Skip to main content

'सायलेन्स प्लीज'

लेखक प्रभो
Published on शुक्रवार, 10/09/2010
'सायलेन्स प्लीज' हे दोन शब्द ऐकू आले आणी पुर्ण स्टेडीयम मधे शांतता पसरली... टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप १५-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप टक टक टक ३०-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप ४०-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप टक टक टक टक टक टक टक टक ६०-० परवा सहा तारखेला यु एस ओपन याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.....नशीब बलवत्तर म्हणावे की रॉजर फेडररची मॅच आमच्या लॉट ला आली... :) pic 1 तसा मी नदाल फॅन...पण फेडेक्सच्या नजाकतीचा मी राफाच्या फॅन होण्या आधीपासूनचा फॅन.....सुवर्णसंधीच... त्यात तिकिट काढलेलं प्राईमटाईम ऑर्थर अ‍ॅश स्टेडीयमचं.....सोनेपे सुहागा.... aa टेनीस ची मॅच बघणे हा एक वेगळाच अनुभव होता...आपल्या नेहमीच्या क्रिकेट - फुटबॉल च्या मॅचेस प्रमाणे कायम दंगा नव्हता....दंगा नव्ह्ताच असे नाही...२ सर्व्ह च्या मधे दंगा ..... मधेच कोणीतरी 'रॉजर, यु आर माय हिरो' असे ओरडून जायचा...तर दुसरा ' मेल्झर, ब्रेक हिम' म्हणून... मॅच विषयी जास्त काहीही न लिहिता थोडी प्रकाशचित्रे पेश करत आहे.. 1 2 3 4 5 6 ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, बेसबॉलचा सध्याचा बेस्ट खेळाडू अ‍ॅलेक्स रॉड्रीगेज आले होते. 7 8 * आता तरी खेळ विभाग चालू कर रे निलकांता.. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 8747
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

राऊंड रॉबिनमध्ये ट्रॉफी मिळत नाही ओ बै.. प्रभ्या लेका लै भारी! रॉजरला लाईव्ह खेळताना पाहिलेस! हेवा वाटून राहिला भौ!

In reply to by मेघवेडा

संधी सोडायची नव्ह्ती रे....इंग्लंड, फ्रांस आणी ऑस्ट्रेलिया ला ग्रँड स्लॅम बघायला जायला जमेल का नाही माहित नाही....उसात पुढच्या यु एस ओपन ला असेन का तेही..... लोहा गरम था..मारा हाथोडा.. :)

In reply to by मेघवेडा

मेव्या, गब्बस! तुला काही प्रशन विचारलाय का मी? उगा आपलं मधे मधे बोलायचं आणि स्वतःची प्रतिमा उंचावायला बघायचं! :P

ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, बेसबॉलचा सध्याचा बेस्ट खेळाडू अ‍ॅलेक्स रॉड्रीगेज आले होते. मॅच सोडुन तुझ लक्ष अशाच प्रेक्षणीय स्थळांकडेच होत वाट्ट... ;) (स्टेफीचा पंखा)

In reply to by मदनबाण

हाहाहा..या वर्षी आतापर्यंत सर्वात जास्त सेलेब्रेटी प्रेझेंस (माझ्यासकट ;) ) याच मॅच ला होता असे यु एस ओपन ची साईट कळवते.. 'On Day 8 of the 2010 US Open,' च्या पुढे वाच.. :)

In reply to by प्रभो

आ रा रा... इतकी देखणी पाखरं !!! ती बी एकाच जागी, च्यामारी यावेळी एचवनबी साठी अप्लाय करुन टाकावाच म्हणतो... ;)

In reply to by मदनबाण

करच तू अप्लाय! देखण्या पाखरांबरोबर जाडजूड पाखरं दिसायला लागली कि कळेल्.......(या आयुष्यात काही राम राहिला नाही रे!)

ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, बेसबॉलचा सध्याचा बेस्ट खेळाडू अ‍ॅलेक्स रॉड्रीगेज आले होते. आणि मि पा परिवारातर्फे श्री प्रभो यांची उपस्थिती होती ... ( यू एस ओपन/ विम्बल्डन बघायला ... मेरा नंबर कब आयेगा )

फोटो एकदम मस्त आलेत. ते काढण्याबरोबरच मॅच पण पाहीली असशील अशी आशा करतो. ;) वरून तिसरा "बिग स्क्रीन" चा फोटो बघितला आणि क्षणभर वाटले की सवयीने तू स्टेडीयमवर आहोत हे विसरून स्क्रीनवरच पहात बसलास की काय! :-)

मस्त मस्त मस्त! वा!व्वा!!! पुढे बोलायला शब्द नाहीत. तुमच्या भाग्यावर थोडे जळून घेतले. ;)

वा वा वा, नशिबवान आहात. आवांतर : बाकीचे फोटो पाहुन प्रश्न पडला की नक्की काय पहायला गेला होतास :?

लय भारी फोटु. गेल्या वर्षी गावात लेग मेसनला गेलो होतो. "फ्लशिंग मिडोज ला जावे , नित्य वदावे " ;-)

वा!!

