तरीही हे दोन्ही कायदे सर्व हिंदूंना समान नियमांत बांधत नाहीत. तर बहुतेक जातीजमातींना त्यांच्या रूढीप्रमाणे विवाह करण्याची
वेगवेगळ्या पद्धातीने विवाह केल्यास काय फरक पडतो ? विवाहानंतर आत्ताच्या समाजमान्य पद्धतीप्रमाणे हक्क आणि जबाबदार्या असल्या की झाले.
आसाम व बंगाल येथील हिंदूंमध्ये जीमूतवाहनाच्या दायभाग पद्धतीप्रमाणे वारस ठरतात तर उर्वरित भारतातील हिंदूंमध्ये विज्ञानेश्वराच्या मिताक्षरा पद्धतीनुसार वारस ठरतात.
याचा अर्थ कळला नाही.
विवाह झाला की नाही हे ठरवण्याचे निकषही वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळे आहेत.
उदाहरण देता का ?
चित्रपट प्रमाण मानता येणार नाहीत पण त्यातही हिंदूंच्या लग्नासाठी एकच विधी दाखवतात. मराठी, गुजराती, पंजाबी यात थोडाफार फरक आहे पाण माळ घालणे, सप्तपदी वगैरे गोष्टी समानच आहेत.
मुसलमानांच्या बाजूने बोलले म्हणजे सेक्युलॅरिझम सिद्ध होतो असे समजू नये.
धर्माचे स्थान पारलौकिक बाबींपुरते मर्यादित करणे म्हणजे सेक्युलॅरिझम होय आणि इहलौकिक बाबींना आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक अडचणी लक्षात घेउन सामोरे जाणे म्हणजे सेक्युलॅरिझम होय. .
प्रतिसाद संपादित. वैयक्तिक टिपण्या करू नयेत.
मुसलमान लोकांचा कळवळा आहे वा मी फार सेक्युलर आहे अशातलीही गोष्ट नाही.
पण इथले आपले काही मित्र इतकी टोकाची उदाहरण देतायत की तीच उदाहरण जणुकाही आपल्या लोकांत (हिंदुत) दिसतच नाहीत. जरा आधी डोळे उघडुन अजुबाजुला पहाच. अशी अनेक उदाहरण दिसतील.
आता मी ही थत्ते काकां सारख म्हणतो की बरीच नवी माहीती समजली.
थत्ते काकांनी माझ्या प्रतिसादातली काही वाक्ये उचलली आहेत म्हणून पुन्हा इथे प्रतिसाद देतेय.
माझा प्रतिसाद हे पैसातैंच्या मुस्लिमांच्या अस्वच्छपणाला उप-प्रतिसाद होता, त्यामुळेही आणि वेळेअभावीही फक्त मी माझा शेजार्यांबद्दलचा अनुभव लिहिला होता.
१. कुणाच्या घरात किती माणसे असावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मग एवढ्या सगळ्या लोकांमुळे तयार होणार्या कचर्याचे व्यवस्थापन करावे ना मग. कसाही खिडक्यांमधून फेकून इतरांना का त्याचा त्रास?
२. त्या शेजार्यांनी सोसायटीच्या आवारात बकरे बांधून आणखी कचरा केला. आणि ते दांडगे बकरे दरवाजाला धडका देत गेले. तेव्हा त्यांनी शिंगे मारून माझा दरवाजा खराब केला नाही, हे माझेच नशीब. या गोष्टी सोयीस्कररित्या दुर्लक्षिलेला दिसतोय.
३. माझ्या गावी आमच्या गल्लीच्या शेजारीच मुस्लिम मोहल्ला आहे. रोज सकाळी ५:३० ची अजान ऐकली की वाटते, "चला, अजून रात्र बाकी आहे. दोन-तीन तास आणखी लोळायला हरकत नाही". तिथल्या लोकांशी खूप चांगले संबंध आहेत. पण जेव्हा तो शेजार शेजारच्या गल्लीतून अगदीच शेजारी आल्यावर त्रास झाला, तोच इथे मी मांडला. जर ती नवीन माहिती असेल तर छानच.
कुणी कुठे राहावे आणि कुणी कुणाला घर विकावे हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न. सगळेच मुस्लिम असे घाणेरडे नसतीलही. त्यामुळे त्याबद्दल भाष्य मी आधीही केले नव्हते आणि आताही करत नाही. आणि हो, मी राहात असलेल्या परिसरात मुस्लिमांना घरे न विकले जाण्याचे कारण वेगळे आहे. असो.
पण फ्लॅटस असलेल्या सोसायटीत बकरे कशासाठी? ते जर घरात मारण्यासाठी आणले असतील तर ती नक्कीच वाईट गोष्ट आहे. मला वाटतं तसे करणे हा कायद्यानेही गुन्हा असावा.
