फोनवरचा संवाद व काही प्रश्न
नमस्कार,नमस्कार............
मी काही दीवसांपुर्वी "सल्ला हवा आहे" वगैरे काहीतरी एक लेख लिहला होता व विचारल होतं की अमुक व्यक्तीला फोन करायचा आहे.काय बोलु वगैरे.ती माझ्या वर्गात होती.आम्ही ५ ते १०वी एकत्र होतो.
मला ह्या लेखातुन काहीतरी सांगायच आहे व विचारायच आहे.आजचा संवाद सांगितल्यानंतर विचारतो.
"हॅलो"मी
"कोण?"ती.
"कोण लीना? मी सुशांत बोलतोय"
मी ८-९ वर्षांनी तिच्याशी बोलत होतो.पाहील्याला पण तेवढीच वर्षे झाली.
"सुशांत.....हा बोलना"तिचा शंकेने भरलेला सुर.
"कुठे आहेस?"मी
"कोण सुशांत?"
"मी तुझ्या वर्गात होतो ना?.............तो"
"तु कोणी वेगळ आहेस का? तुझा आवाज लहान मुलासारखा येतोय,तु कोणी वेगळा तर आवाज बदलुन बोलत नाहीयेस ना?"
"नाही मी सुशांत्,आपण स्टेशनच्या शाळेमधे होतो" हक्काने आवाज चढवुन बोललो.
"अरे हा!.......सुशांत तु!!!......बोल कसा आहेस?"
मग माझं आडनाव वगैरे आलं.काय करतोयस वगैरे सर्व बोलुन झाल.
"काय सुशांत्,मग लग्न झालं का?"
"कुणाचे एवढे खराब दीवस आलेत?.........मला अजुन पीएचडी पुर्ण करायला कमीतकमी ३ वर्ष आहेत."
"क्काय? आता पीएचडी पण करतोयस?"
"होय"
"I am proud of you!"
"thank you"
"so now what? any girlfriend?"
"no no"मी अगदी interview मधे देतात त्या पद्धीतीने बोललो.
"मग काय खुप वर्षांनी आठवण आली"
"सहज call केला,मला खुप कंटाळा आलाय"
"का काय झाल रे?" चौथी पाचवीतलेतले दोन विद्यार्थी बोलावेत तीच निरागसता व निष्पाप विचार.
"काही नाही,सांगेन कधीतरी"
"अरे वीकी बोलत होता,कुठेच दीसत नाहीस,कुणालाच भेटत नाहीस का रे?"
"मला chemistry शिवाय दुसरे सर्व आता nonsense वाटत.मी सर्वांना भेटायचे टाळतो."
"का रे,काय scientist झालास की काय?"
"नाही,पण होईन"
"कुणाशी बोलत नाहीस मग मला का call केलास?"
"सहज केला,तुला त्रास असेल तर सॉरी,ठेउ का फोन?..मला माहीती नव्हत तुला आवडणार नाही म्हणुन"
"अरे अस काय बोलतोस! मी विचारल काही काम वगैरे असेल अस वाटल"
"नाही काही नाही"
"काय मग आता सुधारलास का? की अजुन............"
"sorry? what do you mean?"
"look sushant,you know what I mean"
आता मला थोडा राग आला.
"ओह...........अच्छा अच्छा..................नाही मी आता फक्त सिगरेट पितो...........ते पण आता चार वर्षांनी सुरु करतोय्,ड्रींक्स पुर्ण बंद"
"अच्छा,मग आता कुठे जॉब करतोस?"
"ते जाउ दे now listen to me,मी तुला एवढ्या वर्षांनी फोन केला व तु मला तेच का विचारलस?"
"मला मधे तुझे मित्र दीसले होते,अजुन त्यांच तसच चालु आहे,तु त्यांच्याबरोबर असायचास म्हणुन विचारल? they are impossible!"
"to hell with them,मी त्यांना खुप वर्षांपासुन भेटलो नाही.मी T.Y ला chemistryमधे ८०% टक्के काढले,M.Sc ला first class काढला ते काय ह्या सवयी ठेउन नाही.I have dedicated myself that way!"
" तु मला फोन कर म्हणुन बोललास म्हणुन विचारल्,मी तुला तेव्हाही चांगलच मानायची पण तुझ्या त्या सवयी व रोज ते नवीन problems!!"
"हे बघ,नको करुस मला फोन व भेटुही नकोस्,पण माझ्याबद्दल स्वःताचे मत बदल..............मी तुला सहज फोन केला..........flirt वगैरे नाही करताय आणि मी सर्व सोडले आहे,मला एकदा भेट व बोल व नंतर हवे ते मत बनव"
"तु सर्व सोडलस हे बरं केलस्,मी तुला आपुलकीने विचारले, पण first impression is last impression....बोल कधी भेटुया?"
"wait,wait.....ya you are right..........first impression is last impression...........मी तुला नंतर call करुन सांगेन ओके?................bye and thanks a lot!"
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही प्रश्न :
१. एखादी चुकी माणसाला एवढी वर्षे चिकटुन रहावी? की कीत्येक वर्षांनीही तो कीतीही शिकलेला असला तरी आताही 'तेच' करत असावा ही शंका यावी?
२. Is first impression so important?
प्रतिक्रिया
Is first impression so important
विरोधाभास?
अहो, शाळेत एकापेक्षा जास्त
विरोधाभास नाहीये. मी ८-९
>> "मला मधे तुझे मित्र दीसले
फोन कशाला?
>> nothing is permanent how
जाऊ द्या हो!!
शानबा! तीने परत भेटायला