In reply to by श्रावण मोडक

वा!!!

मस्तच. काही वर्षांपूर्वी फ्लशिंग मेडोजमध्ये पाहिलेल्या सानिया मिर्झा - शारापोव्हा मॅचची आठवण झाली.

मजा आहे. फोटो छान आहेत.

इसको बोलते है लंबा वीकांत! छायाचित्रे मस्तच. (जलजला)चतुरंग

त्यात पुन्हा या वर्षी आतापर्यंत सर्वात जास्त सेलेब्रेटी प्रेझेंस. आणि महत्वाच म्हणजे प्रेक्षणीय स्थळं? वाह!!!!! क्या कहने...

मस्त! फोटो तर मस्तच!!

प्रभ्या , हातात धरलेल्या बियरचा आणी स्ट्राबेरीचा फोटु कुठाय ? हे प्रभो !! आपल तेजाळलेल नशीब दाखवुन समस्त मिपाकरांना जळवल्याबद्दल,तुझ्या'प्रभो' नावाच्या लेकराला माफ कर !!

असु दे हां. आमाला कंट्री लोकांना ते काय समजत नाय. मस्त फोटू. अलेक्स काय म्हणतोय?

In reply to by प्रभो

छे छे! हँगोव्हर कसला आलाय? तुला मैत्रिणींचे आभार मानायला नकोत म्हणून आपली काहितरी नाटकं! बर्‍या बोलानं आभार मानतोस का देऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा?

In reply to by प्रभो

घ्या आता दुधाचा हँगओवर व्हायला आम्ही काय तुमच्या सारखे कुक्कुल बाळ का? असो ज्याची त्याची जाण समज काय म्हणताते ...

In reply to by प्रभो

छ्या.. झालंसुद्धा इतक्यातच आभारप्रदर्शन? पक्षाचे पदाधिकारीच पक्षाच्या प्रमुख धोरणांना बगल देऊ लागलेले पाहून वाईट वाटले.

In reply to by मेघवेडा

हे मेतकुटासाठीचं राजकारण आहे..तुम्हाला नाय समजायचं.... तुम्ही तिकडे विंग्लंडात...इकडे आमच्या मेतकुटाचे वांदे व्हायचे... ;)

In reply to by प्रभो

अरारारारारा आयटीवाला कुक ना तु ? की मागे कुणा मित्राच्या रेशिप्या स्वत्:च्या नावावर खपवल्यास ;)

In reply to by गणपा

भाज्या बनवणं वेगळं....आणी मेतकुट वेगळं...तेथे हवे जातीचे (आता ह्यावर टीआरपी नका वाढवू... :D ) बाकी तुमच्या वर तुम्ही बायकोच्या रेशेप्या चोरून टाकता असा झालेला आरोप आठवला.. ;)

In reply to by प्रभो

इतकी काही वाईट नाही मी! तुला मेतकुटाव्यतिरिक्त कांद्याची पीठ पेरून भाजी हवी होती. ती गरम गरमच चांगली लागते, तरीही हवी असेल तर करून आणते. कुर्डया, पापड्याही आहेत, आणू का? असे ख. व. मध्ये विचारायचे होते.;) आणि शहाण्या, माझ्या मैत्रिणींचे आभार कश्याला ते मानायचे म्हणते मी?;)

In reply to by रेवती

चला..धागा सत्कारणी लागला.. :) आता सुखाने हापिसचं काम(? ) करायला मी मो़कळा.. :) *तुमच्या एका मैत्रिणीने मिसळ पाव प्रॉमिस केलं आहे म्हणून.. :)

In reply to by यशोधरा

मलाही हेच वाटतय म्हणून भरपूर प्रतिसाद देतिये. एवढं करूनही तो काही मैत्रिणींचे आभार मानायला तयार नाही. प्रभोचा पुढचा धागा सगळ्या महिलावर्गाकडून 'पाडण्यात' यावा असे आवाहन करते.;)

In reply to by गणपा

गणूदादा, माझ्या नावातच यश असल्याने असेल! ;) दुसरं म्हणजे फारसं खोलात जायची गरज नाही लागत रे त्यासाठी! :D अवांतरः प्रभो, तुला किती प्रतिसाद हवेयत अजून? गणूदादा, तुझ्या रेशिप्या खायला कधी यायचं? तरी बरं, तुझ्या धाग्यांवर मी नेहमी प्रतिसाद देते. आता हवं तर अजून काही आयड्या काढून, त्या आयड्यांनीपण प्रतिसाद देईन.

फ्यांटाश्टिक! चक्क लाईव्ह म्याच पाहण्यात काय मजा असेल भौ! मस्तच. अवांतरः ते...फ्लोरिडा बीचचे फोटु टाकणार म्हणाला होतास ना रे?

शेवटून दुसरा फोटो आवडला.

प्रभ्या लेका सेलेब्रेटी झाला की तु आता ;) चला तुला आता स्ट्रोबेरी + क्रिम देखील खायला मिळो अशा आमच्या शुभेच्छा.