ते सार्वजनिक स्वच्छतेचे आहेत.
लहानपणी माझ्या मुस्लिम मैत्रिणीच्या घरी गेले असताना थेट ओट्यावरच कापून ठेवलेले मांस पाहून मलाही विचित्र वाटले होते, पण मैत्री चांगलीच असल्याने ते विसरूनही गेले आज ते या सर्व चर्चेमुळे आठवले.
पण अमेरिकेत आल्यानंतर पाहिले की बायका थेट संगमरवरी ओट्यावरच पोळ्या लाटतात. आता यासाठी पोळपाट का घेत नाहीत, टीव्ही वर - फूड नेटवर्कवर पाहिलेले कुक तसे करताना दिसतात म्हणून करत असावेत असा मी समज करून घेतला.
माणूस जे बघतो तसे साधारणतः त्याचे वागणे होते.
बकरे आणून घरात कापणे हे आपल्याला रुचणार नाही पण जिवंत खेकडे/चिंबोर्या हिंदूही घरी खायला आणत असतात.
त्यात मुसलमान अधिक वाकबगार, म्हणून त्यांना आपण यात काही गैर करतो आहोत हे वाटत नसावे. गैर आहे का नाही, हे आपल्याकडच्या कायद्यांप्रमाणे पाहिले पाहिजे.
वन बीएचके मध्ये मुंबईला सायनच्या भागात राहणारी कित्येक गुजराती/जैन व्यावसायिक कुटुंबे एकत्र दोन तीन पिढ्या (आईवडिल, तीनचार भाऊ, त्यांची प्रत्येकी एक किंवा दोन मुले) राहतात. त्यांना घरात आल्याआल्या पार्टिशने करणे, गॅलरीची बेडरूम करणे, असे करण्याशिवाय पर्यायच नसतो. हे मी ९० च्या दशकातील सांगते आहे. आता कदाचित थोडे काही बदलले असेल, फार बदलले असले तर मला कल्पना नाही. गुजराती हे केवळ अनेक होते म्हणून त्यांचे नाव घेतले आहे, कोकणातून आलेले मराठी देखील असे करत असतीलच. हे लोक भरपूर पैसा असलेले होते, प्रत्येकाच्या गाड्या असत, त्या रोज गाड्या धुवत, त्यासाठी सोसायटीचा गुरखा वापरत. आमच्या गाडीला बाहेर जाण्यासाठी हमखास वाट नसे. सकाळच्या वेळी त्यांना झोपेतून उठवावे लागत असे, की बाबारे, आमची गाडी बाहेर काढायची आहे, त्यासाठी तुझी गाडी आधी बाहेर काढ.
मग अशा लोकांचे काय करायचे? त्यांना हे 'गुज्जु", हे "हिंदू" असेच वागणार, असे म्हणायचे का? का हे प्रॉब्लेम जास्त "जनरल" स्वरूपाचे आहेत? त्यात ते हिंदू म्हणून असे करतात पेक्षा त्यांना कसे वागायचे कळत नाही असे म्हणणे योग्य आहे? कचरा वरून खाली टाकणे ही मुस्लिमांची नाही, तर भारतीयांची खोड आहे.
मी लहानपणी अशा ठिकाणी वाढले आहे जिथे निदान २०% जनता मुस्लिम होती, बाकीची गरीब हिंदू होती. दोन्ही वस्त्यांमध्ये खाणे पिणे यातील फरक सोडले तर राहण्यात फार काही वेगळेपणा होता असे नाही.
हिंदु जन्माला येतानाच रिसाईकल पॅक एक्ट्रा घेवुन जन्माला येतात. जेवायला त्याना गोळ्या लागतात व बाहेर टाकताना ते फक्त गॅसेस सोडतात. त्यामुळे कचर्याची शक्यता नाहीच.
जैनांच्या व गुजरमारवाड्याच्या बिंल्डींगमध्ये मिश्राहारी हिंदुना कशी वागणूक दिली जाते ह्याबद्दल कोणी हिंदु भाष्य करेल काय?
मिपावर सभ्य शब्दांत खेळीमेळीने चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते. तुम्ही लिहिलेल्यांसारखे हीन शब्द वाचले की आपण सभ्य, सुसंस्कृत माणसांमध्ये वावरत नसून असंस्कृत, दारू पिऊन बरळणाऱ्या लोकांचं बेलगाम बरळणं ऐकतो आहोत असं वाटतं. मग तोंडात असल्या कटू विचारांची कडवट चव राहाते.
मिपाच्या प्रत्येक पानावर ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा फोटो दिसतो. आत्ता तर बाजूला गणपतीचाही फोटो आहे. तेव्हा आमच्यासाठी नाही तरी त्यांना पाहून तरी सबुरीने घ्या एवढीच विनंती.
मिपावर सभ्य शब्दांत खेळीमेळीने चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते. तुम्ही लिहिलेल्यांसारखे हीन शब्द वाचले की आपण सभ्य, सुसंस्कृत माणसांमध्ये वावरत नसून असंस्कृत, दारू पिऊन बरळणाऱ्या लोकांचं बेलगाम बरळणं ऐकतो आहोत असं वाटतं. मग तोंडात असल्या कटू विचारांची कडवट चव राहाते.
मिपाच्या प्रत्येक पानावर ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा फोटो दिसतो. आत्ता तर बाजूला गणपतीचाही फोटो आहे. तेव्हा आमच्यासाठी नाही तरी त्यांना पाहून तरी सबुरीने घ्या एवढीच विनंती.
+१, अजुन काही बोलण्यासारखे रहात नाही.
बाकी चालु द्यात.
गांधीवादी यांनी संयमीत शब्दात आपले म्हणणे मांडावे. प्रतिसाद प्रकाशित करा कळ दाबण्या अगोदर पुन्हा पुन्हा वाचुन शक्य तेवढे आक्षेपार्ह शब्द वगळायचा प्रयत्न करावा.
जीवनाची पहिली १५ वर्षे मंगळवार पेठ झोपडपट्टीत, नंतरची वर्षे कासेवाडीत घालविली आहेत.
असल्या माणसाकडून तुम्हाला समाजतल्या विकृतींचे ओंगळवाणे दर्शन होणार नाही तर काय निसर्गरम्य कथा, कविता वाचायला मिळतील काय.
आयुष्यात जेवढ्या वेळा बगीच्यात गेलो तेवढ्या वेळा तिथले कारकून लोक माझा (आणि मित्रांचा) अवतार बघून हाकलून देत असत. मी काय इथे बालगीते गाऊ काय ? नशिबाने आज ४ पैसे कमावून एका खोक्यात इंटरनेट वापरायला मिळत आहे. माझ्या व्यथा इथे मांडल्या तर तुम्हाला लगेच वास येतो का राव ?
आम्ही दुनियेची गटार गंगा अंगावर सहन केलेली आहे (करत आहे) तुम्हाला वास सुद्धा सहन होत नाही. इथले वर्णन लिहून पाठवू का, कि मंगळवार पेठेतील एक दिवस हि गोष्ट सांगू ?
कि अश्या माणसांनी इथे येऊन आपले म्हणणे मांडूच नये कि काय ? असे असाल तर सांगा राव.
मला माहित आहे इथले हजारो लोक शिव्या घालत असतील, पण त्यांनी एकदा तरी ते आयुष्य जगून बघावे, जे इथल्या लाखो लोकांच्या नशिबाला येते. मग खुशाल उचलावी जीभ आणि लावावी टाळ्याला.
इथल्या खूप (परदेशी) मंडळींनाजग जे दिसत असेल ते जग आम्ही कधी पहिलेच नाही, तर कसे गुण गाऊ त्या जगाचे सांगा ?
तुमच्या मनातील कडवटपणा असणे स्वाभाविक आहे पण त्याची भडास एकाद्या समुदायावर काढणे चुकीचे आहे.गांधीवादी ह्या आयडी कडुन सहिष्णु आणि मानवतावादी लिखाणाची अपेक्षा होती. तिला एकदम तुमच्या हिंसक व जहाल भुमिकेमुळे छेद गेला. त्यामुळे आम्ही मिपाकर बावचळुन गेलो आहे.
एकाद्या समुदायावर
नाही, दोन(च) समुदायावर, एक पांढरे दहशतवादी, आणि काही धर्मवेडे.
धर्मवेडे का ?
इथेच, ह्याच व्यासपीठावर पुनर्लेखनाच्या नावाखाली देवी, देवतांवर मागे इतकी चिखल फेक झाली, किती जणांना , किती जणांनी लगेच 'तुझा contact दे' म्हणून धमकावले ?
>>त्याची भडास काढणे चुकीचे आहे
कोण भडास काढतंय ? भडास काढतोय असे तुम्हाला वाटते. मला नाही.
>>आम्ही मिपाकर
तुम्ही मिपाकर, मग आम्ही कोण ? बरं 'आम्ही मिपाकर' म्हणजे तरी नक्की कोण कोण ?
>>बावचळुन गेलो आहे.
नाव घेऊन लिहिले तर बावचळून जाता, स्वताला गांधीवादी म्हून घेऊन एकशे एक अराजकीय कृत्ये करणारे बघून मी पण बावचळून गेलो आहे. त्याचंही कृत्ये संपादित करणारा संपादक शोधात आहे.
राजेश साहेब, हे असले देवी देवतांचे आवाहन करू नका हो , अगदी एक अक्षम्य अपराध केल्या सारखे वाटते. जे शब्द तुम्हाला, मिपाला हीन वाटले तेच शब्द जसेच्या तसे, बर्याच ठिकाणी उघडपणे सर्रास वापरण्यात येतात. तेच तुम्हाला हीन वाटले त्यात मी खरतर काही करू शकत नाही. बाकी त्यात शब्दन मध्ये मी जे नमूद केले होते ते सत्यच आहे. हे तुम्ही देखील नाकारू शकत नाही. लहान मुलांवर , स्त्रियांवर होणारे अत्याचार हे स्वतः डोळ्याने पाहत आलेलो आहे. आणि हो मनावर खूप नियंत्रण आहे. आणि त्यामुळेच हे सगळे बघून सुद्धा अनेक त्या विशिष्ट जमातीतले अनेक मित्र देखील आहेत.
>>तुम्ही लिहिलेल्यांसारखे हीन शब्द वाचले की आपण सभ्य, सुसंस्कृत माणसांमध्ये वावरत नसून असंस्कृत, दारू पिऊन बरळणाऱ्या लोकांचं बेलगाम बरळणं ऐकतो आहोत असं वाटतं.
मी तरी अजून पर्यंत जाणून बुजून कोणाचा अपमान केलेला नाही. व अशी विधाने केलेली नाही. आपल्याला कशी आढळून आली देव जाने. मी जे मांडतो ते बर्याच जनाच्या मनात असते, फक्त ते पांढर पेश्या लोकांच्या कानाला तिखट वाटते, एवढाच.
ना आवडतीचे मीठ पण आळणी लागते, नीट बघा, तसेच काही तरी असेल,भारत सरकारने त्यांना दिलेली अवाजवी सूट ह्याबद्दल कोणीच काही बोलत नाही, ह्याचे आश्चर्य वाटते.
>>मिपावर सभ्य शब्दांत खेळीमेळीने चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते.
आपल्याला केवळ मिपावर हे अपेक्षित आहे हे बघून आनंद कमी दुख: जास्त झाले, आम्हाला हे ह्या विश्वात अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न देखील करतो, एखाद विशिष्ट जमातीतल्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न देखील केला कि तुमच्या जमातीतले क्रूर कायदे बंद करा म्हणून, पण पालथ्या गाड्यावर पाणी. लहान पोरे ओरडताना तुम्ही कधी पहिले आहे का ? खाटिक पण बरे असे म्हणण्याची वेळ येते.
हीन शब्द वापरण्याचं अश्लाघ्य वर्तन काही ठिकाणी होतं म्हणून ते मिपावरही चालून गेलं पाहिजे हा तर्क कळला नाही.
या प्रतिसादात एकही हीन शब्द न वापरल्याबद्दल धन्यवाद. असंच लिहीत राहा.
या विषयावर मला अधिक चर्चा करायची इच्छा नाही.
जैनांच्या व गुजरमारवाड्याच्या बिंल्डींगमध्ये
सरसकट गुजरमारवाडी हा शब्द वापरून नये ही विनन्ती
अवांतरः सरसकट मराठी भाषीकाला घाटी म्हंटले तर ते बरोबर होईल का?
सरसकट मराठी भाषीकाला घाटी म्हंटले तर ते बरोबर होईल का?
विजुभै मला या वाक्याचा अर्थ खरोखर कळला नाही. जर हीन अर्थानेच वापरायचा असेल तर कुठल्याच मराठी भाषिकासाठी हा वापरला जाउ नये असे नाही का वाटत?
"हीन अर्थ..."
तसे पाहिले तर 'घाटी' हा राज्याचा एक विशिष्ट सरळस्वच्छ असा भाग निदर्शक शब्द आहे. सह्याद्रीच्या कडेकपार्यात राहणारा 'देशी' माणूस. याला 'घाटवळ' असे इथे येणारे प्रवासी म्हणत. पण का कोण जाणे या घाटवळाला त्याच्या अडाणी राहण्यामुळे शिकल्यासवरलेल्यांनी नेहमी हीनतेचीच वागणूक दिली होती आणि साहजिकच कालौघात ती केमिस्ट्री 'घाटावर राहणारा माणूस म्हणजे अडाणीच' अशीच झाली व पुढे एकप्रकारे हे समीकरणच बनले....मग त्या स्थितीचे नामात रूपांतर झाले 'घाटी = अडाणी' इतपतच हीन दर्जा. [मानण्यावर आहे खरं तर....अडाणी म्हणजे 'वाचता लिहिता न येणारा' असा अर्थ आहे. विपरित परिस्थितीत अडाणी एखाद्या पंडितापेक्षा विलक्षण बुद्धी दाखवू शकतो..]
इन्द्रा
धन्यवाद इंद्रराज. कालौघात त्या शब्दाला असा अर्थ प्राप्त झाला हे समजले. पण आता लोक अडाणी राहिलेले नाहीत त्यामुळे पुन्हा कालौघात त्या शब्दाचा हीन अर्थ जावा म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.
"हीन अर्थ जावा म्हणून प्रयत्न केले पाहिजेत."
~~ बरोबर आहे, निरंजन. अमेरिका आणि युरोपच्या बर्याच देशात एकजात आफ्रिकन वंशाच्या लोकांना 'नीग्रो' असे नामाधिमान होते. युरोपच्या इतिहासाची १५/१६ व्या शतकातील पाने चाळली तर दिसून येईल की, स्पेन आणि पोर्तुगिजांना (जे नामवंत असे दर्यावर्दी होते त्या काळात..) त्यांच्याकडील हबशी गुलामांसाठी सामुदायिकपणे (कलेक्टिव्हली) बोलाविण्याचे नीग्रो हे 'नाम' होते. 'नीग्रो' हा मूळचा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ 'काळा' [तसेच 'अंधार'] असा आहे. बदलत्या काळानुसार पुढे ज्यावेळी हे 'गुलाम' समुद्रीसाहसे सोडून पोटापाण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत स्थलांतरीत होऊ लागले त्यावेळी त्यांच्याबरोबर 'नीग्रो' हे नावही मागे जावून चिकटले. सुरूवातीच्या काळात गोर्यांनी यांचा आपापल्या राष्ट्रात 'गुलाम' म्हणूनच उपयोग केला. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच [शिक्षणामुळे, तसेच सामाजिक स्तरावरील अन्यायाप्रती चिडीने...] नीग्रो समुदायात चांगलीच जागृती आणि प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि त्यांनी एकजुटीने अमेरिकेत ['केकेके' च्या विरोधाला तोंड देवून] 'नीग्रो' शब्दाच्या वापरावर बंदी आणण्यासाठी जोमाने प्रयत्न केले आणि शेवटी तिथे कायद्यात दुरुस्ती करण्यात येऊन अमेरिकेतील आफ्रिकन वंशाच्या समाजाला नीग्रो असे न संबोधता 'ब्लॅक' असे म्हटले गेले. पुढेतर काही नेत्यांनी 'ब्लॅक' च्या ऐवजी 'कलर्ड पीपल' असा बदल सुचविला आणि सद्या या लोकांचा असाच तिथे उल्लेख केला जातो.
ही आहे एकजुटीची लक्षणे आणि हीनतेविरूध्दचा विजय. इथे महाराष्ट्राच्या त्या 'घाटी' लोकांना प्रथम आपला असा झालेला उल्लेख "हीन दर्जाचा" आहे असे वाटणे महत्वाचे आहे. जे घाणेरडे हिंदी चित्रपट आणि त्यापेक्षा गटारात फेकून द्यायच्या हिंदी मालिका आमची 'मराठी माणूस' मिटक्या चाटत पाहतो त्या प्रत्येकात घरातील नोकर आणि कामवाली "बाई" ही जाणीवपूर्वक 'महाराष्ट्रीयन'च दाखविली जाते. 'अरे ! वो कामवाली बाई आज नही आई..." असे ती दहा किलोचे रोंगण तोंडाला फासलेली नायिका किंवा तिची त्यापेक्षा एक किलो जादा रंगलेली मम्मी म्हणते, त्याचवेळी नऊवारी लुगडे नेसलेली लगबगीने आत प्रवेश करणारी 'घाटण' दाखवायची आणि तिच्या तोंडून ते टिपिकल हिन्दी-मराठी हेल..."ऐसा क्या बोल्ते ओ बाईसाब...ये क्या मै आयीच अब्बी..!"
मराठी चित्रपटसृष्टीत 'राजा' सारखे स्थान आणि लोकप्रियता मिळविणारे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ज्यावेळी हिंदी चित्रपटातील स्वयंपाक्याची, ड्रायव्हरची, फालतु नायिकेच्या येड्या मामाची, नायकाच्या उल्लू मित्राची कामे आनंदाने स्वीकारतात आणि जाणीवपूर्वक 'घाटी' ला हीनत्व आणतात, त्यावेळी इतरांकडून काय अपेक्षा करायची? पैशापुढे शून्य आहेत बाकीच्या गोष्टी यांना.
कितीजणांना खटकते हे डिस्क्रिमिनेशन ?
इन्द्रा
अतिशय सहमत आहे. नोकर नेहमी मराठीच दाखवला/ली जातो/ते याचा मला भयंकर राग येतो.
एका मालिकेतला एक प्रसंग चुकून पाहण्यात आला आणि माझ्या अंगाचा भयंकर तिळपापड झालेला मला अजूनही आठवतोय.
त्या प्रसंगात एक उच्चभ्रू लोकांची कॉश्च्यूम पार्टी दाखवली होती. सगळे लोक चान चान वस्त्रं नेसून आलेले वगैरे आणि त्या पार्टीत एक घरंदाज आणि कुलीन अशी स्त्री (रोहिणी हट्टंगडी) नऊवारी पातळ नेसून आणि दागिन्यांनी मढून जाते, तर त्या यजमानीण बाई आणि त्यांची चौकडी तिची नोकरांचा वेष करून आली म्हणून टिंगल आणि अपमान करतात असं दाखवलं.
पण या वृत्तीमागे त्या (म्हणजे उत्तरेतल्या) लोकांचा न्यूनगंडच आहे असा मला दाट संशय आहे. मोगलांनाच आपले राजे समजणार्या त्या गुलामांची मराठ्यांनी केलेली ससेहोलपट पिढ्या न पिढ्या त्यांच्या अंतर्मनात आकस निर्माण करत आली असावी असं मला वाटतं. त्यातूनच मराठे म्हणजे लुटारू, असंस्कृत असं पसरवायला सुरुवात झाली असावी.
अर्थात हे हळू हळू का होईना बदलतं आहे.
कलाकारांचंच उदाहरण घ्यायचं तर श्रेयस तळपदे, अतुल कुलकर्णी आणि रितेश देशमुख सारखे लोक आता मुख्य भूमिकांमध्ये दिसू लागलेत. आशुतोष गोवारीकरसारखे दिग्दर्शक चांगलं नाव मिळवून आहेत.
पूर्वग्रह असणे व पुन्हा तश्या भुमीका केल्याने बसणारा शिक्का यावर एका मुस्लीम अभिनेत्याचे भाष्य
सात मिनिटे २० सेकंदानी पहा. अर्थात संपूर्ण क्लीप विनोदी आहे. लुटा लुत्फ!
मला वाटते की असे होऊ नये. घरमालकाची भूमिकाही समजू शकतो. समजा कुणी अतिरेकी निघालाच तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागायचा. अगदी सुशिक्षित, नोकरीदार, कुटुंबवत्सल वाटणारा मुसलमान अतिरेकी निघू शकतो.
पण यामुळे मध्यममार्गी मुस्लिम उरलेल्या समाजात पुरेसा मिसळू शकत नाही. एक आपल्याच लोकांचे कोंडाळे करुन ते रहातात. मग त्यात समाजसुधारणा, अन्य गटांशी तुलना वगैरे होत नाही. मुस्लिम बायकांना आपल्या दुय्यम स्थानाची कल्पना येत नाही. त्यामुळे त्यांचे धर्मांधपण अधिकच वाढते. बहुतांश मुस्लिम स्थानिक भाषा न बोलता मोडकी तोडकी उर्दू बोलतात.
पण एकंदरीत हे विभक्तपण समाजाच्या हिताचे नाही.
सहमत आहे. केवळ धर्मच नाही तर वर उल्लेखलेल्या पंथांमध्ये,विशिष्ट जातींमध्ये वेगळेपणाची भावना देशभर दिसून येते.जात,भाषा,धर्म्,पंथ अशा सर्वच बाबतीत स्वतःचे वेगळेपण दाखवून द्यायची चढाओढ सर्वत्र दिसून येते. मग आरक्षण असो,ऑनलाइन विवाह स्थळ असो, ऑर्कुटवरील ग्रूप्स असो वा ट्रॅडिशनल्/एथनिक डे वा परदेशातील <राज्याचे नाव> मंडळ.
मुस्लिम लोक शेजारी असणे हि एक खूप मोठी कटकट असते.
त्यात मस्जिद शेजारी असणे म्हणजे खूप त्रास होतो आजूबाजूच्या लोकांना.(तसा तो गणपतीच्या उत्सवाने देखील होईल असे म्हणारे देखील आहेतच). त्यांचा सर्वात वाईट तो त्यांचा धर्मवेडेपणा, हा जरा घातकी स्वरूपाचा असतो. ह्यांच्यात खुद्द भावा-भावामध्ये अक्षरशः जीवघेण्या मारामार्या होतात हे डोळ्यांनी पहिले आहे. कोनिठी गोस्ष्ट डोके थंड ठून ऐकत नाहीत कि त्यावर विचार करत नाहीत.
ह्याला अपवाद आहेतच
नुकतेच पुण्याच्या CAMP भागात आमचे (family डॉक्टर) एक हकीम गृहस्थ वारले.
खूप चांगले होते ते, हजारो औषधी वनस्पती आणि जडी बुटींचा अभ्यास होता त्यांचा. केवळ ५-१० रुपयांत बरे करायचे ते रोग्याला.
"मुस्लिम लोक शेजारी असणे हि एक खूप मोठी कटकट असते.
त्यात मस्जिद शेजारी असणे म्हणजे खूप त्रास होतो आजूबाजूच्या लोकांना...."
~~ या आक्षेपाला उत्तर देण्याचा मोह होत होता, पण त्याचवेळी श्री.गांधीवादी यांची पुढील कबुली वाचली..
"ह्याला अपवाद आहेतच..."
मी यावरच लिहिण्याच्या बेतात होतो....पण आता राहु दे.
(जाताजाता >> वरील प्रतिसादातील श्री.गांधीवादी यांची भाषामांडणी आणि विचारातील सौम्यपणा उल्हासदायक वाटला.)
इन्द्रा
>>गांधीवादी गांधीवाद झुगारणार|
म्हणजे नक्की काय हो ?
अवांतर :
तुम्हाला स्वातंत्र्य काय गांधीवाद केल्यामुळे मिळालेले आहे, असे वाटते का ?
तो जर अगोदरच झुगारणारला गेला असता तर कदाचित इतिहास वेगळा असला असता.(असे आमचे मत आहे)
नमस्कार मंडळी,
मुस्लीम व्यक्तीना घरे देण्यास बरेच ठिकाणी नकार मिळतो हि वस्तुस्थीती आहे. असे का होते? या विषयावर चर्चा झाली असती तर जास्त आवडले असते.
या समाजावरील विश्वास उडाला आहे का?
या लोकांचे रहाणीमान समाजाला आवडत नाही का?
हा समाज धोकादायक आहे का?
काही लोकांमुळे सर्व समाज बदनाम होत असेल तर समाजातील बाकींच्या लोकांची जबाबदारी वाढते. त्यांनी आपल्या समाजाबद्दल विश्वास वाढवला पाहीजे.
बेंगलोरमध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली.
नव्वदीच्या दशकांत जम्मु काश्मीर मधल्या मुसलमानांनी बेंगलोरमध्यल्या जमीनी खरेदी केल्या.मी राहतो तो बी.टी.एम भाग (विशेषतः बी.टी.एम १ स्टेज)हा मुस्लिमबहुल आहे.काही दिवसांपूर्वी घर खरेदी करण्यासाठी एक दोन ठिकाणी भेट दिली असता कळले की त्या जमीनीही मुस्लिमांच्याच आहेत.राहुन राहुन आश्चर्य वाटते की इतक्या दूरदृष्टीने एवढ्या मुस्लिमांनी बेंगलोरमध्येच जागा खरेदी करण्याचा निर्णय कसा काय घेतला असेल.?
माझा घरमालक मुस्लिम आहे.बोलायला चालायला ठिक आहे पण घराच्या मेन्टेनन्ससाठी एकही पैसा खर्च करत नाही.
या धाग्याला "संस्कृती" या सदराखाली आणणल्याबद्दल निषेध.
यात संस्कृतीचा प्रश्ण आला कोठे?
आता
.इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि.....
तुम्हाला आज नवीन विषय सापडला नाही का? म्हणून तुम्ही शिळ्या कढीला उत आणत आहात.
त्यापेक्षा कुस्तीच्या जागतीक अजींक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण-या "सुशीलकुमार"च्या अभीनंदनाचा किंवा क्रिडामंत्र्यांनी सतपालचा अपमान केला का? असा धागा टाक़ला असता तर चालले असते.
राहुन राहुन आश्चर्य वाटते की इतक्या दूरदृष्टीने एवढ्या मुस्लिमांनी बेंगलोरमध्येच जागा खरेदी करण्याचा निर्णय कसा काय घेतला असेल.?
कारण कर्नाटकात जातिय्,धार्मिक तणाव ईतर राज्यांच्या मानाने कमी आहेत्(होते).शिवाय बी.टी.एम. भाग त्यावेळी शहरी भागाच्या तुलनेत खूपच स्वस्त होता.मुंबईत ६/७ लाखाला १ बी एच के, बेंगलोरमध्ये शहरात ३ ते ३.५ लाख,बी टी.एम मध्ये आणखी कमी असे त्यावेळी(९०च्या दशकात) होते.
अवांतर-तसे मल्लेश्वरम,राजाजी नगर परिसरात मराठी बरेच आहेत.१५० वर्षापूर्वीच दूरदृष्टीने इथे आलेले!
गांधीवादी बोलले ते खरच आहे.
काही वर्षातच हिंदूं अल्पसंख्याक होणार आहेत. काळजी नसावी
घर भाड्याने देण्याच म्हणाल तर मालकानो एखादा बाटगा असेल तर त्यला भाड्याने जागाच कय सायकल सुद्दा देउ नका.
>>मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात.. यात अनेक शिकलेल्या घर मालकांचा हि लोकांचा पण भरणा आहे.
>>.इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि.....
>>यावर मार्ग काय?
>>नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय??
प्रस्तुत लेखकाच्या जिवाला बहुदा खूप त्रास होतोय हे वाचून डोळे भरून आले.
माणुसकी माणुसकी कुठे असेल... तर ही पहा.
आज माझे डोळे पावन झाले.
तिच्च्यायला,
ज्याचं घर असेल त्यानं ते कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा सर्वस्वी त्या त्या मालकाचा निर्णय.
आता ह्यात तुम्ही आम्ही बोंबलणारे कोण? काय संबंध?
आता ज्या मालक लोकांना 'अमुक अमुक माणुस्/कुटुंब माझ्या जागेत रहायला नालायक आहे' किंवा 'कुठं तिच्यायला फुकटची कटकट मागे लाऊन घ्या! असं वाटत असेल तर त्यांना नाकारण्याचा हक्क नाही? आता कुठं गेलं ते तुमचं तथाकथीत 'व्यक्तीस्वातंत्र्य'?
मला तर कधीकधी प्रश्नच पडतो, काही काही (कागदोपत्री हिंदू) लोकांना काय पाकिस्तानातल्या मशिदींकडुन ज़कातीची खैरात मिळते की काय. बघावं तेव्हा परधार्जिणी वृत्ती!
श्री धमु, छान प्रतिसाद.
असो... मुघलांनी महाराजांचे काही अभेद्य गड/किल्ले फार लढाई न करता जिंकले होते.
मुलांनो, ओळखापाहू कुणी मुघलांना मदत केली ??
बरोबर उत्तर देण्याराला मशिदीच्या पडोसच्या मोहल्ल्यात जागा फुकटात बक्षिश मिळेल.
प्रतिसाद संपादित केला आहे
संपादक मंडळ
>>ज्याचं घर असेल त्यानं ते कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा सर्वस्वी त्या त्या मालकाचा निर्णय.
सहमत आहे. जस्टिफिकेशन द्यायची गरज नाही. :)
[जस्टिफिकेशन म्हणून कारणे दिली आहेत ती अगदी तकलादू आहेत].
सर्वस्वी मालकाचा निर्णय? व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही घटनेचे उल्लंघन करू शकत नाही.
The Constitution prohibits discrimination on the basis of a person's race, sex, religion, place of birth, or social status
प्रतिक्रिया
अप्पाजोगळेकर
नितिन थत्ते
सार्वजनिक स्वच्छता या बाबत
मुसलमान लोकांचा कळवळा आहे वा
थत्ते काकांनी माझ्या
बकरे!
हे सर्वांचेच प्रश्न आहेत, मुस्लिमांना वेगळे काढण्याचे कारण नाही.
हो हो
माझ्या प्रतिक्रियांमुळे जर
कडवट चव राहाते
+१
+२
>>संयमीत शब्दात आपले म्हणणे
+१
जीवनाची पहिली १५ वर्षे
गांधीवादी...........
एकाद्या समुदायावर नाही,
घासकडवींशी सहमत
राजेश साहेब, हे असले देवी
अश्लाघ्य
जैनांच्या व गुजरमारवाड्याच्या
सरसकट मराठी भाषीकाला घाटी
घाटी या शब्दाचा हीन अर्थ काय
घाटी आणि हीन अर्थ
धन्यवाद इंद्रराज. कालौघात
पैशापुढे शून्य....
अतिशय सहमत आहे. नोकर नेहमी
स्टिरीओटाईप
लई भारी. धन्यु सहजभौ.
इन्द्रराज पवार ++. प्रांतभेद
हे ठीक नाही
सहमत
मुस्लिम लोक शेजारी असणे हि एक
पुन्हा तेच गुर्हाळ सुरु केलेत
अपवाद
मजा येणार
>>गांधीवादी गांधीवाद
मुस्लिमांना घर मिळत नाही. का?
+१
माझी पण तयारी आहे, प्रथम
बेंगलोरमध्ये एक आश्चर्यकारक
"संस्कृती"??????????????
तुलनेने
गांधीवादी बोलले
डोळे भरून आले.
आँ?
छान प्रतिसाद.
धन्यवाद.
+१
घटना