तु येशील का ?
तप्त या धरतीला
ओढ लागली पावसाची
धाडुन या वार्या स॑गे माती
पुसत असे ती मेघाला
आस मजला तुझ्या तृप्तीची
पुर्ण करया तु येशील का ?
मीलनातुनच तुझ्या अन माझ्या
सृष्टी ही बहरत असे
तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर
तुझ्याच मुळे मी हसते
करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण
सा॑ग सख्या तु येशील का ?
कधी सरी वर सरी
तर कधी पाठ दाखवुन पळी
नखरे तुझे हे जुने पुराणे
उमजत असले जरी मजला
खोड तुझी ही
सा॑ग मजला कधी सुटेल का ?
नाते आपले हे जन्मोजन्मीचे
निभावण्यास सा॑ग सख्या तु येशील का?
सा॑ग सख्या तु येशील का ?
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5482
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
मस्त कविता
सहमत आहे.
In reply to मस्त कविता by स्वाती राजेश
छान
आवडली कविता
In reply to छान by इनोबा म्हणे
छान वाटली कविता ...
In reply to आवडली कविता by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान
In reply to छान वाटली कविता ... by छोटा डॉन
मस्त!
वा शितल
छान काव्य!
व्वा.....
आभार .
मस्त आहे.
In reply to आभार . by शितल
सोपे शब्द ,
सुरेख..
मन प्रसन्न झले
छान...