✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा.............

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 09/15/2010 - 21:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5437 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

मस्त डोळे मिटुन ऐकत होतो..

गणपा
Wed, 09/15/2010 - 21:36 नवीन
मस्त डोळे मिटुन ऐकत होतो.. खुप छान वाटल. धन्यवाद जयंतराव.
  • Log in or register to post comments

दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा

योगी९००
Wed, 09/15/2010 - 21:40 नवीन
दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा म्हणजे काय बुवा? बाकी गाणे खुप छान वाटले ऐकायला..धन्यवाद..
  • Log in or register to post comments

जुने गाणे

मीनल
Wed, 09/15/2010 - 21:42 नवीन
जुने गाणे कधीच ऐकले नव्हते. काही समजतच नव्हते तर काय ऐकणार ? आता समजावून घेउन ऐकले.
  • Log in or register to post comments

गा़लिब

विश्नापा
Wed, 09/15/2010 - 21:56 नवीन
गा़लिब हा उर्दू शायरांचा "पितामह" आहे.खूपच छान अनुवाद आहे. आदरणीय जयंतजी, पुढील शेर हा आपण दिलेल्या ग़झलमधीलच आहे काय? "एतबारे-इश्क की खा़ना-खराबी देखना, गै़र ने की आह्,लेकिन वो ख़फा मुझपर हुआ |
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Wed, 09/15/2010 - 22:06 नवीन
अरे ! मला आदरणीय वैगेरे म्हणून आपण मला लाजवताय ! असो. तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ इथेच मी एका लेखात दिला आहे त्याचा दुवा हा आहे. दिले नादा तुझे हुआ क्या है पहिल्याची कल्पना नाही. पण पाहिजेच असल्यास शोधता येईल. जयंत कुलकर्णी. मला आवडलेला अजून एक शेर आपणा सर्वांसाठी.... अंदेशा हर क़दम पे रहा ये अंदेशा पीछे क़ातील है या मेरा साया.... .........................जमील कलीमी. प्रत्येक पावलाला होती मनात हीच भिती मागे कोण आहे, मृत्यू का सावली............. जयंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्नापा

गा़लिब

विश्नापा
गुरुवार, 09/16/2010 - 21:07 नवीन
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "मिर्झा़ गा़लिब" नावाची मालिका आली होती. गुलजा़रचे दिग्दर्शन्,जगजितसिंगचा जादूभरा आवाज्,आणि नसिरुद्दीन शहाने जीव (आत्मा) ओतून उभा केलेला "गालि़ब" ...!! पण गालिब,प्रेमचंद सारख्या महान व्यक्तिंच्या जीवनाकडे पाहिल्यावर वाटते की यांना कोणता शाप असावा की या प्रतिभावंतांना हालाखीचे जीवन कंठावे लागले? कर्ज़ की पिते थे मै लेकिन समझते थे की हां, रंग लायेगी हमारी फा़का-मस्ती एक दिन | आणि हो तो दुसरा शेर आमची सिग्नेचर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

>> है ख़बर गर्म उनके आने की आज

शुचि
Wed, 09/15/2010 - 22:02 नवीन
>> है ख़बर गर्म उनके आने की आज ही घर में बोरिया न हुआ. >> सुंदर!! अप्रतिम!!! आपल्या प्रिय व्यक्तीचा पाहुणचार असा करू की तसा करू, तिच्यासाठी हे करू की ते करू असं होऊन जातं. जे करू ते अपूर्ण, कमी वाटतं. हे बहुधा युनिव्हर्सल ट्रुथ असावं. ही बेचैनी, हूरहूर, तगमग, कमतरतेची टोचणी किती सुंदर , साध्या शब्दात शब्दात मांडली आहे गालीब यांनी. मला तरी यीटस ची पुढील कविता नमूद केल्याशिवाय रहावत नाही - Had I the heavens' embroidered cloths, Enwrought with golden and silver light, The blue and the dim and the dark cloths Of night and light and the half-light, I would spread the cloths under your feet: But I, being poor, have only my dreams; I have spread my dreams under your feet; Tread softly because you tread on my dreams. मला या कवितेतील प्रकट केलेली गरीबीची भावना आणि गालीब यांनी व्यक्त केलेली कमतरतेची भावना अगदी सारख्या वाटतात. कुलकर्णी यांचे इतक्या सुंदर रसग्रहणाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

Tread softly because you tread on my dreams.

चिंतामणराव
गुरुवार, 09/16/2010 - 14:27 नवीन
वा, खुप छान. गरीब प्रेमिकाची अगतिकता, असहाय्यता किती छान व्यक्त झाली आहे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

"....वो अगर चाहे तो फिर क्या चाहिए ?"

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 09/16/2010 - 00:11 नवीन
"ज़ख्म गर दब गया लहू ना थमा काम गर रुक गया रवा ना हुआ." ~~ किती सधन आहे हा भाव....जखमा उघड्या होऊन वाहत्या झाल्या आहेत, पण जरी त्या तशा झाल्या असल्या तरी त्यातील दर्द इतके तीव्र आहे की, वाहून गेल्यानंतरही पाट कोरडा पडला नसून ती तीव्र वेदना अजूनही ठसठसतच आहे....एकेकाळी 'दो आरजू मे गये, दो इंतेजार मे...' असं कुणी म्हणत असे, आणि ज्यावेळी चमनमध्ये बुलबुल प्रवेशीता झाली....त्यावेळी अख्तरी फैजाबादी गुणगुणायची ::: "निहुरे निहुरे बहोरे अंगनवा कंगना पगन गोरिया अंगना बुहारे झुकि झुकि देखे नयनवां...." या मनमोहिनेतूनच मग गालिबने म्हटले असेल.... "है ख़बर गर्म उनके आने की आज ही घर में बोरिया न हुआ." उगवत्या सूर्यासमवेत जगण्यासाठी उठणे आणि वार्‍याच्या मंद झुळकीसोबत जगणे यात मुलभूत फरक काय असेल तर सूर्य एका दिवसाचा आश्वासक आहे तर वारा तुम्हाली त्या झुळकीसमवेत गालिब देतो, बेगम देतो, रफी देतो....आणि त्याबरोबरच एक विलक्षण अशी कासावीस करणारी तहान....ती तहान शमन्यासाठी दुसरे अन्य कुठले औषध नाही....आहे ती गालिबची जादू.....आणि मग असा गालिब ज्यावेळी म्हणतो : "कुछ तो पढ़िये के लोग कहते है आज ग़ालिब ग़ज़ल सरा ना हुआ." ~~~ "तिला आता माझ्या ह्रदयात जागा राहिली नाही. तिने इथला मुक्काम हलवला आहे...." असेलही...पण शतकानंतरही गालिबच्या जादूचा मुक्काम आपल्या हृदयातून हलणार नाही, ही बाब आज श्री.जयंत कुलकर्णी यांच्या या अतिशय भावुक अशा लेखाने पुन्हा एकदा अधोरेखीत केली आहे. धन्यवाद....वाचनाच्या एका सुंदर अनुभवासाठी. [कधीतरी तलतवरदेखील लिहा....खूप आवडेल....कित्येकांना] इन्द्रा
  • Log in or register to post comments

लताबाईंनी गायलेले :

मुक्तसुनीत
गुरुवार, 09/16/2010 - 09:18 नवीन
लताबाईंनी गायलेले : http://www.youtube.com/watch?v=1WmJH5DcxL0
  • Log in or register to post comments

क्या वो नमरूद की खुदाई थी

नंदू
गुरुवार, 09/16/2010 - 09:47 नवीन
क्या वो नमरूद की खुदाई थी बंदगी मे मेरा भला ना हुआ.
हा मझा अत्यंत आवडता शेर आहे. नमरूद राजाचा उल्लेख बायबल मध्ये आहे. नमरूदाने देवांच्या विरोधात बंड केलं होतं. नंतर त्याने स्वतःलाच देव घोषित केलं आणि त्याच्याच पूजेचं बंधन घातलं. अर्थातच त्याच्या पश्चात लोक त्याला विसरले. अशा या नमरूदचा दाखला देत गालिब म्हणतो, काय त्या नमरूद्चं पण देवपण होतं ? इथे ईश्वराची भक्तिकरूनपण मझी ही अवस्था आहे. बाकी लेख आवडला. लुत्फ उठवतोय. :)
  • Log in or register to post comments

सुंदर भावार्थ

गणेशा
गुरुवार, 09/16/2010 - 13:23 नवीन
सुंदर भावार्थ
  • Log in or register to post comments

क्या बात है!! मीही लुत्फ उठवतोय!!

स्वानंद मारुलकर
गुरुवार, 09/16/2010 - 13:39 नवीन
मै ना अच्छा हुआ, बुरा न हुआ. यावरून, साहीर चा शेर आठवला ग़म और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ मैं दिल को उस मुक़ाम पे लाता चला गया
  • Log in or register to post comments

एक शंका

मुक्तसुनीत
गुरुवार, 09/16/2010 - 21:30 नवीन
दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा या ओळींचा अर्थ प्रस्तावलेखकाने मांडला आहे : माझ्या वेदनांवर औषध देऊन माझ्यावर उपकार कर म्हणून मी कळवळून सांगतोय पण नाही मिळाले ! इथे थोडी गल्लत होते आहे असे वाटले. "दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा" चा अर्थ, "औषधरूपी विनवण्यांना दु:खाने बिलकुल दाद दिली नाही" असा अतिशय काव्यमय आहे. एखाद्या कठोर माणसाला दादापुता करावे तसे माझ्या दु:खाच्या मी विनवण्या करतो आहे. पण छे ! माझ्या दु:खाचे कमी होण्याचे काही चिन्ह नाही. माझे चुकत असल्यास आधीच कान पकडतो. पण मला आठवणारा अर्थ असा आहे. येथे अतिशय सुरेख विवरण आहे : http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ghalib/026/26_01.html
  • Log in or register to post comments

दूवा

विश्नापा
गुरुवार, 09/16/2010 - 22:29 नवीन
खूपच छान दुवा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

असेच म्हणतो

धनंजय
Fri, 09/17/2010 - 03:07 नवीन
दुव्यातले विवरण वाचून समजायला मदत झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्नापा

हा दुवा माहीत होता. हे

जयंत कुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 10:35 नवीन
:-) हा दुवा माहीत होता. हे लिहायच्या अगोदर हे कसे वाचायचे राहिले कोणास ठाऊक. त्यातील Bekhud Dihlavi: If I had become well, then the pain of my passion would have been forced to be under an obligation toward medicine, and I didn't want to be indebted to anybody. For this reason, it turned out well that I didn't get well [achchhaa hii hu))aa kih mai;N achchhaa nah hu))aa हे मला जास्त पटले. कान धरायला हवेत मी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

गालिब चे इतके शेर एकत्र वाचून

काव्यवेडी
Fri, 09/17/2010 - 13:18 नवीन
गालिब चे इतके शेर एकत्र वाचून खूप समाधान वाटले. मजा आली. धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

