✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ते वास्तवाच्याजवळच हॉटेल.

श
शानबा५१२ यांनी
Tue, 09/14/2010 - 22:59  ·  लेख
लेख
नमस्कार,नमस्कार........ "गुडांग गरम है क्या?" "नही आगे की दुकान पे मिलेगा" पुढेही तेच उत्तर..त्या पुढे गेलो.आजुबाजुला परीस्थीती,ठीकाण 'बत्त से बत्तर '(?) होत चालल होत.पण सिगरेट पियायची म्हणजे पियायची. सिगरेट मिळाली.बसुन पियु,कशाला चाला जेवल्यानंतर,रीक्षा पण आहेत. बस्स..............मग हे गेल्या काही दीवसांपासुन चालु आहे,जेवा व चाला यात्रेवर.........लांब..........सिगरेट पियायला. तिथल्या एका हॉटेलने वास्तवाच्या खुप जवळ आणल.ते हे सर्व आठवल की खाता खाता घास हातात राहायचा.कधी कधी बस करुन तसाच उठायचो,कधी नाश्ताचा पदार्थ जेवण म्हणुन खायचो.....असेच काहातरी करतो.................का? कारण............. 'तिथे' माणसे येतात,कीमतीच्या फळ्याकडे बघुन जेवणाचा पदार्थ मागवतात.मग कधीतरी कमी कीमतीचा पदार्थ ऑर्डर दील्याच्यानंतर नजरेत येतो.मग २-४ रुपये वाचवण्यासाठी ऑर्डर कॅन्सल करायला भांडताना त्या माणसांचा चेहरा रडकुंडीला येतो. 'तिथे' माणसे येतात्,जी पहीले जेवतात.मग पैसे कमी आहेत,सांगुन कमी पैसे घेताना हाडतुड करणा-या मालकाला हात जोडतात."आज जाउ दे,उद्या नक्की देईन,आज पैसे नाहीत" अस काहीतरी म्हणतात."पैसे नाहीत मग जेवतोस कशाला?" हॉटेल मालक ओरडुन प्रश्न विचारतो. 'तिथे' माणसे येतात.मालक "बेशरम हो क्या?" अस बोलतो,ते सर्व जेवण झाल्यावर ऐकुन घेतात कारण महीन्याची उधारी बाकी असते.मग हॉटेलमधुन जाताना मान खाली घालुन जातात. 'तिथे' माणसे येतात.रोज फक्त आणि फक्त 'डाल राईस' खातात,त्यांना कीमतीच्या फळ्याकडे बघायच नसत.कारण 'डाल राईस'पेक्षा कमी काहीच नाही.हाफ ९ रुपये,फुल १४ रुपये.मालक हीशोबाला चुकल्याचा फायदा घेतात,रोज फुल्ल्ल खातात..........पोट भरुन............मन काय भरतच! 'तिथे' माणसे येतात.बाजुच्या माणसाला बघुनच बाकावर बसतात.कारण बाजुचा काम करुन घाणेरडे झालेले कपडे घातलेला असला तरच शिव्या पडणार नाहीत.हात फक्त जेवणानंतर धुतात.हातावर पाणी ओततात,हातावरचे अन्न जायला,दुसरे काळे,तांबडे डाग जाण्याची वाट बघत नाहीत. 'तिथे' माणसे येतात.वरच्या खिशात रुपया वाचेल तेवढेच जेवण मागवात,ऑर्डर दील्यावरही खिसा तपासतात,कारण जेवल्यानंतर धुम्रपाण हव असत. 'तिथे' माणसे येतात.दुस-या माणसाचा चमचमीत दीसणारा पदार्थ न्याहाळतात.मग हळुच वेटरला त्या पदार्थाची कींमत विचारतात.कींमत ऐकयानंतर जबरदस्तीने हसल्यासारखे करुन पुन्हा त्या माणसाकडे बघत नाहीत. 'तिथे माणसे येतात.बायकांना व पोरांना जेवायला द्यायला.बायको व नवरा दोन ताटाचे तीन करतात.पोरगा खातो,अजुन भुक लागेल म्हणुन त्याला पाणी पाजल जात. 'तिथे' माणस येतात.तहान लागली म्हणुन छोट्या पोरांना पाणी पाजायला.मोठा पोरगा लहान बहीणीला पाणी देतो.पोरगी घाईने घेतो.पण वेडी तोंड लावते.मालक " हे बाहर निकल!" म्हणुन जोरात कींचाळतो.बाप मालकाला "थांबा थांबा" असा हात दाखवतो.वेडी छोटी ग्लासा़कडे बघत असते,तहान भागली नाही म्हणुन. 'तिथे' माणसे येतात.ज्यांच्या बायका हॉटेलच्या काउंटरवर येउन एखाद्या पदार्थाची कींमत विचारतात.मग थोड्या बाजुला जातात,अंग झाकण्यासाठी घातलेल्या मळकट ब्लाउजात हात घालतात,पैसे मोजतात.मग परत येउन दुस-या पदार्थाची कींमत विचारतात. . . . . . . . . . . . तिथेच बाजुला रोज चालुन घाम आला म्हणुन सारखा पांढ-या शुभ्र रुमालाने तोंड पुसणारा एक कोणीतरी उभा असतो.शुभ्र कपडे व चमकणारे बुट घातलेला कोण म्हणुन ती माणसे त्याला बघतात.तो ओळख असल्यासारखा आपुलकीने हसतो,हसरा चेहरा दीसेल ह्या प्रतिक्षेत..............पण त्या माणसांना 'आपली खिल्ली उडवुन हसतोय' असे वाटते व ते पडलेले तोंड खाली मान घालुन त्या हॉटेलात लपवतात. "माफ कर दो साब" अस म्हणतात जेव्हा त्यांच्या कपड्यांचा स्पर्ष झाल्याने त्या सिगरेट पिणा-याच्या शर्टाला डाग पडतात.तो हसतो,हसुन "चलेगा सर" अस म्हणतो.पुन्हा त्या माणसांचा चेहरा पडतो,ह्याने खिल्ली उडवली म्हणुन. . . . म्हणुन आता 'तो' लांबच बसतो.कधीतरी सिगरेट पितो व चहा पियायला त्याच्यात जाउन उभा राहतो.त्यांच्या गप्पाचा आनंद घेत.ती माणसे तेव्हा जपुन बोलतात्,हा खिली उडवेल म्हणुन. . . . . . .. त्यांना काय माहीती हा एवढा लांब फक्त सिगरेटसाठी नाही येत,'काहीतरी नवीन' शिकायला येतो.
  • रुपांगी ज्योतिष -केशसंभार

Book traversal links for ते वास्तवाच्याजवळच हॉटेल.

  • रुपांगी ज्योतिष -केशसंभार ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7883 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

मस्त..

चिगो
Tue, 09/14/2010 - 23:10 नवीन
जास्त बोजड शब्दात बोलत नाही, पण नेहमीच दिसणार्‍या दृश्याला नवीन अँगलनी दाखवल्याबद्दल धन्यवाद... बाकी आहेच, वास्तववादी दर्शन वगैरे.. छान..
  • Log in or register to post comments

छान

विलासराव
Tue, 09/14/2010 - 23:25 नवीन
मस्तच लिहिलय हो शानबा.
  • Log in or register to post comments

चांगलं लेखन....

राजेश घासकडवी
Wed, 09/15/2010 - 01:52 नवीन
काहीसं भावूक झालंय, पण मी तो दोष म्हणून सांगत नाही. असंच लिहीत राहा. तिथल्या काही माणसांना आणखीन ठसठशीत चेहेरे दिले तर नुसत्याच पार्श्वभूमीवर पांढऱ्या शर्टातला माणूस उठून दिसण्याऐवजी अधिक पोत निर्माण होईल.
  • Log in or register to post comments

लाचारी, दु:ख, भूक, व्यसन,

शुचि
Wed, 09/15/2010 - 02:18 नवीन
लाचारी, दु:ख, भूक, व्यसन, अजीजी - गरीबीचे अनेक चेहेरे समर्पक रीतीने दाखवले आहेत एवढ्याशा लेखातून. असं वाटलं आरसा खळकन फुटला आणि विद्रूप प्रतिबिंब प्रत्येक काचेत दिसू लागलं. गरीबीसारखा शाप नाही.
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव वर्णन केला शानबा

पाषाणभेद
Wed, 09/15/2010 - 02:39 नवीन
मस्त अनुभव वर्णन केला शानबा
  • Log in or register to post comments

छान रे शानबा. आणखी सविस्तर

मेघवेडा
Wed, 09/15/2010 - 03:04 नवीन
छान रे शानबा. आणखी सविस्तर लिही.
  • Log in or register to post comments

छान निरीक्षण..

अथांग
Wed, 09/15/2010 - 06:17 नवीन
उत्तम मांडणी !
  • Log in or register to post comments

मस्तच रे

गोगोल
Wed, 09/15/2010 - 06:50 नवीन
खुपच छान.
  • Log in or register to post comments

छान लिहले आहेस रे...

मदनबाण
Wed, 09/15/2010 - 07:24 नवीन
छान लिहले आहेस रे...
  • Log in or register to post comments

छान

सहज
Wed, 09/15/2010 - 08:21 नवीन
छान लिहले आहे.
  • Log in or register to post comments

मस्तंच!!!

मी ऋचा
Wed, 09/15/2010 - 10:20 नवीन
मस्तंच!!!
  • Log in or register to post comments

छान

प्रदीप
Wed, 09/15/2010 - 10:52 नवीन
पण थोडे जास्त भावूक. अजून थोडे अलिप्त (व म्हणून) जास्त परिणामकारक व्हावे. लिहीत रहा, आवडते आहे.
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Wed, 09/15/2010 - 16:55 नवीन
आवडले.. थेट मनातून कागदावर उतरलेल्याची मजा काही औरच असते असे काहि लिहित रहा.. वाचतो आहोतच
  • Log in or register to post comments

भेदक

गणेशा
Wed, 09/15/2010 - 19:59 नवीन
भेदक
  • Log in or register to post comments

सुरेख.

ज्ञानेश...
Wed, 09/15/2010 - 20:08 नवीन
लेख आवडला. भावना समजल्या.
  • Log in or register to post comments

छान लिहिलयस रे शानबा.

गणपा
Wed, 09/15/2010 - 20:18 नवीन
छान लिहिलयस रे शानबा.
  • Log in or register to post comments

वरील सर्वांशी सहमत

अनिल हटेला
Wed, 09/15/2010 - 20:24 नवीन
वरील सर्वांशी सहमत ......... वास्तवदर्शी लेख आवडला.... :-)
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

प्राजु
Wed, 09/15/2010 - 20:27 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासुन आभार. मला

शानबा५१२
Wed, 09/15/2010 - 21:28 नवीन
सर्वांचे मनापासुन आभार. मला लिहताना वाईट वाटल,तुम्हाला वाचताना वाटल असेल,बस्स संपल का? नाही,कोणीतरी काहीतरी कराव अगदी अल्प प्रमाणात,दुसा-याची पोटाची आग शमवुन,मदतीचा हात देउन जे समाधान मिळत,त्याच वर्णन नाही करता येणार. पण आजची भुक भागली तरी परत पोट बोंबा मारणारच्,म्हणुन मी ह्यांना रोजगार द्यावा हा विचार करतो पण तेवढी आपली ऐपत नाही.असो मला हा लेख वाचताना स्वःतालाच वाईट वाटत,सर्व पाहीलेल तसच्या तस डोळ्यासमोर येत. हां तर मानवतावादी बना,सेवा करा,तुम्ही खुप समाधानी व्हाल. जय हींद!
  • Log in or register to post comments

संवेदनशील लिखाण!

चतुरंग
Wed, 09/15/2010 - 21:57 नवीन
चांगलं लिहितो आहेस.
  • Log in or register to post comments

चांगला लेख. असेच लिहित

इंटरनेटस्नेही
Wed, 09/15/2010 - 23:06 नवीन
चांगला लेख. असेच लिहित राहा...
  • Log in or register to post comments

+१००००

सविता
गुरुवार, 09/16/2010 - 13:23 नवीन
असेच म्हणते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

सुश्या !! मस्त सेंटी मारलाय

सुहास..
गुरुवार, 09/16/2010 - 13:17 नवीन
सुश्या !! मस्त सेंटी मारलाय रे !!
  • Log in or register to post comments

सेंटी वगैरे जाऊ दे, ते बाजूला

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/16/2010 - 13:39 नवीन
सेंटी वगैरे जाऊ दे, ते बाजूला ठेवूनही एकच वाटले... असा शानबा५१२ नेहमी का नाही मिळत बघायला? बाकी वास्तव भेदक वगैरे आहेच. आपल्याला शक्य तेवढं करत जावं... अगदी लहान असताना भर दुपारी आईने काहीतरी आणायला सांगितले म्हणून दुकानात चाललो होतो. मे महिना. ऊन चांगलंच तापलेलं. एका झाडाखाली एक अगदी म्हातारे जोडपे बसले होते. हातात काही तरी खायचे होते, माझ्या कडे बघून त्या आजींनी अगदी वाकून नमस्कार करून पाणी मागितले प्यायला. तो क्षण अजूनही विसरलेलो नाही. परत घरी आलो, थोडं अन्न बांधून घेतलं. माठातलं गार पाणी घेतलं आणि त्यांना नेऊन दिलं.
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Fri, 09/17/2010 - 22:43 नवीन
>>असा शानबा५१२ नेहमी का नाही मिळत बघायला? असेच म्हणतो. वर्णन एकदम प्रत्ययकारी. तेही कमीतकमी शब्दात. चॅप्लिन आठवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खूप छान!

समीरसूर
Fri, 09/17/2010 - 10:19 नवीन
मस्त लिहिलं आहे. अगदी डोळ्यासमोर आलं हॉटेल! कधी काळी कॉलेजला असतांना रविवारी संध्याकाळी मेस बंद असायची म्हणून बाहेर खायला लागायचं. मग कुठल्यातरी स्वस्त हॉटेलात राईस प्लेट खायचो...तेव्हा पासून राईस प्लेट या संकल्पनेबद्दल राग आहे. तरूण वय, लागणारी भूक जास्त आणि जेवण लिमिटेड! या 'राईस प्लेट' प्रकाराचा खूप संताप यायचा..... --समीर
  • Log in or register to post comments

भावना पोचल्या, समजल्यादेखील !

विशाल कुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 10:34 नवीन
भावना पोचल्या, समजल्यादेखील ! लेख आवडला हे सांगणे नलगे :)
  • Log in or register to post comments

चित्रदर्शी

पैसा
Fri, 09/17/2010 - 10:41 नवीन
चित्रदर्शी वर्णन!
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा सर्वांचे

शानबा५१२
Sun, 12/05/2010 - 20:53 नवीन
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. जय हींद!
  • Log in or register to post comments

हा लेख आवडला.

शिल्पा ब
Sat, 09/18/2010 - 00:53 नवीन
हा लेख आवडला.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा