ते वास्तवाच्याजवळच हॉटेल.
नमस्कार,नमस्कार........
"गुडांग गरम है क्या?"
"नही आगे की दुकान पे मिलेगा"
पुढेही तेच उत्तर..त्या पुढे गेलो.आजुबाजुला परीस्थीती,ठीकाण 'बत्त से बत्तर '(?) होत चालल होत.पण सिगरेट पियायची म्हणजे पियायची.
सिगरेट मिळाली.बसुन पियु,कशाला चाला जेवल्यानंतर,रीक्षा पण आहेत.
बस्स..............मग हे गेल्या काही दीवसांपासुन चालु आहे,जेवा व चाला यात्रेवर.........लांब..........सिगरेट पियायला.
तिथल्या एका हॉटेलने वास्तवाच्या खुप जवळ आणल.ते हे सर्व आठवल की खाता खाता घास हातात राहायचा.कधी कधी बस करुन तसाच उठायचो,कधी नाश्ताचा पदार्थ जेवण म्हणुन खायचो.....असेच काहातरी करतो.................का?
कारण.............
'तिथे' माणसे येतात,कीमतीच्या फळ्याकडे बघुन जेवणाचा पदार्थ मागवतात.मग कधीतरी कमी कीमतीचा पदार्थ ऑर्डर दील्याच्यानंतर नजरेत येतो.मग २-४ रुपये वाचवण्यासाठी ऑर्डर कॅन्सल करायला भांडताना त्या माणसांचा चेहरा रडकुंडीला येतो.
'तिथे' माणसे येतात्,जी पहीले जेवतात.मग पैसे कमी आहेत,सांगुन कमी पैसे घेताना हाडतुड करणा-या मालकाला हात जोडतात."आज जाउ दे,उद्या नक्की देईन,आज पैसे नाहीत" अस काहीतरी म्हणतात."पैसे नाहीत मग जेवतोस कशाला?" हॉटेल मालक ओरडुन प्रश्न विचारतो.
'तिथे' माणसे येतात.मालक "बेशरम हो क्या?" अस बोलतो,ते सर्व जेवण झाल्यावर ऐकुन घेतात कारण महीन्याची उधारी बाकी असते.मग हॉटेलमधुन जाताना मान खाली घालुन जातात.
'तिथे' माणसे येतात.रोज फक्त आणि फक्त 'डाल राईस' खातात,त्यांना कीमतीच्या फळ्याकडे बघायच नसत.कारण 'डाल राईस'पेक्षा कमी काहीच नाही.हाफ ९ रुपये,फुल १४ रुपये.मालक हीशोबाला चुकल्याचा फायदा घेतात,रोज फुल्ल्ल खातात..........पोट भरुन............मन काय भरतच!
'तिथे' माणसे येतात.बाजुच्या माणसाला बघुनच बाकावर बसतात.कारण बाजुचा काम करुन घाणेरडे झालेले कपडे घातलेला असला तरच शिव्या पडणार नाहीत.हात फक्त जेवणानंतर धुतात.हातावर पाणी ओततात,हातावरचे अन्न जायला,दुसरे काळे,तांबडे डाग जाण्याची वाट बघत नाहीत.
'तिथे' माणसे येतात.वरच्या खिशात रुपया वाचेल तेवढेच जेवण मागवात,ऑर्डर दील्यावरही खिसा तपासतात,कारण जेवल्यानंतर धुम्रपाण हव असत.
'तिथे' माणसे येतात.दुस-या माणसाचा चमचमीत दीसणारा पदार्थ न्याहाळतात.मग हळुच वेटरला त्या पदार्थाची कींमत विचारतात.कींमत ऐकयानंतर जबरदस्तीने हसल्यासारखे करुन पुन्हा त्या माणसाकडे बघत नाहीत.
'तिथे माणसे येतात.बायकांना व पोरांना जेवायला द्यायला.बायको व नवरा दोन ताटाचे तीन करतात.पोरगा खातो,अजुन भुक लागेल म्हणुन त्याला पाणी पाजल जात.
'तिथे' माणस येतात.तहान लागली म्हणुन छोट्या पोरांना पाणी पाजायला.मोठा पोरगा लहान बहीणीला पाणी देतो.पोरगी घाईने घेतो.पण वेडी तोंड लावते.मालक " हे बाहर निकल!" म्हणुन जोरात कींचाळतो.बाप मालकाला "थांबा थांबा" असा हात दाखवतो.वेडी छोटी ग्लासा़कडे बघत असते,तहान भागली नाही म्हणुन.
'तिथे' माणसे येतात.ज्यांच्या बायका हॉटेलच्या काउंटरवर येउन एखाद्या पदार्थाची कींमत विचारतात.मग थोड्या बाजुला जातात,अंग झाकण्यासाठी घातलेल्या मळकट ब्लाउजात हात घालतात,पैसे मोजतात.मग परत येउन दुस-या पदार्थाची कींमत विचारतात.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तिथेच बाजुला रोज चालुन घाम आला म्हणुन सारखा पांढ-या शुभ्र रुमालाने तोंड पुसणारा एक कोणीतरी उभा असतो.शुभ्र कपडे व चमकणारे बुट घातलेला कोण म्हणुन ती माणसे त्याला बघतात.तो ओळख असल्यासारखा आपुलकीने हसतो,हसरा चेहरा दीसेल ह्या प्रतिक्षेत..............पण त्या माणसांना 'आपली खिल्ली उडवुन हसतोय' असे वाटते व ते पडलेले तोंड खाली मान घालुन त्या हॉटेलात लपवतात.
"माफ कर दो साब" अस म्हणतात जेव्हा त्यांच्या कपड्यांचा स्पर्ष झाल्याने त्या सिगरेट पिणा-याच्या शर्टाला डाग पडतात.तो हसतो,हसुन "चलेगा सर" अस म्हणतो.पुन्हा त्या माणसांचा चेहरा पडतो,ह्याने खिल्ली उडवली म्हणुन.
.
.
.
म्हणुन आता 'तो' लांबच बसतो.कधीतरी सिगरेट पितो व चहा पियायला त्याच्यात जाउन उभा राहतो.त्यांच्या गप्पाचा आनंद घेत.ती माणसे तेव्हा जपुन बोलतात्,हा खिली उडवेल म्हणुन.
.
.
.
.
.
..
त्यांना काय माहीती हा एवढा लांब फक्त सिगरेटसाठी नाही येत,'काहीतरी नवीन' शिकायला येतो.
प्रतिक्रिया
मस्त..
छान
चांगलं लेखन....
लाचारी, दु:ख, भूक, व्यसन,
मस्त अनुभव वर्णन केला शानबा
छान रे शानबा. आणखी सविस्तर
छान निरीक्षण..
मस्तच रे
छान लिहले आहेस रे...
छान
मस्तंच!!!
छान
वा!
भेदक
सुरेख.
छान लिहिलयस रे शानबा.
वरील सर्वांशी सहमत
छान लिहिले आहे.
सर्वांचे मनापासुन आभार. मला
संवेदनशील लिखाण!
चांगला लेख. असेच लिहित
+१००००
सुश्या !! मस्त सेंटी मारलाय
सेंटी वगैरे जाऊ दे, ते बाजूला
+१
खूप छान!
भावना पोचल्या, समजल्यादेखील !
चित्रदर्शी
पुन्हा एकदा सर्वांचे
हा लेख आवडला.