गा़लिब

विश्नापा
Sun, 09/19/2010 - 00:00 नवीन
गा़लिबच्या काव्यामध्ये हिंदू तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आढळते.. एक शेर- "न था कुछ तो खु़दा था,कुछ न होता तो खु़दा होता, डुबोया मुझको होनेने,न होता मैं तो क्या होता |" वेदांमध्येही अशाच ओळी आहेत..मूळ संस्कृतमधील ओळी आता आठवत नाहीत..पण दूरदर्शनवर "भारत एक खोज" नावाची मालिका होती.तिच्यात सुरुवातीला त्या मूळ संस्कृतमधील ओळींचा हिंदी अनुवाद शीर्षक गीतामध्ये होता तो असा-- " सृष्टी से पहले कुछ नही था,सत् भी नही,असत् भी नही "... गा़लिबलाही तेच सांगायचयं...की ही सृष्टी नव्हती तेव्हाही हा परमेश्वर होता,आणि जेव्हा ही दुनिया नसेल तेव्हाही तो असणारचं..... डुबोया मुझको होनेने,न होता मैं तो क्या होता |" म्हणजे मी या जन्म-मरणाच्या फेर्‍यात अडकलोय्,म्हणून! अरे परमेश्वरा, मी नसतो तरी काय फरक पडला असता? जाता जाता----- या ग़झल मधील शेर-- "हुई मुद्द्त के 'गा़लिब' मर गया ,पर याद आता है, वो हर इक बातपे कहना कि यूं होता तो क्या होता? असं म्हणतात की,या शेरवरुनच, जावेद अख्तरला "सिलसिला" या चित्रपटातील गाणे स्फुरले--" तुम होती तो ऐसा होता,तुम होती तो वैसा होता.... गा़लिब हा "endless" आहे...
  • Log in or register to post comments

"न था कुछ तो खु़दा था,कुछ न

जयंत कुलकर्णी
Sun, 09/19/2010 - 14:02 नवीन
"न था कुछ तो खु़दा था,कुछ न होता तो खु़दा होता, डुबोया मुझको होनेने,न होता मैं तो क्या होता |" मला याचा अर्थ असा भावला..... काहीही नव्हते तेंव्हा "तो" होताच. काहीही झाले नसते तरीही तो असताच. या जगातील "होण्याने " ( म्हणजे ज्या काही घडामोडी होतात त्या ) मला डुबवले, म्हणजे गुंतवले, अडकवले या जगात. मी नसतोच तर "हे जगही नसते, या घडामोडीही नसत्या आणि "तो" ही नसता. याच अर्थाचे मी ओमरच्या रुबायाचे भाषांतर केले आहे - कागद,शाई, स्वर्ग आणि नरक •जानेवारी 15, 2010 • १ प्रतिक्रिया (संपादन) हे विश्व केव्हा जन्माला आले ? माहीत आहे का तुम्हाला ? सध्याच्या शास्त्रीय विश्वामधे यावर खूपच काम चालू आहे. आपण नुकतेच ऐकले की विश्वजन्माचे रहस्य उलगडणारे प्रयोग जमिनीखाली १ कि.मी. खोलीवर करण्यात आले. त्याचा निर्णय काय व्हायचाय तो होईल. पण असेही म्हणता येईल की या विश्वाचा जन्म मी जन्मलो त्याच दिवशी झाला. याचे कारण सोपे आहे, मानवजात जन्माला आली नसती तर हा प्रश्नही जन्माला आला नसता. जेव्हा माणूस समूहात रहायला लागला तेव्हापासून तो मृत्यूला घाबरत आलेला आहे. मेल्यावर स्वर्ग का नरक ? तो वरती तुमच्या पाप-पुण्याचा हिशेब लिहितो म्हणतात. ज्यावर तो लिहितो आणि ज्याने लिहितो ते काय आहे ? याचा शोध विश्वाच्या जन्माइतकाच महत्वाचा आहे. म्हणून खय्याम म्हणतो – विश्वाच्या जन्मदिनी, अनंताच्या पलिकडे, माझा आत्मा शोधतोय कागद आणि शाई, स्वर्ग आणि नरक, त्यांना शेवटी साक्षात्कार झाला, कागद आणि शाई, स्वर्ग आणि नरक माझ्यातच आहे. जर मी जन्माला आलो तेव्हाच हे विश्व जन्माला येते तर तो कागद आणि ती शाई माझ्यातच आहे. जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments

लता मंगेशकर यांच्या आवाजात ही

मनीषा
Sun, 09/19/2010 - 14:19 नवीन
लता मंगेशकर यांच्या आवाजात ही गझल ऐकली आहे पण रफी ने गायलेली आजच ऐकली .. एक एक शेर सुरेखच ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा