क्लास! 'घरसे चलें थे हम तो खुशी की तलाशमें' मधल्या भावनेचा व्यत्यास म्हणण्याचा मोह व्हावा अशी द्विपदी.
  • Log in or register to post comments

सुंदर गझल

शुचि
गुरुवार, 09/23/2010 - 01:01 नवीन
सुंदर गझल >> चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...>> :(
  • Log in or register to post comments

पावलांना शाप, चांदणे | पाठीत वि. पाठीवर वार

बेसनलाडू
गुरुवार, 09/23/2010 - 01:43 नवीन
हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली, पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता? चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता... या दोन द्विपदी विशेष आवडल्या. एकंदर चांगली झाली आहे. (वाचक)बेसनलाडू पाठीत वार नाही; मराठीत पाठीवर वार असतो, असे वाटते; चू. भू. द्या. घ्या. पाठीत वार जरासे हिंदाळलेले आहे (पीठ में छुरा भोंकना चे मराठीकरण?) (मराठी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

पाठीत वार नाही; मराठीत पाठीवर

यशोधरा
गुरुवार, 09/23/2010 - 12:16 नवीन
पाठीत वार नाही; मराठीत पाठीवर वार असतो, असे वाटते; चू. भू. द्या. घ्या. पाठीत वार जरासे हिंदाळलेले आहे (पीठ में छुरा भोंकना चे मराठीकरण?) आता माझाही गोंधळ झाला! हिंदाळलेले की कसे कल्पना नाही, कारण हिंदीत विचार करुन त्याचे मराठी करण करुन मी लिहित नाही किंवा माझे हिंदी वाचनही शून्यच आहे, पण पाठीत खंजिर खुपसला/ खंजिराचा वार केला, अशी वाक्ये वाचली आहेत, त्याचा संदर्भ असावा. मला पाठीत/ पाठीवर दोन्ही बरोबर वाटते खरे सांगायचे तर, माझे चुकतही असेल. कोणी जाणकार सांगेल का? नंदन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

दोन्ही

नंदन
गुरुवार, 09/23/2010 - 12:34 नवीन
'पाठीवर वार' हे लाक्षणिक अर्थाने - म्हणजे कृतघ्नता, विश्वासघात इ. दर्शवण्यासाठी अधिक बरोबर आहे, असं मला वाटतं. मात्र शब्दशः असेल उदा. गुद्दा, धपाटा, खंजिराचा वार इ. तर पाठीत. तेव्हा या ठिकाणी दोन्ही चालून जावे. (वृत्ताचा तोल अर्थहानी न होता सांभाळला जात असल्यामुळे.) इलाही जमादारांच्या गाजलेल्या गजलेच्या (एका आवृत्तीत/पाठभेदात*) असा शेर आहे - छाती खुली तरीही पाठीत वार केला, दिलदार यार माझा लाजला असावा. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा. [*पाठभेद म्हणण्याचं कारण की, जालावर १-२ ठिकाणी वाचलं त्यात हा शेर नव्हता.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

>>केलेत वार ज्याने तो मोगरा

यशोधरा
गुरुवार, 09/23/2010 - 12:38 नवीन
>>केलेत वार ज्याने तो मोगरा असावा >> आई गं! :) धन्यवाद नंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

छान

धनंजय
गुरुवार, 09/23/2010 - 02:48 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

कळली नाही

चित्रा
गुरुवार, 09/23/2010 - 03:45 नवीन
गझल कळली नाही. पण खूपच गेय वाटली.
  • Log in or register to post comments

चित्राताई

यशोधरा
गुरुवार, 09/23/2010 - 12:17 नवीन
चित्राताई :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

छानच !

अथांग
गुरुवार, 09/23/2010 - 04:09 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख.

गंगाधर मुटे
गुरुवार, 09/23/2010 - 08:26 नवीन
मतला आणि मक्ता सुरेख.. :)
  • Log in or register to post comments

वा वा !

ज्ञानेश...
गुरुवार, 09/23/2010 - 10:24 नवीन
चांदण्यांनी घेतलेला ठाव आवडला. पुलेशु.
  • Log in or register to post comments

सुंदर.. चालताना सोबती होता

अस्मी
गुरुवार, 09/23/2010 - 11:14 नवीन
सुंदर..
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता
ही द्विपदी सगळ्यात आवडली :)
  • Log in or register to post comments

चालताना सोबती होता जरी अंधार

मनीषा
गुरुवार, 09/23/2010 - 11:41 नवीन
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता... सुंदर !!
  • Log in or register to post comments

!

अवलिया
गुरुवार, 09/23/2010 - 11:49 नवीन
!
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून आभार!

यशोधरा
गुरुवार, 09/23/2010 - 12:19 नवीन
सर्वांचे मनापासून आभार! :)
  • Log in or register to post comments

यशो, खूपच सुंदर आहे गझल.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 09/23/2010 - 13:05 नवीन
यशो, खूपच सुंदर आहे गझल. आवडली.
  • Log in or register to post comments

वाह वाह!!

सूड
गुरुवार, 09/23/2010 - 13:33 नवीन
गझल छान जमलीय.
  • Log in or register to post comments

_/\_

धमाल मुलगा
गुरुवार, 09/23/2010 - 17:46 नवीन
झक्क्कास! :) अवांतरः कसं काय बुवाएव्हढं एव्हढं छान लिहायलं सुचतं लोकांना ?
  • Log in or register to post comments

कविता कुठली गझल कुठली हे

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/24/2010 - 13:57 नवीन
कविता कुठली गझल कुठली हे आपल्याला बिलकुल कळत नाही. मात्र वर हे जे काय पद्य लिहिले आहे ते एकदम आवडून गेले :) हलकट अवांतर :-
भासली शाबासकी, की घातलेला घाव होता?
ह्या ओळीवरुन आम्हाला दिसामाजी मनात येईल ते खरडणार्‍या एका सदस्येच्या लेखनावर येणार्‍या प्रतिक्रीयांची आठवण झाली. (त्यातल्या ९८% त्यांच्या स्वतःच्याच असतात हा भाग वेगळा) त्या प्रतिक्रीया म्हणजे शाबासकी आहे का धपाटा हे वाचताना कळतच नाही.
  • Log in or register to post comments

पर्‍या, धन्यवाद, आणि सोप्पे

यशोधरा
Fri, 09/24/2010 - 14:03 नवीन
पर्‍या, धन्यवाद, आणि सोप्पे केलेय की काम तसे! :) बरे, तुझे अवांतर मला व्यनिमधून उलगडून सांग बरे! :) आणि आता धागा वर आणून दिलाच आहेस, तर (थॅंक्यू! ;) ) तर, धम्या, पुपे आणि सुधांशू धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सोसलेल्या चेहर्‍यांचा,

विजुभाऊ
Fri, 09/24/2010 - 14:12 नवीन
सोसलेल्या चेहर्‍यांचा, शापितांचा गाव होता.. गझलमधे सामावलेले पझल....
  • Log in or register to post comments

छान...

राजेश घासकडवी
Fri, 09/24/2010 - 14:32 नवीन
मस्त जमली आहे गजल.
  • Log in or register to post comments

सुंदर गझल , छान जमुन आली आहे

चन्द्रशेखर गोखले
Fri, 09/24/2010 - 21:12 नवीन
सुंदर गझल , छान जमुन आली आहे ! (मी चारोळीकार चन्द्रशेखर गोखले नाही)
  • Log in or register to post comments

आवडेश!

राघव
Sun, 09/26/2010 - 07:27 नवीन
घालता कोडे, जवाबाचे तुला का दु:ख झाले? बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता? हे खास आवडले. शेवटचं कडवं मात्र संपूर्ण गझलच्या भावनेशी विसंगत वाटतं. चु.भु.द्या.घ्या.
  • Log in or register to post comments

>>शेवटचं कडवं मात्र संपूर्ण

यशोधरा
Mon, 09/27/2010 - 19:32 नवीन
>>शेवटचं कडवं मात्र संपूर्ण गझलच्या भावनेशी विसंगत वाटतं >> नाही खरं तर. संपूर्ण गझलेमधे एक कैफियत मांडायचा प्रयत्न आहे. आजूबाजूला काय सुरु आहे ह्याबद्दल, आणि तोंडावर गोड बोलणारे, पण मागून छुपे वार करणारे म्हणा, स्वतःच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन इतरांना त्रास देणारे व तत्सम ह्यांबद्दल. आणि कैफियत मांडता मांडता हे लक्षात आलेलं आहे की निवडलेल्या मार्गात जरी अडचणी आलेल्या असल्या, पुढेही येणार असल्या आणि एकूणातच जरी उद्वेगजन्य, मानसिकदृष्ट्या थकवणारा प्रवास असला तरीही हरकत नाही. कारण आतूनच जर समाधान असेल, तर प्रत्येक मुष्कील सरआंखोंपर! म्हणून, -चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या... तरीही हार मानलेली नाहीये, मानणार नाहीये, कारण, -चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता... अवांतरः - ही ओळ आधी अशी लिहिली होती.. चांदण्याचा ताजवा साथीस आहे, रात होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

सुरेख!

पिवळा डांबिस
Sun, 09/26/2010 - 11:34 नवीन
भावना व्यक्तिशः भावली नाही, पण गजल मात्र सुरेख!!! जियो!
  • Log in or register to post comments

कित्या हो काका भावली नाही?

यशोधरा
Mon, 09/27/2010 - 19:34 नवीन
कित्या हो काका भावली नाही? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

छान शब्दरचना!

नगरीनिरंजन
Sun, 09/26/2010 - 13:27 नवीन
छान शब्दरचना!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा