का होत असेल हो असं !?
माफ करा. जरा चावून चोथा झालेल्या, मेंदुचा भुगा करणार्या प्रश्नावर विचार करतोय. आजच बातमी कळली की माझ्या एका सहकार्याने, बॅचमेटने आत्महत्या केली? का केलं असेल त्याने? मुलगा दिसायला चांगला, घरची परिस्थिती उत्तम.. अगदी दर दोन आठवड्यांनी विमान प्रवास करु शके, इतकी. त्याच्या लग्नात त्याने एका प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रम ठेवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे अश्वपथाचे संचालन करण्याचा मान मिळवलेला.. नोकरी कुठल्याही आई-वडीलांना अभिमान वाटावी अशी.. वन ऑफ द बेस्ट अॅथलिट्स आय हॅव सीन.. सगळं कसं आलबेल (दिसायला तरी)...
.... आणि असा हा माणूस एका अतिशय शुल्लक वाटणार्या कारणावरुन आत्महत्या करतो ? कमकुवत मनाचा म्हणावा तर आयुष्यातले अनेक टक्के-टोमणे पचवलेले.. जिथे पोहचला होता, तिथंपर्यंत जाता जाता लोक गळून, उन्मळून पळतात हारून, पराभुत होऊन.. हा तिथे पोचून वर मस्त मजेत जगत होता. मग असं काय झालं असेल, की अचानक त्याला सगळं संपवावसं वाटलं? कुठली असते ही अंत:प्रेरणा आणि कुठून येते की माणूस सगळी नाती, सगळी बंधनं झुगारुन एकटाच निघून जातो, परत न फिरण्यासाठी? स्वतःला संपवतांना एकदाही त्याच्या मनात त्याच्या वृद्ध आई-वडीलांचे विचार आले नसतील? एकदाही त्याला त्याच्या नुकत्याच लग्न होउन जीवनात आलेल्या बायकोबद्दल काहीही वाटलं नसेल? अजून आयुष्यात बाकी असलेल्या ध्येयांनी त्याला परतीची साद दिली नसेल? आणि जर हे सगळं झालं असेल तर कसल्या ताकदीच्या बळावर त्याने हे सगळं नाकारुन मृत्यूला मिठी मारली ? आणि मृत्यु आपले पाश आवळत असतांन त्याने सुटकेची धडपड, पुन्हा एकदा परत फिरण्याचा, केविलवाणा का होईना, प्रयत्न केला असेल का? काय होत असेल नेमकं त्याच्या मनात त्या क्षणी...??
सॉरी... माझ्या मनात दाटुन आलेले हे प्रश्न, ह्या भावना तुमच्यासमोर मांडाव्याशा वाटल्या.. कूणी म्हणेलही कदाचित, काय नालायकपणा आहे हा? मी बाजार मांडतोय का? फुकट शहाणपणा, संधी साधतोय का शब्दांचा खेळ मांडन्याची? असेल्ही... नसेलही... बोलावंस वाटलं, मोकळम व्हावंसं वाटलं एवढं मात्र खरं..
प्रतिक्रिया
..ती वेळच असते!
ग्रेट! धाडसी म्हणायला हवा
>>ग्रेट! धाडसी म्हणायला हवा
+१
आत्महत्येला ग्लोरिफाय वगैरे
सुख आणि समाधान यामधील धुसर
चिगो, तुमच्या दु:खात सहभागी
आत्महत्या
हम्म्म. आयुष्य प्रत्यक्षात
मोकळ व्हा
साला हा विषयच इतका विचित्र
खरंच ती वेळ्च तशी असते
कधी कधी फार depression आले
चिगोशेठ...
>>मिळालेल्या हजार
तमाच्या तळाशी !
शंका !!
माझा एक वर्गमित्र..दहावी अन
तुमच्या ही मित्राच्या आई
तो हुशार होता हे मी सहानुभूती
विलक्षण वाटणारे वळण
दै.सकाळ मधील ही बातमी वाचली