भवताल
माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मिपाला नुकतीच ३ वर्षे झाली . माझ्याही आत्तापर्यंतच्या वाटचालीत मिपाचा फार मोठा वाटा आहे .. म्हणुन हा लेख मिपाला आणि मिपाकराना अर्पण .....
भवताल ..
परवा कॉलेजच्या गणपतीच्या मिरवणूकीत तीन तास नाच नाच नाचलो खरं, पण नंतर माझाच माझ्यावर विश्वास बसेना.. कधी काळी मिरवणूकीत साधा सहभागीही न होणारा मी, पण भवतालचा माहौलच असा होता की, You have to rock .. आणि एकदम डोक्यात सणक गेली . अरे आपला भवताल आपल्या नकळत आपल्यावर कीती अफेक्ट करतो. नाही का ? युरेका! युरेका !! माझ्या बर्यापचशा प्रश्नांची उकल झाली ना भाऊ..! काही गोष्टी , ज्यांची उत्तरच सापडत नव्हती , हळु हळु समजु लागल्यात !!
गोष्ट फार पूर्वीची नाही.. सकाळी सकाळी नॅशनलला कार्यक्रम लागायचा.. 'सुबह सवेरे' ,त्यात एक गाणे लागायचं.. जोशमधलं.. ते गाणं आजपण ऐकतो. पणं आत्ता सकाळी नॅशनल लावलं जात नाही. चॅनल्स वाढलीत.. झगमगाटीची सवय झाली.. कोणत्या रिऍलिटी शो मध्ये काय चालू आहे त्याची चर्चा सुरू झाली आणि त्यात असं काही खरं खुर नकळत मागं पडलं.. आय थिंक सुरभीचे पण एक-दोन एपिसोड बघितलेत मी.. पण आता कोणीच एवढं निरागस नाही राहीलं. ना मी, ना टीव्ही कोणीचं.. आणि जाणूनबुजुन नाही., आपोआपं. मालगुडी डेज चे व्हिडिओज दिसत असुनही लावले जात नाहीत ते यासाठीच वाटत !!
हा, हा, हा.. आत्ता मलाच हसू येतयं. अगदी परवापर्यंत मी कोणत्या मुलीशी बोलायला घाबरायचो. आजकाल बिनधास्त बोलतो. साला त्या फेसबुकने तर माझ्या नकळत माझी जिंदगीच बदलली. भाषा, पेहराव.. होल चेंज. आत्ता कोणाला तरी मला 'हाय' चे स्पेलिंग hiee नसुन hi असते असे सांगायला लागले नाही. म्हणजे मिळवले. एक साईट, सहा महिन्यांचा काळ.. but, what a effect.. Awsome..
'
'नाटय महोत्सवाचा एक इव्हेंट''.. काय शिकवलं नाही त्यानं? अवघे 15 दिवस - पण 15 वर्षातही जे शिकता येणार नाही ते शिकविलं.. कोल्हापूरचीच नवी ओळख झाली. जगण्याचा ऍंगलच बदलला राव! एका दिवशी अचानक ''साधना'' चे ऑफिस समोर दिसते. मी आत जातो, 'विनोद शिरसाठांची भेट होते आणि माझे लिखाणच बदलते. एक माणूस, 5 मिनीटे,.... ओह! अनबिलिव्हेबल !!
अरेच्या, केवढं काय काय आठवतयं मला आज .. हम्म, जरा थांबायला, मागं बघायला वेळ मिळालायं.. खुप बदल जाणवताहेत.. माझ्या नकळत झालेले.. माझ्या आजुबाजुच्या गोष्टींनी माझ्यात केलेले .. हिंदी बोलताना माझ्यात आमच्या दुबे सरांचा टोन जाणवतो... होनगेकरांची दोनच लेक्चर्स झालीत.. पण, त्यांची स्टाईल माझ्या नकळत कॉपी होतेय..
काय ना काय? किती छोटया गोष्टी.. पण, फार परिणाम करतात. माझेच नाही, सगळयांचेच होत असावे असे. माझा एक मित्र .. पुण्याला गेलाय.. परवा फोन केला.. तोंडात शिवी ''आईच्या गावात'' .. कधीकाळी ''रां*च्या'' म्हणायचा.. गाव बदलं की शिव्यापण बदलतात तर! २० दिवसातला बदल ..अजुबाजुचे जरा काही बदलले की किती बदलतो आपण .. अगदी क्वचित हातातले पेन बदलले तरी लिहिताना त्रास होतो .मराठी गाण्याचा माझ्यासारखा फॅन असला की २- ४ दिवस सलीलचे गाणे ऐकले नाही की काही वेगळेच वाटते .
