 |
|
सध्या वैश्विक तापवृद्धी हा बरेच चर्चेत असणारा विषय आहे. ह्यावर चाललेल्या वाद विवादांमध्ये साधारणपणे दोन गट असतात. एक म्हणजे बहुतांश शास्त्रज्ञांचा गट ज्यांच्या मते वैश्चिक तापवृद्धी ही मोठी समस्या आहे तर दुसरा गट आहे वैश्विक तापवृद्धी ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे आणि त्याचे उगीचच स्तोम मानवले आहे असे मानणार्यांचा. ध्रुवीय बर्फ वितळत आहे, समुद्राचे पाणी अधिक ऍसिडीक बनत चालले असून काही दुर्मिळ प्रवाळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, ह्या गोष्टी आता सिद्ध झाल्या आहेत त्यामूळे मी ह्या वाद विवादामध्ये मला पहिल्या गटात समजतो. पण नुकतेच टी.व्ही. वरील एका कर्यक्रमात बियॉन लॉमबर्ग ह्या अर्थशास्त्रज्ञाची मुलाखत पाहीली आणि एक वेगळाच दृष्टीकोन आणि विचार ऐकायला मिळाले जे मुलाखतकाराला पटले नसले तरी मला मात्र पटले.
असे काय आहेत लॉमबर्ग ह्यांचे विचार?
लॉमबर्ग ह्यांनी हे सगळे विचार 'कूल ईट' ह्या पुस्तकात सविस्तर मांडले आहेत मी ते पुस्तक वाचलेले नसले तरी वर उल्लेखलेल्या मुलाखतीतुन मला कळलेले त्यांचे विचार येथे देतो :-
वैश्विक तापवृद्धी ही समस्या आहे ह्याचा नकार त्यांनी केलेला नाही. पण ही समस्या सोडवण्यासाठी सध्या जो अतिरेक केला जातो आहे तो त्यांच्या मते चुकिचा आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी मांडलेला 'क्योटो प्रोटॉकॉल' हा अंमलात आणण्यासाठी अतिशय खर्चिक आहे. त्यावर पैसा खर्च करण्याऐवजी पर्यायी इंधनाचे स्रोत (उदा. सूर्य उर्जा) हे अश्म इंधनाला स्पर्धा करू शकतील अश्या स्वस्त दरात उपलब्ध होण्यासाठी त्यावरील संशोधनावर करणे जास्त गरजेचे आहे. कारण कार्बन इमिशन मध्ये सध्या आघाडीवर असणारे देश म्हणजे चीन आणि भारत आहेत आणि ही दोनही राष्ट्रे विकसनशील आणि आर्थिक दृष्ट्या विकसीत देशांपेक्षा मागे आहेत. त्यामुळे कॅलीफॉरनियातील निवडक श्रीमंत लोकांनी सोलर पॅनेल बसवून त्याचा फायदा काहीच होणार नाही . जाणवण्या इतपत बदल तेव्हाच घडून येईल जेव्हा भारत आणि चीन मधील सामन्य माणूस ह्यांचा वापर करू लागेल. आणि हे तेव्हाच शक्य होइल जेव्हा पर्यायी इंधनचा उपाय हा अश्म इंधना इतकाच अथवा त्याहुन अधिक किफायतशीर असेल.
तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का?
मंडळी मलातर बॉ ह्या लॉमबर्ग साहेबाचे विचार पटले. आपल्याला काय वाटते?
- वरूण
प्रतिक्रिया
संतुलन
संतुलित
In reply to संतुलन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कॉग्निटिव्ह डिझोनन्स
In reply to संतुलित by नंदन
संतुलन
In reply to संतुलन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सारांश
In reply to संतुलन by कोलबेर
दुसर्या टोकाचे एक उदाहरण
In reply to सारांश by विकास
काही विचार
पर्यावरण : एक गंभीर विषय
In reply to काही विचार by विकास
समुद्राची पातळी
In reply to पर्यावरण : एक गंभीर विषय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद -- सोशल सर्च
In reply to समुद्राची पातळी by विकास
सोशल सर्च - भाग २
In reply to धन्यवाद -- सोशल सर्च by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सोशल सर्च - भाग ३
In reply to सोशल सर्च - भाग २ by विकास
हा हा हा !!
In reply to सोशल सर्च - भाग ३ by सहज
मूज हेड्स..
In reply to हा हा हा !! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
विनोद नाही
In reply to मूज हेड्स.. by कोलबेर
हम्म..
In reply to विनोद नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अवांतरः योगायोग ?
In reply to सोशल सर्च - भाग २ by विकास
योगायोग नसावा...
In reply to अवांतरः योगायोग ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
>>समजा
In reply to पर्यावरण : एक गंभीर विषय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
दृश्य-अदृश्य
In reply to >>समजा by कोलबेर
प्रायोरिटायझेशन
In reply to काही विचार by विकास
भारत आणि चीन
In reply to काही विचार by विकास
अस कोणी म्हणलयं?
In reply to भारत आणि चीन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हे देखिल प्रदूषण???