हम्म..आपण म्हणतो मी स्वत:ला घडवतो, नाही, नाही! आजुबाजुचा भवताल तुम्हाला, मला घडवतो. आपण फक्त प्यादे असतो. कुठं जन्मायचं ते आपल्या हातात नसतं .. पटावरल्या कोणत्या पोझिशनवर आपण असणार हे माहित नसल्यासारखं.फक्त मित्र वगैरे चुज करण तेवढे हाती , कोणत्या घरात पाऊल टाकायचे तसे .... तसं, मी जे म्हणतोय ते अनुभव काही नवे नाही आहेत.. बरेच विचारवंत म्हणून गेलेत की समाज तुमच्यावर अफेक्ट करतो.. बरोबर आहे, पण पर्टीक्युलरली भवताल.. कडेला पडलेले आय पॉड सारखे एखादे छोटेसे गॅजेट असो वा एखादा थोडाच वेळ भेटणारा माणूस.. It changes us .. भवताल .. आज आपला भवताल बदलतोय झपाट्यान आणि म्हणुन आपणही .. मीच बघा ना २ वर्षापुर्वी काहीही न लिहिणारा आज असे काही लिहायला लागलोय .. बदलणारी स्थिती आणि त्यामुळे बदलणारे आपण सारे...
बाकी विचारवंतांच्या ऍंगलने विचार केला तर, नेहमीप्रमाणे बरेच पॉईंट सापडतात. की बाबा रे, तरूणाईच्या बाबतीत या भवतालचा तेवढा विचार होत नाही. तरूणाईचा विचार करायचा असेल तर याच्या जरा जास्तच खोलात जायला हवे. कारण, मी सेकंदभरात ने खर कुठे क्लिक करतो. ती क्लिक माझी पर्सनॅलिटी डिसाईड करते. कडेला पडलेला मोबाईल, आय-पॉड ,माझे खरे आणि व्हर्चुअल मित्र हे आजुबाजुचे छोटेसे घटक माझ्यावर सर्वात जास्त अफेक्ट करतात..ब्ला .. ब्ला...ब्ला..
हुश्श.. केवढे ते फॅक्टर्स.. पण, थोडक्यात एवढेच की हा भवताल आपल्या नकळत आपल्याला घडवतो. It moulds us … आणि, तो भवतालच आता प्रचंड वेगाने बदलतोय.. आजची एक पीढी 5 वर्षाची आहे फक्त .. दर सेकंदाला जग बदलतयं आणि त्यामुळेच तुम्ही, मी आणि आपण.. आपले जग तांत्रिक आहे , विज्ञानाचे आहे .. आणि या माहितीचे आहे . म्हणुनच या महापुरात आपण कुठे जाणार ते कळत नाहीये... असुदेत की.. जाऊ दे कुठेही .. we will face it... आपल्या मनाला जीवंत ठेवता आलं... कान, डोळे उघडे ठेवता आले आणि स्वत:ला टिपता आलं की सगलंच बदलत .. नेटवर तास तास टाइमपास करताना कोणाकडे असाच मराठी रॅपरचा व्हिडिओ सापडतो आणि दिवस बनुन जातो .. अगदी तसं .. एवढे असले की या छोटया छोटया गोष्टी, हे भवताल आणि जग आपल्यालाच खेळायला दिलेलं अंगण आहे, नाही का?
प्रतिक्रिया
भिड रे विन्या, भाड्या एकदा
धन्स धन्स
सहमत समहत समहत!
याद
ताल
आनंदलहर...!!
नेहेमीप्रमाणे सुंदर प्रतिसाद.
दाद
धन्यवाद विनायका या
लेख आवडला. >> आजुबाजुचा भवताल
लिखाण आवडले.
खूपच छान स्वगत ! भवताल एकदम
बदल भरपूर जाणवतोय.... हा लेख
कॉलेजात लेका विन्या तु नाचणारच
नव्या पोरी म्हटले कि आपोआप
विन्या, लेख वाचला नाही पण
+१
विनायका
:-)
धन्य रे विनायक! कोणाचाही
चांगलं लिहीलं आहेस रे!
दादा ???
....आधीच्या कोल्हापुरी
लढ बाप्पू!